महाराष्ट्र

OBC : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिल्यास ओबीसी समाजही रस्त्यावर उतरणार, गोलमेज परिषदेत घेतला एकमुखाने निर्णय

टीम लय भारी

मुंबई : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून (OBC) आरक्षण देऊ नये या प्रमुख मागणीसाठी मुंबईतील मराठी पत्रकार संघात मंगळवारी गोलमेज परिषद पार पडली. या परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यासाठी पत्र लिहिणा-या आमदार संजय शिंदे यांचा जाहीर निषेध नोंदवण्यात आला. तसेच मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण दिल्यास संपूर्ण ओबीसी समाज रस्त्यावर उतरुन लढाई आणखी तीव्र करेल, असा इशारा देखील देण्यात आला आहे. (If reservation is given to Maratha community from OBC, Then OBC community will also seen on the streets, a decision was taken in the round table conference.)

या परिषदेसाठी प्राध्यापक जे. डी. तांडेल, बाळासाहेब सानप, बालाजी शिंदे, ज्ञानेश्वर गोरे, सचिन राजूरकर, प्रदीप ढोबळे, चंद्रकांत बावकर, महेश भट, पल्लवी रेणके, लक्ष्मण गायकवाड, डॉ. बबनराव तायवाडे उपस्थित होते. ‘महाराष्ट्राच्या विधानसभेने राज्यातील जनमताचा आदर करुन 2021 ची सार्वत्रिक जनगणना जातनिहाय करावी, असा ठराव मंजूर केला होता. तरीही केंद्र सरकार जातनिहाय जनगणना करणार नसेल तर महाराष्ट्र शासनातर्फे राज्यात तशी जनगणना करण्यात यावी, अशी मागणी या गोलमेज परिषदेत केल्याची माहिती अध्यक्ष प्रकाश शेंडगे यांनी दिली.

अभिषेक सावंत

Recent Posts

भाजप मुंबईत अडचणीत, ज्येष्ठ संपादिका राही भिडे यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा टप्पा सोमवारी आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा हा अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात…

1 hour ago

मोदी सरकारच्या काळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी केवळ देशच सोडला नाही तर देशाचे नागरिकत्वही सोडले – प्रकाश आंबेडकर

मोदी सरकारच्या (Modi govt) कार्यकाळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी देश सोडला आहे. ५० कोटिहून अधिक…

3 hours ago

नाशिकजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्ब्याखालून धूर, जीवाच्या आकांताने प्रवाशांच्या उड्या

आज नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावजवळ गोदान एक्स्प्रेसच्या ( Godan Express) डब्याखालून अचानक धूर निघाल्याने…

4 hours ago

द ग्रेट इंडियन कपिल शोच्या मीड सीझनचा प्रोमो रिलीज

'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा (The Great Indian Kapil Show's) नवा मीड सीझनचा प्रोमो रिलीज…

5 hours ago

ऐनवेळची धावपळ टाळण्यासाठी मतदान केंद्राची माहिती आधीच घ्या- जिल्हाधिकारी जलज शर्मा

लोकसभा निवडणूक 2024 साठी नाशिक जिल्ह्यातील 20 दिंडोरी व 21 नाशिक लोकसभा मतदार संघांसाठी सोमवार,…

5 hours ago

त्र्यंबकेश्वर येथे युवकास जीवे मारण्याचा प्रयत्न; रोकडही लांबवली

पार्किंगच्या जागेच्या कथित वादावरुन १२ जणांनी एकास जीवे (kill) मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी १२ जणांवर त्र्यंबकेश्वर…

6 hours ago