33 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeराजकीयत्यांची नजर वाईट, यापुढे आरएसएसने सावध राहण्याची गरज : उद्धव ठाकरे

त्यांची नजर वाईट, यापुढे आरएसएसने सावध राहण्याची गरज : उद्धव ठाकरे

महाराष्ट्रात जणू काही टोळ्यांच राज्य आलंय की काय अशी भावना आता जनतेच्या मनात निर्मान झाली आहे. कोठेही जायचे आणि बळकवायचा प्रयत्न करायचा. काल त्यांनी आमच्या मुंबई महापालिकेच्या कार्यालयाचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला. आज ते आरएसएसच्या (RSS) कार्यालयात गेले होते. आरएसएस मजबूत आहे, त्यामुळे तिकडे ते ताबा घेऊ शकले नाहीत पण यापुढे आरएसएने सावध राहण्याची गरज आहे, अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केली.

उद्धव ठाकरे म्हणाले, काल मुंबई महापालिकेत मिंदे गट गेला होता. आज तर आरएसएस कार्यालयात ते गेले होते. त्यामुळे आज आरएसएस कार्यालयावर ताबा सांगण्यासाठी ते गेले होते का याचे उत्तर नाही मिळाले अजून असा टोला लगावतानाच ज्यांच्यात कर्तृत्त्व नसते किंवा निर्मान करण्याची कुवत नसते ते उघडपणे चोऱ्या करतात किंवा ताबा घेतात, खरे तर हा मानसोपचार तज्ज्ञांना विचारण्याचा विषय आहे की, काही जणांच्या मनात एक न्यूनगंड असतो कि आपण काही करु शकत नाही, याची जाणीव असते. मग न्यूनगंडाचे रुपांतर ते अहंगडात करतात. पण ते दुसऱ्यांचे नेते, पक्ष, चोरून ऑफीस बळकवून असे करतात आज आरएसएस कार्यालयात ते गेले होते. तेथून बाहेर पडले असावेत पण आरएसएसच्या भागवत साहेबांना पण विचारतो की जरा कोपरे कोपरे तपासून बघा, कुठे लिंबू टाचण्या पडल्यात का बघून घ्या.

त्यांची भूभूक्षीत नजर खुप वाईट आहे, ज्याचा अनुभव आम्ही घेतला. दुसऱ्यांच्या ऑफीसवर कब्जा कसा घ्यायचा ही त्यांची वृत्ती आहे. ही वृत्ती घातक आहे म्हणूनच आरएसएसने यापुढे काळजी घेण्याची गरज आहे, असे देखील ठाकरे म्हणाले.
सरकार ३२ वर्षीय तरुणाला घाबरलंय का असा प्रश्न पत्रकारांनी ठाकरे यांना केल्यानंतर ते म्हणाले, सरकारला अजून युवा शक्तीची कल्पना आलेली नाही. युवकांच्या रोजगाराच्या संधी तुम्ही हिरावलेल्या आहेत. महाराष्ट्रात येणारे उद्योग तुम्ही दुसऱ्या राज्यात जाऊ दिले. कर्नाटकच्या मंत्र्यांनी काल मुंबई केंद्रशासित केली पाहिजे अशी मागणी केली. कोणत्या पक्षाचे ते मंत्री आहेत. कसे काय ते बोलू शकतात. म्हणजेच भाजपच्या मागे दीड महिन्यापूर्वी देवेंद्र फडणवीस कदाचित मुंबईत म्हणाले होते. जसजशी निवडणुक जवळ य़ेईल तसतशी शिवसेना अपप्रचार करेल मुंबई तोडण्याचा डाव केला जात आहे. पण भाजपच्या पोटातलं भाजपच्याच मंत्र्याच्या ओठावर आलेलं आहे. हा मुंबई तोडण्याचा आणि केंद्रशासित करण्याचा जो डाव भाजपच्या पोटात आहे तो भाजपच्या कर्नाटकातल्या मंत्र्यानेच समोर आणला आहे. त्याच्याबद्दल त्यांनी कितीही आव आणला तरी ते काय करु शकणार नाहीत, असे ठाकरे म्हणाले.

हे सुद्धा वाचा
मोगलाई निलंबन : शिंदे सरकारानु, आसं कुटं आसतंय व्हय? – तहसीलदार, नायब तहसीलदार संघटनेचा सवाल !

चीनमध्ये स्थायिक भारतीय डॉक्टर म्हणताहेत, कोविड परिस्थिती अत्यंत बिकट; रोज एक कोटीहून अधिक नवे रुग्ण, स्मशानभूमींवर मोठा भार !

पोस्ट खात्यात एकाच दिवसात 5000 ग्रामीण डाक सेवकांच्या बदल्यांना मंजूरी; बदल्यांसाठी ऑनलाईन पोर्टल सुरू

उद्धव ठाकरे म्हणाले बोम्मई ज्या धाडसाने जे बोलत आहेत. त्या तुलनेत आपले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बोलत नाहीत, काम करत नाहीत. मी पुन्हा एकदा सांगतो २००८ साली जे सर्वौच्य न्ययालयाने सांगितले होते की, परिस्थिती जै थे ठेवा आणि जोपर्यंत या मद्द्याचा निकाल लागत नाही तोपर्यंत कर्नाटक व्याप्त प्रदेश केंद्रशासित करता येणार नाही. पण आज २०२२ पर्यंत कर्नाटक सरकारने तिकडे ज्या आक्रमकपणे काही गोष्टी केलेल्या आहेत. जसे विधानसौदा बांधले, उपराजधानी केली. बेळगावच नामांतरण केले. मराठी भाषिकांवर भाषिक अत्याचार सुरू केले. त्याला आपण काहीच उत्तर दिले नाही त्यामुळे माझी सरकारला विनंती आहे, पुन्हा एकदा सर्वौच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली पाहिजे. २००८ साली जी परिस्थिती होती. आणि २०२२ मध्ये काय काय बदल घडलेला आहे. त्यानंतर आता तरी तो जो संपूर्ण भूभाग आहे तो केंद्रशासित झाला पाहिजे ही आपली पुनर्विचार याचिका ही सर्वोच्च न्यायालयात झाली पाहिजे, अशी मागणी ठाकरे यांनी केली.
विधानभवनात कर्नाटक निषेधाचा जो ठराव मांडला तो महाराष्ट्राच्यावतिने मांडला आहे. त्यात मी कधी आडकाठी आणणार नाही, महाराष्ट्राच्या हिताचे जे असेल त्यात आम्ही काही आडकाठी आणणार नाही पण त्यात आम्हाला ज्या काही गोष्टी सुचवाव्या वाटतात त्या मांडणे आमचे कर्तव्य आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. भ्रष्टाचाराचे आरोप फक्त शिंदे गटाच्याच मंत्र्यांवर होत आहेत याचा विचार त्यांनीच करायला हवा की ही प्रकरणे नेमकी कुठुन बाहेर येत आहेत आणि कशी याचा शोध त्यांनी घ्यावा. आमच्या काळात ज्यांच्यावर आरोप झाले त्यावेळी मी एका मंत्र्याचा राजीनामा घेतला होता. आता ही त्यांचे एक प्रकरण बाहेर आले आहे. ज्यांची प्रकरणे बाहेर येत आहेत त्यांनी विचार करायला हवा की हे आपल्याला आधार देत आहेत की गाडत आहेत, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी