महाराष्ट्र

औरंगाबादेत चोरट्यांची दिवाळी, दहा घरे फोडली

टीम लय भारी

औरंगाबादः दिवाळीच्या काळात कडेकोट पोलीस बंदोबस्त (Aurangabad diwali ) ठेवू, गस्त घालू अशी आश्वासने देणाऱ्या पोलिसांवर (Theft in Aurangabad) चोरांनी मात केल्याचेच चित्र दिसले. दिवाळीच्या दरम्यान शहरात अनेक ठिकाणी चोरट्यांनी घर फोडून डल्ला मारल्याचे उघडकीस आले आहे( Aurangabad, thieves broke into ten houses)

 शहरातील दहा घरांत चोरी झाली असून एकट्या पुंडलिकनगर पोलीस स्टेशनच्या (Pundliknagar police station) हद्दीतच पाच घरे चोरट्यांनी फोडून लाखोंचा ऐवज लंपास केला. यासह जवाहरनगर, उस्मानपुरा, बेगमपुरा, सिडकोतही चोरट्यांनी धुकाकूळ घातला. यावरून पोलिसांची गस्त कमी पडल्याचे दिसून आले.

जीभ कापून टाकू; मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचा भाजपा नेत्यांना इशारा

फाटलेल्या नोटा बदलून देण्यास बँकेने नकार दिल्यास कारवाई होऊ शकते, पाहा हे आहेत नियम

गारखेड्यात चव्हाण यांचे घर फोडले

आनंद राजकुमार चव्हाण हे चार भावांसह गारखेडा परिसरात राहतात. दिवाळीनिमित्त ते वैजापूर येथे गेले होते. त्यांचे लहान बंधू अजय चव्हाण हे शनिवारी रात्री दहा वाजेपर्यंत घरी होते. त्यानंतर ते कुटुंबियांसह तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी गेले. त्यानंतर चोरट्यांनी कुलूप तोडून 10 तोळ्यांचे चांदीचे पैंजण, 7 तोळ्यांचे चांदीचे कडे, 12 तोळ्यांचे बाजूबंद, दीड तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र, इत्यादी दागिन्यांसह 30 हजार रोकड लंपास केली.

शनिवारी रात्री दहानंतर हे घर बंद होते. शनिवारी रात्री ही चोरी उघडकीस आल्यानंतर परिसरातील आणखी पाच घरे फोडल्याचे उघडकीस आले. एकट्या नवनाथनगरमध्ये पाच घरे फोडण्यात आली. तसेच भारत नगरात एक घर फोडून चोरट्यांनी ऐवज लंपास केला. या प्रकरणी पुंडलिकनगरात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक धनाजी आढाव करीत आहेत.

‘बिग बॉस चा घरातून बाहेर पडताच तृप्ती देसाईंनी केली मोठी घोषणा

Maha: Aurangabad civic body asks petrol pumps to check COVID-19 vaccination certificates of customers

किलेअर्क आणि सिडकोमध्येही चोरट्यांचा धुमाकूळ

दिवाळीच्या काळात चोरांनी जवाबरनगर, उस्मानपुरा, बेगमपुरा आणि सिडको व वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीतही डल्ला मारला. पोलिसांनी तीन ते चार वेळा लावलेली फोल ठरली. किलेअर्क परिसरातील फिरोज खान शरीफ खान पठाण हे 04 ऑक्टोबरला घराला कुलूप लावून कुटुंबियांसह सिल्लोडमध्ये गेले होते. ही संधी साधून चोरट्यांनी दरवाज्याचे कुलूप तोडून डल्ला मारला. घरातील 20 हजार रुपये रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने असा 44 हजार 900 रुपयांचा ऐवज लंपास केला.

सिडको, रेणुकामाता मंदिराजवळ चोरी

सिडको एन-9 परिसरातील रेणुकामाता मंदिराच्या पाठीमागे राहणारे अमित काकडे यांच्या घराचा कडी कोंडा तोडून चोरट्याने 35 हजार रुपये किंमतीचा ऐवज लंपास केला. ही घटना 2 नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली.

बीडबायपास रोडवर सुरक्षरक्षकालाच लुटले

शहरातील बीडबायपास रोडवर 6 नोव्हेंबर रोजी बीड बायपास रोडवरील मराठा हॉटेलजवळ सुरक्षा रक्षकालाच दोघांनी मारहाण करीत लुटले. ड्युटी संपल्यावर दुचाकीने घराकडे जाणाऱ्या सुरक्षा रक्षकाला रिक्षातून आलेल्या दोघांनी त्यांची दुचाकी अडवून मारहाण केली. त्यांचा मोबाइल, रोकड आमि दुचाकी असा 63 हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपनिरीक्षक श्रीकांत भराटे करीत आहेत.

Mruga Vartak

Recent Posts

नाशिकजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्ब्याखालून धूर, जीवाच्या आकांताने प्रवाशांच्या उड्या

आज नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावजवळ गोदान एक्स्प्रेसच्या ( Godan Express) डब्याखालून अचानक धूर निघाल्याने…

18 mins ago

द ग्रेट इंडियन कपिल शोच्या मीड सीझनचा प्रोमो रिलीज

'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा (The Great Indian Kapil Show's) नवा मीड सीझनचा प्रोमो रिलीज…

1 hour ago

ऐनवेळची धावपळ टाळण्यासाठी मतदान केंद्राची माहिती आधीच घ्या- जिल्हाधिकारी जलज शर्मा

लोकसभा निवडणूक 2024 साठी नाशिक जिल्ह्यातील 20 दिंडोरी व 21 नाशिक लोकसभा मतदार संघांसाठी सोमवार,…

2 hours ago

त्र्यंबकेश्वर येथे युवकास जीवे मारण्याचा प्रयत्न; रोकडही लांबवली

पार्किंगच्या जागेच्या कथित वादावरुन १२ जणांनी एकास जीवे (kill) मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी १२ जणांवर त्र्यंबकेश्वर…

3 hours ago

दारू पिण्यासाठी पैसे मागितल्यावरून वाद, मुलाने बापालाच संपवलं

जळगाव जवळच्या पळसखेडा येथे एका मुलाने त्याच्या जन्मदात्या पित्याचीच धारदार शस्त्राने वार करून हत्या (…

3 hours ago

हॉटेलात गोळीबार करुन पळ काढणाऱ्यांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

शहराच्‍या दिशेने टोयोटा गाडीत काही सराईत येत असल्‍याची माहिती पोलिसांना मिळाली. गंगापूर जकात नाक्‍यावर संशयितांना…

4 hours ago