35 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
HomeमुंबईEknath Shinde: शिंदे गटाचा कार्यकर्ता दसरा मेळाव्याला आला, पण....

Eknath Shinde: शिंदे गटाचा कार्यकर्ता दसरा मेळाव्याला आला, पण….

गणेश सुंदर सकपाळ असे बेपत्ता झालेल्या कार्यकर्त्याचे नाव आहे. ते शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी मुंबईत आला होते. शिंदे गटाकडून आरक्षित करण्यात आलेल्या एसटी बसने ते बीकेसी मैदानावर आले होते. मात्र मेळावा संपल्यानंतर त्यांच्या गणेश यांच्या सहकाऱ्यांना ते दिसून आले नाहीत, त्यामुळे त्यांनी त्यांचा शोध घेतला. मात्र गणेश सहकाऱ्यांना सापडले नाहीत

शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच शिवसेनेचे दोन दसरा मेळावे मुंबईत झाले. उद्धव ठाकरे यांच्या गटाचा मेळावा परंपरेप्रमाणे शिवाजी पार्कवर, तर एकनाथ शिंदे यांच्या गटाचा मेळावा बीकेसीच्या मैदानावर पार पडला. या दोन्ही मेळाव्यासाठी राज्यातून समर्थकांनी हजेरी लावली होती. असाच एकनाथ शिंदे गटाचा समर्थक कार्यकर्ता शिंदे गटाच्या मेळाव्यासाठी पोलादपूर (रायगड) येथून मुंबईत आला होता. मात्र तो कार्यकर्ता घरी परतलाच नाही.

गणेश सुंदर सकपाळ असे बेपत्ता झालेल्या कार्यकर्त्याचे नाव आहे. ते शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी मुंबईत आला होते. शिंदे गटाकडून आरक्षित करण्यात आलेल्या एसटी बसने ते बीकेसी मैदानावर आले होते. मात्र मेळावा संपल्यानंतर त्यांच्या गणेश यांच्या सहकाऱ्यांना ते दिसून आले नाहीत, त्यामुळे त्यांनी त्यांचा शोध घेतला. मात्र गणेश सहकाऱ्यांना सापडले नाहीत. आता दोन दिवस झाले तरी देखील गणेश यांचा अद्याप कोणताही ठावठीकाणा लागलेला नाही. बेपत्ता गणेश सकपाळ यांचा शोध घेण्यासाठी रामदास सकपाळ यांनी सोशल मिडीयावर ७५८८७१३८०३, ८८३००७५५७७ या फोन नंबरवर संपर्क करण्याचे अवाहन केले आहे.

हे सुद्धा वाचा –

BMC News: मुंबई महानगरपालिकेने दुकानदारांना मराठी पाटया लावण्यासाठी दिली 10 दिवसांची मुदत

Delhi Detention Policy : मुलांना 8वी पर्यंत पास करण्याच्या निर्णयात बदल; दिल्ली सरकारचा मोठा निर्णय

Life Insurance Tax : कर वाचवण्याचा पर्याय असणाऱ्या जीवन विम्यावर लागू शकतो टॅक्स! जाणून घ्या कसा…

शिंदे गटाने बीकेसी मैदानावर भव्य स्वरुपात दसरा मेळाव्याचे आयोजन केले होते. राज्यभरातून कार्यकर्त्यांसाठी वाहनांची व्यवस्था देखील केली होती. तसेच कार्यकर्त्यांना जेवन-खाण्याची देखील व्यवस्था केली होती. मेळावा भव्य दिव्य व्हावा यासाठी चोख नियोजन करण्यात आले होते. दरम्यान राज्यभरातून या मेळाव्यासाठी कार्यकर्ते मुंबईतील बिकेसी मैदानावर आणले होते. रायगड जिल्ह्यातील पोलादपूर येथील शिंदे समर्थक असलेले गणेश सकपाळ देखील बसमधून बिकेसी मैदानावर सभा ऐकण्यासाठी आले होते. मात्र ते मेळाव्याला आल्यानंतर बेपत्ता झाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी