महाराष्ट्र

कारागृहातील हालचालींवर आता ड्रोन कॅमेऱ्यांची नजर !

राज्यातील कारागृहांवर आता ड्रोनद्वारे नजर ठेवली जाणार आहे. त्यामुळे कारागृहातील अंतर्गत सुरक्षितता आणि कैद्यांच्या हालचालीवर बारीक नजर ठेवण्यासाठी मदत होणार आहे. पहिल्या टप्प्यात १२ ठिकाणी ड्रोन कॅमेराद्वारे पेट्रोलिंग केले जाणार असल्याची महिती राज्याचे तुरुंग महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांनी “लय भारी” शी बोलताना दिली.

ते म्हणाले, कारागृहातील अंतर्गत सुरक्षेचा प्रश्न महत्वाचा होता. कैद्यांच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी मनुष्यबळाचा वापर करणे शक्य नाही. त्यामुळे कारागृहाची सुरक्षा आणखी बळकट करून कैद्यांच्या स्रर्व हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी राज्यसरकारने ड्रोनद्वारे नजर ठेवण्याचा प्रयोग सुरू केला आहे. त्यानुसार १२ ठिकाणी अंतर्गत सुरक्षेसाठी ड्रोन कॅमेऱ्यांची मदत घेतली जाणार असून कारागृहातील बारीक गोष्टींवर नजर ठेवली जाणार आहे.

या ड्रोनद्वारे रात्रीच्या वेळीही चित्रीकरण करण्यात येणार आहे. विशेषतः कारागृहात होणाऱ्या घटना आणि कैद्यांच्या संपूर्ण हालचाली टिपण्यास मदत होणार आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने दिलेल्या आदेशानुसार महाराष्ट्र सरकारने प्रायोगिक तत्त्वावर येरवडा मध्यवर्ती कारागृह, कोल्हापूर, नाशिक, संभाजीनगर, तळोजा, ठाणे , अमरावती, नागपूर, कल्याण आणि चंद्रपूर याठिकाणी ड्रोनचा वापर सुरू केला असल्याची माहिती अमिताभ गुप्ता यांनी दिली.

हे सुध्दा वाचा :

मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर एकच गर्दी होते तेव्हा…

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्ट नेमका काय निकाल देणार? जाणून घ्या !

कार्यकर्त्यांच्या तक्रारींसाठी भाजपच्या प्रदेश कार्यालयात तक्रारपेटी !

उत्तरप्रदेश राज्याने देशात सर्वप्रथम कारागृह सुरक्षेसाठी ड्रोनचा वापर सुरू केला. ड्रोनचा वापर सुरू करणारे महाराष्ट्र हे दुसरे राज्य बनले असल्याची माहिती त्यांनी दिली. प्रायोगिक तत्त्वावर ८ मध्यवर्ती कारागृह, २ जिल्हा कारागृह आणि २ खुल्या कारागृहांवर ड्रोनची नजर ठेवली जाणार असल्याचे गुप्ता यांनी सांगितले.

Team Lay Bhari

Recent Posts

शेअर ट्रेडिंगमध्ये नफा मिळवून देण्याच्या आमिषाने साडेसतरा लाखांची फसवणूक

शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करून जादा नफा  कमावण्याचे आमिष दाखवून अज्ञात व्हॉट्सअ‍ॅपधारक इसमाने एका जणाची १७…

17 hours ago

10 हजारांची लाच घेताना उपशिक्षकासह मुख्याध्यापक एसीबीच्या जाळ्यात

16 हजारांची लाच (bribe) मागून पहिला हप्ता म्हणून 10 हजारांची लाच घेताना उप शिक्षकासह मुख्याध्यापकास…

17 hours ago

बीसीसीआय च्या, इंटर एन सी ए स्पर्धेसाठी साहिल पारखची इंडिया बी संघात निवड

नाशिक जिल्हा क्रिकेट (Cricket) असोसिएशनचा युवा खेळाडू आक्रमक डावखुरा सलामीवीर साहिल पारख (Sahil Parakh) याची…

17 hours ago

नाशिक जिल्हा न्यायालयातील सहायक अधीक्षक ‘एसीबी’च्या जाळ्यात

दिवाणी दाव्याचे प्रकरण दाखल केल्यावर कोर्ट फी स्टॅम्पची रक्कम काढून देण्यासाठी तक्रारदाराकडून पाचशे रुपयांची लाच…

17 hours ago

बिल्डरपुत्रास जीवे मारण्याची धमकी; सराईताने मागितली ‘इतक्या’ लाखांची खंडणी

भूखंड  विक्रीचा तगादा लावणाऱ्या सराईत गुन्हेगाराने बिल्डरकडे वीस लाख रुपयांची खंडणी (ransom) मागितल्याचा प्रकार वसंत…

17 hours ago