धनंजय मुंडेंची काकांसाठी भावनिक पोस्ट

टीम लय भारी

मुंबई: आज भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची पुण्यतिथी आहे. यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट लिहिली आहे. अजूनही आठवतो तो 3 जूनचा काळा दिवस… आजही असं वाटतं अप्पा, तो दिवस उजाडलाच नसता तर… अप्पा तुम्ही नाहीत, पण तुमची चेतना आजही आमच्यात आहे, तुमचा आवाज आजही कानात घुमतो! भावपूर्ण आदरांजली अप्पा… या आशयाची पोस्ट धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी शेअर केली आहे. Dhananjay Munde emotional post for gopinath munde

गोपीनाथगड येथील स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिस्थळी धनंजय मुंडे सकाळी अभिवादन करण्यासाठी जाणार आहेत. अहमदनगर येथे गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित आदरांजली कार्यक्रमास देखील उपस्थित राहणार आहेत.

राज्याच्या कानाकोपऱ्यातून गोपीनाथ मुंडे यांचे समर्थक गोपीनाथ गडावर अभिवादनासाठी येतात. मागील दोन वर्षांच्या काळात स्मृतिदिनाला समर्थकांना गोपीनाथ गडावर यायला मिळालं नव्हतं. आता दोन वर्षांनंतर गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मुंडे समर्थक गोपीनाथ गडावर येणार आहेत.

या कार्यक्रमाला मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान हे सुद्धा गोपीनाथ गडावर येणार आहेत. गोपीनाथ गडावरुन पंकजा मुंडे या नेमकीच आपल्या समर्थकांसह शक्‍तिप्रदर्शन करतात. आज त्या नेमकी काय भूमिका घेणार याकडे साऱ्या लोकांच्या नजरा लागल्या आहेत.

हे सुद्धा वाचा: 

साकीनाका बलात्कार प्रकरणी आरोपीला अखेर फाशीची शिक्षा

Day After 2 Killings, Centre’s Meeting On Kashmir, SOS From Pandits

Shweta Chande

Recent Posts

पाच लाखांच्या बदल्यात १८ लाखांची वसुली; चार खासगी सावकारांवर गुन्हा दाखल

शहरात सावकारीचा फाश सुरुच असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. म्हसरुळ भागात अवैध सावकारी करणाऱ्या दाम्पत्याने…

13 hours ago

जुन्या नाशकात घर आणि गाड्या जाळल्या; समाजकंटकांवर गुन्हा

जुने नाशिक  येथील जहांगिर कब्रस्तान व इतर ठिकाणांवर दुचाकीस्वार तिघांनी चारचाकी, दुचाकी वाहनांसह घरांवर जळत्या…

14 hours ago

पेन्शनच्या रकमेसाठी मुलाकडून आईचा खून

वाकडी (ता. जामनेर) येथे शनिवारी (ता. ११) एका ९० वर्षीय वृद्ध महिलेचा राहत्या घरात खून…

14 hours ago

‘विषय हार्ड’ चित्रपटाचं मोशन पोस्टर लॉन्च

मराठीमध्ये विषयांचे वैविध्य बघायला मिळतं, त्यामुळे मराठी चित्रपट अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल्समध्ये चमकदार…

14 hours ago

भाजप सरकारचा शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळ; शरद पवार

सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कांद्याचा प्रश्न दिवसेंदिसें वस जटिल बनत चालला असून शेतकऱ्यांसाठी जीवघेणा ठरत आहे.…

15 hours ago

भारताच्या अर्थव्यवस्थेची उत्तुंग झेप तिसऱ्या क्रमांकावर पोहोचणार; ना. भागवत कराड

भारताच्या अर्थव्यवस्थेने (India's economy ) उत्तुंग झेप घेतली असून दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आणि आता…

17 hours ago