महाराष्ट्र

गोपीचंद पडळकर यांनी आता सर्वोच्च न्यायालयाच्याही विरोधात दंड थोपटले

टीम लय भारी

मुंबई : शरद पवार, उद्धव ठाकरे अशा रथी – महारथी नेत्यांना आमदार गोपीचंद पडळकर सतत ठणकावत असतात. आता तर त्यांनी थेट सर्वोच्च न्यायालयालाच आव्हान दिले आहे. महाराष्ट्रात बैलगाडी शर्यत प्रसिद्ध आहे. तामिळनाडूमध्ये याच पद्धतीने जलिकट्टू प्रसिद्ध आहे. देशभरातील अशा बैलगाडा शर्यतींवर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातलेली आहे (Gopichand Padalkar has now dropped the fine against the Supreme Court as well).

सर्वोच्च न्यायालयाची ही बंदी धुडकावणारी भूमिका आमदार गोपीचंद पडळकर यांनी घेतली आहे. त्यांनी छकडा शर्यतीची घोषणा केली आहे. ‘भव्य छकडा गाडी शर्यत’ या नावाखाली त्यांनी बैलगाडा शर्यतीची घोषणा केली आहे. ‘शेतकऱ्यांचा प्राण असणाऱ्या सर्जा, राजा, परशा व लक्ष्या’साठी ही शर्यत आयोजित केल्याचे त्यांनी प्रचारपत्रकात नमूद केले आहे. पारंपरिक पद्धतीने ही शर्यत होईल, असेही या प्रचारपत्रकात म्हटले आहे.

गोपीचंद पडळकर भाजप प्रदेशाध्यक्ष पदाच्या शर्यतीत, चंद्रकांत पाटलांची घेणार जागा !

गोपीचंद पडळकर यांना राष्ट्रवादीचा इशारा; पवारांवर बोलाल तर ‘प्रसाद’ मिळेल

राज्यभरातील शेतकऱ्यांनी या शर्यतीत सहभागी व्हावे, असेही त्यांनी आवाहन केले आहे. शर्यतीत पहिल्या ४ विजेत्यांना बक्षिसे दिली जाणार आहेत. पहिले बक्षिस – १ लाख ११ हजार १११ रुपयांचे आहे. दुसरे ७७ हजार ७७७ रूपये, तिसरे ५५ हजार ५५५ रुपये, तर तिसरे बक्षिस २२ हजार २२२ रुपयांचे आहे (Gopichand Padalkar said that farmers from all over the state should participate in this race).

गोपीचंद पडळकरांनी छकडा शर्यतीची घोषणा केली

गोपीचंद पडळकर शेर, त्यांचे कार्यकर्ते सव्वाशेर !

Pune: 12 arrested after cops bust illegal bullock cart race in Katraj

शेतकऱ्यांची मने जिंकण्याचा प्रयत्न

ग्रामीण भागात, विशेषतः शेतकरी वर्गात बैलगाडा शर्यत कमालीची लोकप्रिय आहे. न्यायालयीन आदेशामुळे बैलगाडा शर्यतीवर बंदी आहे. पण बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू व्हावी ही शेतकरी वर्गाची मागणी आहे. बैलगाडा शर्यत आयोजित केल्यामुळे गोपीचंद पडळकर यांना शेतकरी डोक्यावर घेतील. हीच बाब ध्यानी घेऊन पडळकर यांनी छकडा शर्यतीची घोषणा केल्याचे बोलले जात आहे (Gopichand Padalkar tries to win the hearts of farmers).

Sagar Gaikwad

Recent Posts

राज्यपालांच्या हस्ते होणार राज्याच्या कृषी पुरस्कारांचे वितरण; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यात कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती,…

9 hours ago

महिला T20 WC 2024 चे वेळापत्रक आले समोर, या दिवशी खेळला जाणार पाकिस्तान विरुद्ध सामना

3 ऑक्टोबरपासून देशभरात नवरात्री उत्सव सुरु होणार आहे. याच दिवशी महिला T20 विश्वचषक 2024 स्पर्धा…

9 hours ago

यशवंतराव चव्हाणांच्या निकटवर्तीयाचे शब्द | शरद पवार हेच खरे यशवंत विचाराचे वारसदार | अजित पवार नाटकी

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

10 hours ago

काळी मिरी, पिंपळी आणि सुंठ सेवन केल्याने होणार अनेक फायदे

बदलत्या ऋतूमध्ये लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यापैकी सर्दी, खोकला आणि शिंका येणे ही…

11 hours ago

Atul Bhosale | Jaykumar Gore | Madan Bhosale | आयारामांनी भाजपची संस्कृती बिघडवली | निष्ठावंत कडाडले

लय भारी चे संपादक तुषार खरात हे महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघाचे दौरे करत करत ते…

11 hours ago

मासिक पाळी दरम्यान तीव्र वेदना कमी करण्यासाठी करा हे व्यायाम

मासिक पाळीच्या काळात अनेक महिलांना असह्य वेदना, पेटके आणि पचनाच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.…

13 hours ago