33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeमनोरंजनगोदावरी, एकदा काय झालं चित्रपटांची राष्ट्रीय पुरस्कारांवर मोहोर; सांगलीच्या शेखर रणखांबेच्या रेखा...

गोदावरी, एकदा काय झालं चित्रपटांची राष्ट्रीय पुरस्कारांवर मोहोर; सांगलीच्या शेखर रणखांबेच्या रेखा माहितीपटाला पुरस्कार

गुरुवारी नवी दिल्लीतील नॅशनल मीडिया सेंटरमध्ये ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या विजेत्यांची घोषणा करण्यात आली. यंदाच्या पुरस्कारांमध्ये मराठी कलाकार आणि चित्रपटांनी बाजी मारली आहे. मराठमोळ्या निखिल महाजन याला ‘गोदावरी – द होली वॉटर’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार देण्यात आला आहे. सांगली जिल्ह्यातील फिल्ममेकर शेखर बापु रणखांबे यांच्या ‘रेखा’ या माहितीपटाला स्पेशल ज्युरी पुरस्कार मिळाला आहे. तसेच सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून डॉ. सलिल कुलकर्णी दिग्दर्शित ‘एकदा काय झाले’ या चित्रपटाची निवड करण्यात आली आहे.

दक्षिण भारतीय सुपरस्टार अल्लू अर्जुन ह्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. बहुचर्चित ‘पुष्पा द राईजिंग’ या चित्रपटातील भूमिकेसाठी हा पुरस्कार त्याला देण्यात आला. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटातील भूमिकेसाठी आलिया भट आणि ‘मीमी’ चित्रपटातल्या भूमिकेसाठी कृती सेनन यांना हा पुरस्कार मिळाला आहे. सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म म्हणून रॉकेट्री- द नंबी इफेक्ट ची निवड करण्यात आली असून बहुचर्चित ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाला राष्ट्रीय एकात्मतेवरील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा नर्गिस दत्त पुरस्कार देण्यात आला आहे.

यावेळी, ‘मीमी’ चित्रपटातील भूमिकेसाठी पंकज त्रिपाठी यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता पुरस्कार देण्यात आला. तसेच, ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटातील भूमिकेसाठी पल्लवी जोशी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला. सरदार उधम सिंग यांच्यावरील बायोपिक असलेल्या ‘सरदार उधम सिंग’ चित्रपटाची निवड सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट म्हणून करण्यात आली. या चित्रपटाने सर्वाधिक पाच पुरस्कार आपल्या नावे केले.

हे ही वाचा 

अजित पवार आमचेच नेते, शरद पवारांचे धक्कादायक विधान; पक्षात कोणतीही फूट नसल्याचा दावा

ब्रिक्सच्या शिखर परिषदेत मोठा निर्णय; या सहा राष्ट्रांचा होणार समावेश

अबब ! आठ इमारती पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्या !!

फिचर फिल्म कॅटेगिरीमधील पुरस्कार

सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म – रॉकेट्री: द नंबी इफेक्ट
सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन – पुष्पा / आरआरआर
सर्वोत्कृष्ट मेकअप आर्टिस्ट – गंगुबाई काठियावाडी
सर्वोत्कृष्ट कॉस्च्युम डिझायनर – सरदार उधम सिंह
सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझायनर – सरदार उधम सिंह
सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझायनर – सरदार उधम सिंग
सर्वोत्कृष्ट एडिटिंग – गंगुबाई काठियावाडी
सर्वोत्कृष्ट अॅक्शन डायरेक्टर पुरस्कार – किंग सॉलोमन)
सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन – RRR (कोरियोग्राफर- प्रेम रक्षित)
सर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्ट्स – आरआरआर (स्पेशल इफेक्ट्स क्रिएटर – व्ही श्रीनिवास मोहन)
सर्वोत्कृष्ट सिनेमेटोग्राफी- सरदार उधम सिंह
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – पल्लवी जोशी (द काश्मीर फाइल्स)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – पंकज त्रिपाठी (मिमी)
सर्वोत्कृष्ट बालकलाकार – भाविन रबारी
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – आलिया भट्ट (गंगुबाई काठियावाडी), कृती सॅनन (मिमी)
सर्वोत्कृष्ट अभिनेता – अल्लू अर्जुन (पुष्पा द राइज)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन – निखिल महाजन (गोदावरी – द होली वॉटर)
विशेष ज्युरी पुरस्कार – शेरशाह राष्ट्रीय एकात्मतेवरील सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट नर्गिस दत्त पुरस्कार – द काश्मीर फाइल्स

सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट – सरदार उधम सिंह
सर्वोत्कृष्ट गुजराती चित्रपट – छेल्लो शो
सर्वोत्कृष्ट कन्नड चित्रपट – ७७७ चार्ली
सर्वोत्कृष्ट मैथिली चित्रपट – समांतर
सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट – एकदा काय झालं
सर्वोत्कृष्ट मल्याळम चित्रपट – होम
सर्वोत्कृष्ट तमिळ चित्रपट – कदाईसी विवासई

नॉन फिचर फिल्म कॅटेगिरीमधील पुरस्कार

सर्वोत्कृष्ट नरेशन वॉइज ओवर आर्टिस्ट- कुलंदा कुमार भट्टाचारजी
सर्वोत्कृष्ट म्युझिक डायरेक्शन-इशान दिवेचा
सर्वोत्कृष्ट एडिटिंग- अभरो बनर्जी (ईफ मेमरी सर्वस मी राइट)
सर्वोत्कृष्ट फिल्म ऑन फॅमिली व्हॅल्यू- ‘चंद सांसे’ (निर्माता चंद्रकांत कुलकर्णी, दिग्दर्शिका प्रतिमा जोशी)

नॉन फीचर स्पेशल मेंशन-

बाले बंगारा-अनिरुद्ध जाटेकर
कारूवाराई – श्रीकांत देवा
द हीलिंग टच-श्वेता कुमार दास
एक दुआ- राम कमल मुखर्जी
सर्वोत्कृष्ट म्युझिक डायरेक्शन नॉन फिचर फिल्म- Succulet
स्पेशल ज्युरी पुरस्कार- रेखा (मराठी) (दिग्दर्शक शेखर बापू रणखांबे)

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी