30 C
Mumbai
Friday, May 10, 2024
Homeमंत्रालयमंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर एकच गर्दी होते तेव्हा...

मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर एकच गर्दी होते तेव्हा…

अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळण्यासाठी मंत्रालयाचे उंबरठे झिजवूनही काहीच फायदा झाला नाही, असे गाऱ्हाणे घेऊन काही बेरोजगार तरुण आले होते. नगरविकास, सामाजिक न्याय, परिवहन, ऊर्जा, वन अशा कितीतरी खात्यांमधील नोकरीच्या समस्या घेऊन नागरिक जनता दरबारमध्ये आले होते. मुख्यमंत्री शिंदे आपल्या सुरक्षेचा गराडा तोडून नागरिकांशी बोलत होते. त्यांची निवेदने स्वीकारून अडचणी समजून घेत होते.

मंत्रालयातील सहावा मजला..सायंकाळी ७ वाजताची वेळ…भेटणाऱ्यांची एकच गर्दी..कारण होते, मुख्यमंत्र्यांचा जनता दरबार..! सगळ्यांनाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांना भेटायचे होते. अचानक केबिनमधून मुख्यमंत्री बाहेर येतात. गर्दीला सामोरे जाताना मनात जराही अविर्भाव नाही. जनतेची निवेदने स्वीकारली जातात. त्यातील काहींचा गंभीर प्रश्न समजून घेऊन मुख्यमंत्री शिंदे लगेच फोन हाती घेऊन संबंधित अधिकाऱ्यांशी बोलतात. गेले कित्येक महिने मंत्रालयात हेलपाटे मारूनही काम झाले नाही, पण सीएम साहेबांनी फोन केल्याने चुटकीसरशी प्रश्न सुटला, असे समाधानाचे बोल उमटतात.

मंत्रालयात बुधवारी मंत्रिमंडळाची साप्ताहिक बैठक होती. ही बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या दालनासमोरील सभागृहात जनता दरबार ठेवलेला होता. त्यामुळे सहाव्या मजल्यावर एकच गर्दी झाली होती. कोविड काळात आरोग्य सेवक म्हणून बारावी उत्तीर्ण असलेल्या शेकडो बेरोजगारांना रुग्णालयात रोजगार मिळालेला होता. मात्र, कोविड संपताच त्यांना कामावरून कमी करण्यात आले. दुसऱ्या ठिकाणी प्रयत्न करूनही नोकरी मिळाली नाही. त्यामुळे जुनी नोकरी पुन्हा मिळेल, या आशेने ३२ आरोग्यसेवक मुख्यमंत्र्यांकडे फिर्याद घेऊन आले होते. मुख्यमंत्र्यांनी त्यांना निराश केले नाही. त्यांच्या प्रश्नाबाबत सार्वजनिक आरोग्य विभागातील संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी लगेच संवाद साधून या आरोग्यसेवकांना पुन्हा कामावर घेण्याचे आदेश दिले.

अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळण्यासाठी मंत्रालयाचे उंबरठे झिजवूनही काहीच फायदा झाला नाही, असे गाऱ्हाणे घेऊन काही बेरोजगार तरुण आले होते. नगरविकास, सामाजिक न्याय, परिवहन, ऊर्जा, वन अशा कितीतरी खात्यांमधील नोकरीच्या समस्या घेऊन नागरिक जनता दरबारमध्ये आले होते. मुख्यमंत्री शिंदे आपल्या सुरक्षेचा गराडा तोडून नागरिकांशी बोलत होते. त्यांची निवेदने स्वीकारून अडचणी समजून घेत होते. लोकांच्या समस्येनुसार संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करीत होते. तब्बल दोन तास मुख्यमंत्र्यांचा जनता दरबार चालला. बंदोबस्तासाठी तैनात पोलीस गर्दीला आवर घालत नागरिकांची मुख्यमंत्र्यांशी भेट घालून देत होते. मुख्यमंत्र्यांनी आमच्या प्रश्नांची दखल घेतली. निवेदन स्वीकारून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली, आमच्यासाठी ही अत्यंत समाधानाची बाब असल्याची प्रतिक्रिया जनता दरबारमध्ये आलेल्या काही नागरिकांनी व्यक्त केली.


हे सुध्दा वाचा :

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्ट नेमका काय निकाल देणार? जाणून घ्या !

मंत्रिमंडळ बैठकीतील हे आहेत महत्त्वाचे निर्णय

मारामारी करुन फरार झाला, पोलिसांनी 35 वर्षांनंतर मुसक्या आवळल्या

मुख्यमंत्र्यांच्या भेटीमुळे तिच्या चेहऱ्यावर समाधान..!

आसनगाव येथील ज्योती डेहरकर ही महिला कंत्राटी पद्धतीने वन विभागात काम करीत होती. मात्र, तिला अचानक कामावरून काढून टाकण्यात आले. पुन्हा रोजगार मिळण्यासाठी तिने खूप प्रयत्न केले, पण तिला यश मिळाले नाही. त्यामुळे आज ती मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर मुख्यमंत्र्यांचे दालन शोधत आली होती. मुख्यमंत्र्यांपर्यंत निवेदन गेल्यामुळे माझे काम नक्कीच होईल, अशी आशा तिने व्यक्त केली.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी