जाती-धर्माच्या नावे विभाजन करणारे सावरकर, गोळवलकर, हेडगेवार, देवरस, मोदी हे आऊटडेटेड; छत्रपती शिवराय तर आजही आदर्श!

छत्रपती शिवाजी महाराज खरेच आऊटडेटेड झाले आहेत का? महाराजांचे विचार, आचरण आणि प्रेरणा हे आज कालसुसंगत की कालबाह्य, यावर दोन संपादकांनी केलेली ही अभ्यासपूर्ण चर्चा. लयभारीचे व्यवस्थापकीय संचालक तथा व्यवस्थापकीय संपादक तुषार खरात आणि लयभारीचे संपादक विक्रांत पाटील यांनी केलेली ही चर्चा.

“शिवाजी महाराज हे जुने झाले, कालबाह्य झाले, आज समाजाला नितीन गडकरी यांच्यासारख्या नव्या आदर्शांची गरज आहे, असे व्यक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अलीकडेच केले होते. त्यानंतर राज्यातील वातावरण तापले आहे. राज्यपाल नव्हे भाज्यपाल अशी टीका कोश्यारी यांच्यावर नेहमीच होते. त्यात आता ते शिवरायांच्या संदर्भातील बेताल बडबडीने अडचणीत आले आहेत. “राज्यपाल हटाव”ची मागणी त्यानंतर जोर धरू लागली आहे.

• शिवरायांच्या अवमानावर शिंदे-फडणवीस गप्प का? उत्तराखंडचे आऊटडेटेड राजकारणी महाराष्ट्राच्या बोकांडी कशाला?
• एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांना शिवरायांच्या अवामानावर तोंडही उघडावे का वाटू नये?
• मंगलप्रभात लोढा यांचा संतापजनक वाह्यातपणा – महाराष्ट्र गद्दारी म्हणून हेटाळत असलेल्या स्वतःच्या “समृद्धी”च्या निर्लज्जपणाची महाराजांच्या कामगिरीशी तुलना करताना लाज कशी नाय वाटत?
• घाबरट राज ठाकरेंचे फुसके बार!

महाराष्ट्राच्या अस्मितेवर वार होत असताना मूग गिळून असलेल्या सत्तापिपासू राजकारण्यांची जबरदस्त धुलाई; महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील भावना…

हेसुद्धा वाचा :

आता एकनाथ शिंदे गटातूनही राज्यपाल हटवाचा सूर

Bhagat Singh Koshyari : ग्रामपंचायतीचा कौतुकास्पद ठराव, राज्यपालांना हटवा!

Sharad Pawar : राज्यपालांनी सर्व मर्यादा ओलांडल्या

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्यावरून राज्यात खळबळ उडाली आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वादग्रस्त विधानानंत राज्यभरात संतापाची लाट उसळली. विरोधी पक्षात असणाऱ्या उद्धव ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी राज्यपालांवर टीका करत त्यांचा पदभार काढून घेण्याची मागणी केली. अशांतच आता राज्यपालांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटानेही नाराजी व्यक्त केली आहे. पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांनी राज्यपाल कोश्यारी यांना अन्य ठिकाणी पाठवण्याची मागणी केली आहे.

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उद्धव ठाकरे गटाने शिवाजीला भाजप नेत्याशी जोडून राज्यपालांनी महाराष्ट्राचे नुकसान केल्याचा आरोप केला. शिंदे गट महाराष्ट्रात भाजपसोबत युतीचे सरकार चालवत आहे, त्यामुळे त्यांचे नेते आधी गप्प बसले. त्यानंतर बुलढाणा भागातील आमदार संजय गायकवाड यांनी राज्यपालांच्या वक्तव्याविरोधात आवाज उठवला.

संपूर्ण व्हिडिओ खालील लिंकवर पाहा –

 

टीम लय भारी

Recent Posts

मुंबईत पावसामुळे दोन मोठ्या दुर्घटना; पेट्रोल पंपावर कोसळले भले मोठे होर्डींग

मुंबई शहरासह उपनगरात अवकाळी पावसाने अक्षरशाः थैमान घातले आहे. वादळी वारा आणि गारांसह पावसामुळे दोन…

30 mins ago

पाच काेटींच्या साेने चाेरीचा पर्दाफाश

जुन्या गंगापूर नाक्यावरील एका होम फायनान्सच्या तिजोरीतील पाच कोटी रुपयांचे दागिने चोरुन (gold theft) नेल्याच्या…

57 mins ago

पहिलवानाच्या खून प्रकरणातील संशयित अटकेत

दोन दिवसांपूर्वी वाडीवऱ्हे येथील सांजेगावातील उत्तर महाराष्ट्र केसरी पहिलवान भूषण लहामगे खून (murder) प्रकरणतील संशयित…

1 hour ago

शिक्षक मतदारसंघ निवडणुक आचारसंहितेचा फटका; मनपाच्या विकासकामांना पुन्हा ब्रेक

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता येत्या चार जूनला संपुष्टात आल्यानंतर मनपाच्या विकासकामांना मुहूर्त लागेल अशी अपेक्षा होती.…

2 hours ago

मोदी सरकारच्या काळात मुंबई पूर्णपणे दहशतवादमुक्त; परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने (Modi government) दहशवाद्यांविरोधात दिलेल्या कडव्या लढ्यामुळे देशाची आर्थिक राजधानी मुंबई पूर्णपणे…

2 hours ago

पाकव्याप्त काश्मीर भारताचा अविभाज्य भाग, तो आम्ही मिळवणारच! अमित शाह

पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा भाग होता, आहे, आणि यापुढेही राहील ही आमची भूमिका असून कोणतीही…

2 hours ago