महाराष्ट्र

धनगर आरक्षण आंदोलनाला सरसेनापती बापुसाहेब कोकरे यांच्या सारख्या नेतृत्वाची गरज

धनगर समाज आरक्षणासाठी लढतोय ताकदीच्या बळावर सत्तांतर घडवून आणले. मात्र, धनगरांच्या आरक्षणाची पहिली कँबीनेट अजुन झालीच नाही. तेंव्हापासून आंदोलने उभी राहतात आंदोलनानंतर कुणाला तरी लाभ होतो. मात्र आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही. सत्ताधारी, विरोधक आणि धनगर समाजाच्या आंदोलना आडुन स्वार्थ साधणारे आरक्षण आंदोलनाचा बट्ट्याबोळ करीत असल्याने धनगर समाज द्विधा मनस्थितीत आहे. अभ्यास समिती,अहवाल हे वेळ मारुन नेणारे अस्त्र सरकारच्या चालुपणाचे लक्षण असुन धनगरांना फसवण्यासाठी ते आकडेवारी आणि शब्दांचा घोळ घालतात त्यात आरक्षणाची लढाई लढणाऱ्या शिलेदारांत एकवाक्यता नसल्याने आरक्षणासाठी उभ्या राहणाऱ्या आंदोलनाची दाहकता आता दिसत नाही. (Dhangar reservation movement needs leadership like Sarsenapati Bapusaheb Kokere)

राज्यातील पत्रकार मुख्यमंत्र्यांना लाडके नाही का? राजा माने यांचा सरकारला सवाल

समाज आंदोलनासाठी उभा राहतो,भरघोस पैसे देतो मात्र निकाल त्याच्या बाजूने लागत नाही तरीही वारंवार उभ्या राहणाऱ्या आंदोलनाकडे तो अपेक्षेने पाहतो मात्र त्याची उपेक्षाच होते.धनगर हा अनुसूचित जमाती आरक्षणाचा लाभार्थी असतांनाही त्यास अजुन आरक्षण मिळाले नाही धनगड म्हणून सवलतीचा खोटा लाभ घेणाऱ्या एका कुटुंबामुळे धनगर आरक्षणाच्या लढाईवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. खरे तर सत्ताधारी आपल्या केंद्रीय नेतृत्वाचा धनगरांचा अन्याय दुर करण्यासाठी उपयोग करु शकतात मात्र धनगरांना सत्तेत वाटा देण्याची मानसिकता बोलण्यात दिसते मात्र कृतीत दिसत नाही.सत्तेत वाटा देण्याचे आश्वासन गेल्या चाळीस वर्षांत प्रत्येक नेत्याकडुन दिले गेले मात्र प्रत्यक्षात पशुसंवर्धन, अपवादात्मक ग्रामविकास खाते सोडले तर कोणतेही चांगले खाते मिळत नाही. धनगरांच्या योजना सत्तेच्या अखेरीस लोकांना सांगुन त्यास तुटपुंजे बजेट दिले जाते ही वस्तुस्थिती धनगर समाजाची आहे. (Dhangar reservation movement needs leadership like Sarsenapati Bapusaheb Kokere)

धनगरांना अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे म्हणून थेट कोर्टात याचिका दाखल करणारे निस्वार्थ नेते स्व.बापुसाहेब कोकरे यांच्या चळवळीचा आदर्श पुढील पिढीने घेतला नाही याची खंत आज कुणालाही वाटत नाही मात्र बी.के.ची जानिव सुरू असलेल्या आंदोलनाच्या निमित्ताने होतेय .यशवंत सेना ही संघटना कोणत्याही मदतीशिवाय चालवून वाढवून अभ्यासपूर्वक लढा त्यांनी दिला.या लढ्याला तीस वर्षे झाले असुन बी.के.च्या निधनानंतर त्यांच्या तत्कालीन लोकाभिमुख कार्याला त्यांचे वारसदार विसरले आहेत. उडंवडी कडेपठार येथील कोकरे वस्तीत जन्माला आलेल्या बापुसाहेब कोकरे नावाच्या सुर्याने धनगर जमातीच्या जीवनात उजेड करायचा प्रयत्न केला मात्र काळोखात जगणारी धनगर जमात बी.के कोकरे यांना विसरुन गटातटात आता विभागलेली दिसत आहे. (Dhangar reservation movement needs leadership like Sarsenapati Bapusaheb Kokere)

Maharashtra Assembly Election 2024: अमित शहा यांनी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांना दिला मोलाचा सल्ला!

यशवंत सेना सरसेनापती स्व.बापुसाहेब कोकरे आज हयात नाहीत मात्र धनगर जमातीला अनुसुचित जमाती आरक्षणाच्या सवलती लागु व्हाव्यात ही बापुसाहेब कोकरे यांची इच्छा होती त्यांनी त्यावेळी यशवंत सेनेचा भंडारनामा (जाहीरनामा) प्रकाशित करुन आपल्या संघटनेचे उदिष्ट्ये जमातीसमोर मांडले होते. केवळ सरकार कडे मागणी करुन चालत नाही तर त्यासाठी प्रत्यक्षात पाठपुरावा करुन सरकारचे नाक दाबावे लागते यासाठी बापुसाहेब कोकरे यांनी पुणे सातारा रस्त्यावरील खंबाटकी घाट अडवुन राज्य सरकारची एकाच आंदोलनात कोंडी केली होती.निवडणुकीपूर्वी धनगरांचे मेळावे घेवुन आरक्षणाचे गाजर दाखवण्याचा उद्योग नेहमीच समाजाला महाग ठरत असल्याने बापुसाहेब कोकरे यांनी दि 25/2/1992 रोजी मुंबई च्या उच्च न्यायालयात अँड ए.के.मोतीवाला यांचेमार्फत आरक्षण केससाठी शपथपत्र दाखल केले होते.धनगर आरक्षणाची जमिनीवरील आणि न्यायालयातील लढाई लढण्याचा बी.के.चा मुत्सद्दीपणा आरक्षण लढ्याला बळ देणारा होता. (Dhangar reservation movement needs leadership like Sarsenapati Bapusaheb Kokere)

मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या धनगर आरक्षण याचिकेचे  पुढे काय झाले हे माहित नाही मात्र बापुसाहेब कोकरे यांनी याचिकेसाठी दाखल केलेले शपथपत्र उपलब्ध असल्याने त्यांच्या आंदोलनाची किमान समाजाला माहिती होतेय.

यशवंत सेनेची धनगर आरक्षणासंबंधातील याचिका एका ध्येयाने प्रेरीत होवुन दाखल केली होती ही बाब अनेक लोकांपासुन अनभिज्ञ होती.बी.के कोकरे यांनी धनगर जमातीला अनुसूचित जमाती आरक्षणाच्या सवलती मिळाव्यात याकरिता 25 जानेवारी 1992 ला मुबंई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेला आज 32 वर्षे होत झाली आहेत.यशवंत सेना 24 मार्च 1988 रोजी फलटणच्या धुळदेव यात्रेत जन्माला आली. या संघटनेला बापुसाहेब कोकरेनी जन्म दिला संघटना मोठी केली पुढे संघटनेला वैचारिक बैठक उपलब्ध करुन दिली.स्वंतत्र ठेवलेल्या यशवंत सेनेचे बोध चिन्ह हे ‘ध्वजधारी अश्व “असुन संघटनेत सतर्क आणि सतत कष्ट घेणारा कार्यकर्ता असावा या करिता हे बोधचिन्ह तयार करण्यात आले होते.धनगरांच्या शक्तीचे प्रतिक असलेले दैवत बिरोबा आणि खंडोबा यशवंत सेनेच्या ब्रीद वाक्यात असुन आदर्श अशी घटना आणि सुसंगत कार्यकारिणी असलेली यशवंत सेना धनगर समाजाची ” MASTER KEY” होती.यशवंत सेना या संघटनेने धनगर जमातीच्या सामाजिक ,राजकीय, शैक्षणिक न्यायासाठी सतत संघर्ष केला असुन काळाप्रमाणे स्वकर्तुत्वाने कार्यतत्परता दाखवलेली आहे. (Dhangar reservation movement needs leadership like Sarsenapati Bapusaheb Kokere)

यशवंत सेना सरसेनापती बापुसाहेब कोकरे यांची 5 जानेवारी 1991 च्या रेल्वेमैदान पंढरपूर येथील मेळाव्याने अपरिमित बदनामी केलेली असुन त्यांना खुलासा करण्याची संधी भविष्यात मिळाली नाही तसेच तत्कालीन पुढा-यांनी हेतु साध्य करण्यासाठी मिळु दिली नाही हे वास्तव असुन यशवंत सेनेच्या माध्यमातुन बापुसाहेब कोकरे यांनी पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, खान्देश,मराठवाडा आणि कोकण या पाचही विभागात संघटना बाधंणी केली होती.त्यात कार्यकर्ते हाडाचे आणि जिवाला जिव देणारे होते.म्हणुनच यशवंत सेना अल्पकाळात संबंध राज्यभर पसरली होती. (Dhangar reservation movement needs leadership like Sarsenapati Bapusaheb Kokere)

तत्कालीन सर्वच पुढारी बी.के.च्या हालचालीवर लक्ष ठेवुन होते तरीही बी.के.कोकरेंच्या योजनेचा थागंपत्ता भल्याभल्यांना लागत नव्हता हेच त्यांच्या सामाजिक वाटचालीतील न सुटलेले कोडे आहे. केवळ न्यायासाठी लढण्या-या या क्रांतिवीराने बारामतीला 28 डिसेबंर 2005 रोजी अखेरचा निरोप घेतला. बी.ई केमिकल गोल्ड मेडिलिस्ट झालेला तरुण धनगर समाजासाठी स्वतः रस्त्यावरील लढाई लढला आणि जाता जाता समाजाला बंडाची भाषा शिकवून गेला.त्यांच्या अकाली निधनाने धनगर आंदोलन पोरके आणि नेतृत्वहीन झाले ते कायमचेच. (Dhangar reservation movement needs leadership like Sarsenapati Bapusaheb Kokere)

-रामभाऊ लांडे,अंबड

काजल चोपडे

Recent Posts

बांगलादेशसोबतच्या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी कोहली-गंभीरचा व्हिडिओ आला समोर

चेन्नईत बांगलादेशसोबतच्या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक गौतम…

7 hours ago

प्लॅस्टिक की लाकडी, केसांच्या आरोग्यासाठी कोणता कंगवा चांगला?

आपण नेहमी आपल्या केसांची खूप काळजी घेतो. त्यासाठी आपण महागडे तेल आणि  शॅम्पूचा वापर करतो.…

9 hours ago

3 वर्षांपासून पाहत आहे चांगल्या कामाची वाट… आहाना कुमराने केला बॉलीवूडबाबत मोठा खुलासा

अभिनेत्री आहाना कुमराने टीव्ही आणि ओटीटीवर काम केल्यानंतर चित्रपटसृष्टीत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. पण…

9 hours ago

अब्दू रोजिकचे लग्न झाले रद्द, या कारणामुळे तुटलं नातं

बिग बॉस 16 फेम अब्दु रोजिकने त्याचे लग्न रद्द केले आहे. अब्दूने या वर्षी जाहीर…

10 hours ago

पाठीचा कणा मजबूत आणि लवचिक करण्यासाठी रोज करा ‘हे’ व्यायाम

आजच्या व्यस्त जीवनामुळे आणि झपाट्याने बदलत चाललेल्या जीवनशैलीमुळे मणक्याशी संबंधित समस्या अगदी सामान्य झाल्या आहेत.…

11 hours ago

फ्लटर किक्स व्यायामामुळे पायाचे स्नायू होतात मजबूत, जाणून घ्या

आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी आपण आपल्या दैनंदिन जीवनशैलीमध्ये योग आणि व्यायामाचा समावेश केला पाहिजे. बहुतेक…

12 hours ago