महाराष्ट्र

Eknath Shinde : एकनाथ शिंदे रात्री आठ वाजता सुद्धा सामान्य लोकांना भेटतात

मंत्रालयातील सहाव्या मजल्यावर अभ्यागतांची संख्या गेल्या काही दिवसांपासून वाढली आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यांतून आलेल्या सामान्य नागरीकाला आस असते ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीची. मुख्यमंत्री देखील या जनतेची भेट घेतल्याशिवाय मंत्रालय सोडत नाही. शुक्रवारी ७ ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठ पर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सामान्यांना भेट होते. योगायोगाने काल मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील सरकारला शंभर दिवस झाले त्यावेळी सर्वसामान्यांना दिलासा देण्याची मुख्यमंत्र्यांची तळमळ दिसून आल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.

मी सामान्यांचा मुख्यमंत्री आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कायम सांगत असतात. त्याची प्रचिती त्यांच्या कार्यशैलीतून दिसून येते. सामन्यांमध्ये त्यांच्याविषयी असलेले कुतूहल, आपुलकी आणि आपल्यातले मुख्यमंत्री यामुळे त्यांना भेटायला आलेल्यांमध्ये शहरी, ग्रामीण भागातील महिला, पुरुष, युवा वर्गाची संख्या मोठ्या प्रमाणावर दिसून येते. हल्ली मंत्रालयात अभ्यागतांची वाढती संख्या ही विशेषतः मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशी जास्त आढळून येत आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्र्यांना भेटण्यासाठी नागरिक येत आहेत. त्यांची निवेदने स्वीकारून म्हणणे ऐकून घेतले जाते आहेत, त्यामुळे नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधानाची भावना असल्याचे देखील सांगितले जात आहे.

हे सुद्धा वाचा

Eknath Shinde: शिंदे गटाचा कार्यकर्ता दसरा मेळाव्याला आला, पण….

Delhi Detention Policy : मुलांना 8वी पर्यंत पास करण्याच्या निर्णयात बदल; दिल्ली सरकारचा मोठा निर्णय

BMC News: मुंबई महानगरपालिकेने दुकानदारांना मराठी पाटया लावण्यासाठी दिली 10 दिवसांची मुदत

शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास मुख्यमंत्री एकनातच शिंदे यांनी मंत्रालयात प्रवेश केल्याची माहिती आहे. त्यानंतर ते दिवसातील नियाजित कार्यक्रमाचा आढावा घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी नियोजित परिवहन विभाग, मीरा भाईंदर महापालिका विकास कामांचा आढावा, कोळी बांधवांच्या समस्यांबाबत बैठका घेतल्या. त्यानंतर विले पार्ले येथे नियोजित कार्यक्रम होता. त्यासाठी मंत्रालयाबाहेर पडण्यापूर्वी त्यांनी अभ्यागतांच्या भेटी घेतल्या. तोपर्यंत सायंकाळचे पावणे आठ वाजले होते. आपल्याला भेटायला समिती कक्षाबाहेर किमान दीडशे ते दोनशे नागरिक उपस्थित असल्याचे त्यांना कळले.

नियोजित कार्यक्रम असला तरी सामान्यांना न भेटताच कस जायचं म्हणून त्यांनी सगळ्यांना भेटायचं ठरवलं. त्यानंतर सहाव्या मजल्यावरील समिती कक्षात मुख्यमंत्री आले. त्यांनी प्रत्येकाची भेट घेतली. निवेदने स्वीकारली त्यावर सबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसाठी सूचनाही लिहिल्या. मुख्यमंत्री एवढ्या उशिराही मुख्यमंत्री भेटताहेत हे पाहून त्यांना भेटून बाहेर पडणाऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत होते. नंतर रात्री नऊच्या सुमारास मुख्यमंत्री मंत्रालयातून नियोजित कार्यक्रमाला रवाना झाले.

प्रणव ढमाले

Recent Posts

देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या आमदाराची दादागिरी !

लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…

4 days ago

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…

5 days ago

तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात

सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…

5 days ago

डॉ. सुजय विखे पाटलांचे गिरे तो भी टांग उपर

डॉ. सुजय विखे पाटील यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झालाय(Dr. Sujay Vikhe Patil has been defeated…

7 days ago

छगन भुजबळ यांनी एका धनगर नेत्याला संपवलं होतं

उपमुख्यमंत्री व गृहमंत्री असताना छगन भुजबळ यांनी तेलगी घोटाळा केला होता. यांत भुजबळ यांनी नाहक…

7 days ago

छगन भुजबळ ओबीसी चळवळीचा वापर स्वतःचा भ्रष्टाचार बळकट करण्यासाठी करतात

भुजबळ(Bhujbal) ज्या ज्या खात्यात गेले, त्या त्या खात्यात त्यांनी यथेच्छ भ्रष्टाचार केलेला आहे. सार्वजनिक बांधकाम…

7 days ago