31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeराजकीयजीभ कापून टाकू; मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचा भाजपा नेत्यांना इशारा

जीभ कापून टाकू; मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचा भाजपा नेत्यांना इशारा

टीम लय भारी

तेलंगणा: तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष बंदी संजय यांच्यावर कडाडून टीका केली आणि राज्यातील शेतकऱ्यांकडून धान्य खरेदी करण्याचे आश्वासन फसवे असल्याचे म्हटले. यादरम्यान मुख्यमंत्र्यांनी भाजपा नेत्यांना आमच्याबद्दल अनावश्यक टिप्पण्या टाळा नाहीतर जीभ कापून टाकू, असा इशाराही दिला. केंद्र सरकारने हे स्पष्ट केले आहे की ते धान्य खरेदी करणार नाही आणि कृषीमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दुसरे पीक निवडण्यास सांगितले आहे असेही केसीआर म्हणाले (Telangana Chief Minister K Chandrasekhar Rao warns BJP leaders).

“मी थेट संबंधित केंद्रीय मंत्र्यांची भेट घेतली आणि त्यांना खरेदी केलेला तांदूळ घेण्यास सांगितले. ते म्हणाले की मी निर्णय घेईन आणि मला सांगेन. पण आजपर्यंत मला कोणतेही उत्तर मिळाले नाही. तेलंगणा राज्यात गेल्या वर्षीपासून आतापर्यंत सुमारे ५ लाख टन धान्य पडून आहे. केंद्र ते विकत घेत नाही, असे के चंद्रशेखर राव म्हणाले.

नवाब मलिकांचे क्रांती रेडकरच्या बहिणीवर गंभीर आरोप, वानखेडेंनी दिले यावर स्पष्टीकरण

‘नारायण राणेंसारखे भित्रे लोक आता मंत्रिमंडळात‌ राहिलेले नाहीत’ नवाब मलिकांचे नारायण राणेंना खरमरीत प्रत्युत्तर

भाजपा प्रदेशाध्यक्षांवर आक्रमक भूमिका घेत केसीआर म्हणाले, “केंद्र म्हणत आहे की ते धान्य खरेदी करणार नाही आणि राज्यात भाजपा म्हणत आहे की ते खरेदी करेल. तुम्ही आमच्याबद्दल उद्धटपणे बोललात तर आम्ही तुमच्या (राज्यातील भाजपा नेत्यांच्या) जीभ कापून टाकू.”

बंदी संजय संजय म्हणाले होते की ते मला तुरुंगात पाठवणार आहेत. मी त्यांना मला स्पर्श करण्याचे आव्हान देतो. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून भाजपावर टीका करताना केसीआर म्हणाले की, आम्ही केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांसोबत आहोत.“शेती कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना आम्ही पाठिंबा देऊ. शेतकऱ्यांना वाचवण्याची जबाबदारी आपली आहे. विरोधक राजकारण करुन शेतकर्‍यांच्या भावनांशी खेळत आहेत. तेलंगणा राष्ट्र समिती (टीआरएस) शेतकर्‍यांच्या हक्कासाठी केंद्राविरोधात आंदोलन करणार आहे,” असे चंद्रशेखर राव म्हणाले.

सोमय्यांनी खोटे आरोप करणे बंद करावे, माफी मागावी अन्यथा मानहानीचा दावा ठोकणार : अतुल लोंढेंचा इशारा

Telangana CM K Chandrasekhar Rao goes to war with BJP on fuel prices, farm laws, paddy

केसीआर यांनी केंद्र सरकारला पेट्रोल आणि डिझेलवरील उपकर मागे घेण्यासही सांगितले. “केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलच्या दराबाबत खोटे बोलत आहे. २०१४ मध्ये कच्च्या तेलाची किंमत १०५ डॉलर होती ती आता ८३ डॉलरवर आली आहे. परदेशात पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढत असल्याचे भाजाप जनतेसोबच खोटे बोलत आहे,” असे चंद्रशेखर राव म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी