महाराष्ट्र

धनंजय मुंडेंनी अधिकाऱ्यांना लावले ‘कामाला’

राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाने दडी मारल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे या परिस्थितीचा आढावा घेत असून मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी संभाजीनगर येथे विभागीय आयुक्त कार्यालयात मराठवाड्यातील आठ जि्ह्यांची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत शेतकऱ्यांवरील कोसळलेल्या संकटाची माहिती घेत अधिकारी वर्गाला त्यांनी तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देत ‘कामाला’ लावले आहे.

मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली जिल्ह्यांमध्ये काही भागात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तर मराठवाड्यातील उर्वरीत भागात मात्र पावसाने दडी मारल्याने खरिपाचा हंगाम वाया गेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मुंडे यांनी सर्व भागातील शेतीच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे आदेश कृषि, महसुल खाते तसेच विमा कंपन्यांना देखील दिले आहेत.

आठवडाभरात गावनिहाय शेतीच्या नुकसानीचे पंचनामे पुर्ण करण्याच्या सुचना देखील मुंडे यांनी यावेळी दिल्या आहेत. तसेच दुष्काळ सदृष्य परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पिण्याच्या पाण्याचे, जनावरांच्या चाऱ्याचे नियोजन करणे, शेतकऱ्यांना दिलासा देणे या संदर्भात देखील त्यांनी यावेळी चर्चा केली. या बैठकीस मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, क्रीडा मंत्री संजय बनसोडे, आरोग्य मंत्री तानाजी सावंत, बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, रोजगार हमी मंत्री संदिपान भुमरे, आमदार सतिश चव्हाण तसेच कृषी आयुक्त सुनील चव्हाण, विभागीय आयुक्त, आठही जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच कृषी विभागाचे अधिकारी, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास विभागाचे अधिकारी, पशु संवर्धन विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते.

मराठवाड्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने पिके संकटात आली असून दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी अशा सर्वच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तालुका स्तरापर्यंत जाऊन मराठवाड्यातील सर्वच तालुक्यांचा कंटिन्जन्सी प्लॅन येत्या आठ दिवसाच्या आत तयार करून सादर करावा असे आदेश धनंजय मुंडे यांनी दिले आहेत.

हे सुद्धा वाचा 
एकनाथ शिंदे यांच्याकडून बच्चू कडूंसाठी माजी पंतप्रधानांच्या पत्राला केराची टोपली

कोल्हापूरला जाण्याआधी शरद पवार दुष्काळी माण-खटावमध्ये; प्रभाकर देशमुखांना बळ देणार

गोदावरी, एकदा काय झालं चित्रपटांची राष्ट्रीय पुरस्कारांवर मोहोर; सांगलीच्या शेखर रणखांबेच्या रेखा माहितीपटाला पुरस्कार

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा 17 सप्टेंबर रोजी सुवर्ण महोत्सव पार पडत आहे. यावेळी मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीवर कायमस्वरुपी उपाययोजना करण्यासाठी मंत्रिमंडळाच्या विशेष बैठक छत्रपती संभाजीनगर येथे घेण्यात येणार असून या बैठकीत मराठवाड्यातील विविध योजना, आराखडे सादर करण्याच्या सुचना देखील मुंडे यांनी दिल्या.

सत्कार नको, जबाबदारीने काम करा!

दरम्यान बैठकीच्या सुरुवातीस विभागाच्या वतीने धनंजय मुंडे यांच्यासह सर्वच मंत्र्यांचा सत्कार करण्यात येणार होता. मात्र दुष्काळ सदृश परिस्थिती असल्याने उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी आता स्वागत करण्या ऐवजी जबाबदारीने कामावर भर द्यावा असे म्हणत धनंजय मुंडे यांनी सत्कार स्वीकारण्यास नकार दिला.

 

प्रदीप माळी

Recent Posts

त्वचेसाठी अतिशय फायदेशीर आहे शेंगदाणे, जाणून घ्या फायदे

शेंगदाणे ही एक अशी गोष्ट आहे, जी सर्वांच्याच स्वयंपाकघरात असते. शेंगदाण्याचा अनेक प्रकारे वापर केला…

13 hours ago

युजवेंद्र चहलने वेगळ्या अंदाजामध्ये दिल्या धनश्रीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

भारतीय संघाचा स्टार स्पिनर युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा आज आपला 28 वा वाढदिवस साजरा…

14 hours ago

वजन कमी करण्यापासून ते त्वचा उजळण्यापर्यंत लिंबू पाणीचे आहे अनेक फायदे

वजन कमी करण्यासाठी आणि बॉडी डिटॉक्ससाठी आपण अनेक गोष्टी करून पाहतो. ते वेगवेगळ्या प्रकारच्या आहारापासून…

14 hours ago

गूळ आणि ओवा एकत्र करून खाल्ल्याने बरे होणार अनेक आजार, जाणून घ्या

बदलत्या ऋतूमध्ये गुळाचे सेवन करणे अत्यंत आरोग्यदायी मानले जाते. यामुळे सर्दी-खोकल्यापासून तर आराम मिळतोच, पण…

15 hours ago

Jaykumar Gore Vs Ranjit Deshmukh | रणजीत देशमुख निवडणूक लढविणार का ? | रोखठोक मुलाखत

भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी स्वतःची प्रतिमा जलनायक, पाणीदार आमदार अशी करून घेतली आहे(Will Ranjit…

16 hours ago

Prithviraj Chavan Vs Atul Bhosle | सरकारने काळजी घेतली तर तरूण मुलंही म्हशी पाळतील

भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी स्वतःची प्रतिमा जलनायक, पाणीदार आमदार अशी करून घेतली आहे(If the…

17 hours ago