28.1 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रचिपळूण शहर स्वच्छतेसाठी 2 कोटी रुपयांच्या निधीची नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची...

चिपळूण शहर स्वच्छतेसाठी 2 कोटी रुपयांच्या निधीची नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

टीम लय भारी
चिवळूण : शहर आणि बाजारपेठांची मंत्र्यांकडून पाहणी झाल्यानंतर चिपळूणला पुन्हा उभे करण्यासाठी 5 मुख्याधिकाऱ्यांना नियुक्त करणार त्याच बरोबर ठाणे आणि नवी मुंबईतून सफाई कामगारांच्या तुकड्या चिपळूण येथे पाठवण्यात येणार आहेत. (Shinde announced 2 crore for repairs and cleanliness drives)

पुरग्रस्तांच्या जीवनावश्यक गरजांसाठी दैनंदिन जीवनात लागणाऱ्या वस्तूंचे किट सुद्धा मोठया प्रमाणात वितरित केले जाणार आहेत.

कृणाल पंड्याला कोरोनाची बाधा, दुसरा T20 सामना बुधवारी होण्याची शक्यता

प्रशांत किशोर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्या चर्चांना दिला पूर्णविराम

शहरात अनेक भागात 20 फुटांपेक्षा पाणी वाढल्याने कित्येक घरे च्या घरे पाण्याखाली गेली आहेत. त्याचबरोबर एकही गोष्ट वापरण्याजोगी न राहिल्याने आणि कित्येक वस्तू वाहून गेल्याने अतोनात नुकसान झाले आहे. दुर्गंधी पसरली आहेच पण त्यामुळे रोगराई पसरू नये यासाठी काळजी घेण्यात येईल. त्यासाठी अनेक स्वच्छता पथके चिपळूण येथें रवाना झाली आहेत.

Shinde
नगरविकास मंत्री शिंदे यांनी आज जाऊन पाहणी केली

शहरात अनेक ठिकाणी साचलेले कचऱ्याचे ढीग हटवण्यासाठी मनुष्यबळ कमी पडते आहे. त्यामुळे त्या साठी सुद्धा इतर जिल्ह्यातून माणसे पाठवण्यात येणार आहेत.

यावेळी शिंदे म्हणाले चिपळूण शहराला वशिष्ठी नदी पासून कायमस्वरूपी धोका आहे. तर त्यासाठी काही उपाय योजना करण्यासाठी बोटी, लाईफ जॅकेट, यासारखे सामान खरेदी करावयाचे आहे.

चिपळूण शहर स्वच्छतेसाठी 2 कोटी रुपयांच्या निधीची नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
नगरविकास मंत्री शिंदे यांनी आज जाऊन पाहणी केली

यासाठी शासनाला प्रस्ताव पाठविणेचे आदेश त्यांनी महाड मुख्याधिकाऱ्यांकडे केली. यावेळी रत्नागिरी चे पालक मंत्री उदय सामंत, चिपळूण चे आमदार भास्कर जाधव, माजी आमदार सदानंद चव्हाण, जिल्हाप्रमुख सचिन कदम आणि स्थानिक अधिकारी व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

आपले कर्तव्य बजावून आमदार भास्कर जाधव यांची मुख्यमंत्र्यांना वाढदिवसानिमित्त अजब भेट

Maharashtra: How one city avoided worst of India floods

शिवसेनेकडून येथील भागांत एक अनोखा उपक्रम राबविण्यात आलेला असून तो नक्कीच कौतुकास्पद आहे. अनेक वाहने वाहून गेली तर कित्येक दुचाकी चिखलात रुतल्याने नादुरुस्त झाल्या. अशा दुचाकी विनामूल्य दुरुस्त शिवसेनेकडून देण्यात येणार आहेत.

ठाण्यातील नगरसेवक राजेश मोरे यांनी या कामासाठी सर्व गरजेचे साहित्य विनामूल्य उपलब्ध करून दिले आहे तर, स्थानिक शिवसेना उपविभाग प्रमुख बालाजी कांबळे यांनी यासाठी मेहनत घेतली आहे.

नगरविकास मंत्री शिंदे यांनी आज जाऊन पाहणी केली असता आजच्या दिवसात 15 दुचाकी दुरुस्त झाल्या आहेत असे समजते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी