महाराष्ट्र

डोंगराला तडे, निवासी बेजार, पोलिसांच्या मदतीने नदी केली पार

टीम लय भारी
कराड : ढेबेवाडी विभागातील धनावडेवाडी, शिंदेवाडी व जितकरवाडी भागातील डोंगरांना तडे गेल्याने स्थानिकांमध्ये चिंतेचे वातावरण तयार झाले आहे. (Dhebewadi people to relocate in mangalam karyalaya due to broken houses caused by cracked mountains)

पावसाची सततची रिपरिप, नदीला ओसंडून वाहणारे पाणी आणि डोंगराला गेलेले तडे आणि त्यामुळे घरांना पाडलेल्या भेगा पाहून येथील गावातील नागरिक धास्तावून गेले.

चिपळूण शहर स्वच्छतेसाठी 2 कोटी रुपयांच्या निधीची नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

 

डोंगराला तडे, निवासी बेजार, पोलिसांच्या मदतीने नदी केली पार

कृणाल पंड्याला कोरोनाची बाधा, दुसरा T20 सामना बुधवारी होण्याची शक्यता

मागचे तुटके डोंगर व पुढ्यात दुथडी भरून वाहणारी नदी आणि त्यावरचा तुटका पूल यामुळे गावकरी धोकादायक परिस्थितीत कोंडले गेले होते.शुक्रवारी सकाळी पावसाला थोडी उघडीक मिळाल्याने 32 कुटुंबातील 80 लोकांनी स्थलांतर केले आहे.

घरे गळकी, सोबत लहान मुले, मोबाईलला नेटवर्क नाही, वीज पुरवठा खंडित अशा परिस्थितीत मराठवाडी धरणाच्या कुशीतील गावकऱ्यांनी तुटक्या पुलाला शिड्या लावून आणि नदीच्या छातीभर पाण्यातून मानवी साखळी तयार करत ढेबेवाडी गावात स्थलांतर केले आहे.

स्थानिक प्रशासन व पोलीस यांनी या कामात लोकांना स्थलांतरित करण्यात मदत केली आहे. ढेबेवाडी येथील मंगलम कार्यालयात या स्थानिकांची निवासाची व्यवस्था केली गेली आहे. मंगल कार्यालयाच्या मालकाने सर्व सोयी विनामूल्य उपलब्ध करून दिलेल्या आहेत.

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावले आमदार रोहित पवार

Maharashtra: How one city avoided worst of India floods

सहायक पोलिस निरीक्षक संतोष पवार, मंडल अधिकारी प्रवीण शिंदे यांच्यासह तलाठी डी.डी डोंगरे,ग्रामसेवक थोरात,दीपक सुर्वे,पोलीस कर्मचारी नवनाथ कुंभार, कपिल आगलावे, गणेश शेळके, होमगार्ड आशिष पुजारी, संग्राम देशमुख, स्वप्नील पानवळ, शुभम कचरे, विशाल मोरे यांच्या टीमने तसेच उमरकांचनचे मनोज मोहिते आणि शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र जानुगडे स्थानिक ग्रामस्थ व युवक कार्यकर्ते यांनी स्वतः वाहत्या पाण्यात उतरून मदतकार्य राबविले. व स्थानिकांना सुरक्षित जागी पोहोचविले.

यावेळी शंकर पवार , प्रदीप भिसे, पराग ढोले, संभाजी कानवटे,राधेश्याम खांडेकर यांनीही सहकार्य केले. शिवाजीराव देसाई चॅरिटेबल ट्रस्टतर्फे युवा नेते यशराज देसाई यांनी जीवनावश्यक साहित्याचे किट, ब्लॅंकेट अशी मदत स्थलांतरित कुटुंबांसाठी केली. अशाप्रकारे बऱ्याच लोकांनी त्यांना मदत केली आहे.

Mruga Vartak

Recent Posts

NEET बद्दल बोलताच राहुल गांधींचा माईक बंद करण्यात आला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल…

2 days ago

आणीबाणीमुळे देशाचा फायदा झाला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये आणीबाणी ह्या विषयावर सखोल…

2 days ago

मोदी सरकारची थापेबाजी, GST ची केली भजी !

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे(PM Narendra Modi and GST).सदर व्हिडीओमध्ये…

2 days ago

देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या आमदाराची दादागिरी !

लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…

1 week ago

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…

1 week ago

तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात

सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…

1 week ago