कोकण

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भरली आंगणेवाडीच्या भराडी देवीची ओटी; जनतेला सुखी ठेवण्याचे घातले साकडे

कोकणचे प्रती पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंगणेवाडी (Anganewadi) येथील भराडी देवीचे (Bharadi Devi) दर्शन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी घेवून मोठ्या भक्तीभावाने देवीची ओटी भरली. त्यानंतर देवस्थानाकडून झालेल्या छोटेखानी सत्कार समारंभात ते बोलत होते.

यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे, उद्योग मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार कालीदास कोळंबकर, आमदार नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे, माजी आमदार रविंद्र फाटक, राजन तेली आदी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, कोकणाच्या विकासाला चालना देण्यासाठी कोकण-क्षेत्र विकास प्राधिकरण निर्माण करण्याचीबाब विचाराधीन आहे. त्याचबरोबर समृद्धी महामार्गाच्या धरतीवर मुंबई-सिंधुदुर्ग या रस्ते मार्गाचा विकास करण्यात येईल. जेणेकरुन कोकणच्या विकासाला पर्यायाने पर्यटनाला चालना मिळेल.

कोकणच्या सर्वांगिण विकासाकरिता सरकार कटीबध्द असून याकरिता आपण केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचे मार्गदर्शन घेऊ असे सांगत भराडी देवीच्या मान्यवरांनी भक्त निवासाचा प्रस्ताव सादर करावा, त्यासाठी आवश्यक तो निधी देऊ अशी ग्वाही देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली.
यावेळी आंगणेवाडी विकास मंडळाचे अध्यक्ष भास्कर आंगणे यांचा भगवी शाल आणि रोप देवून मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तत्पूर्वी रात्री १२:३० वाजता आंगणे कुटुंबियाकडून देवीची ओटी भरण्यात आली. याप्रसंगी हजारो भाविक उपस्थित होते. (Chief Minister Eknath Shinde, Anganewadi Bharadi Devi)

केंद्रीयमंत्री नारायण राणे म्हणाले, हे सरकार सामान्य जनतेचे आहे. या सरकारच्या स्थैर्यासाठी आपण भराडी देवीला साकडे घातले असून हे सरकार आपला कार्यकाल पूर्ण करेल असा आशावाद व्यक्त करून आंगणे कुटुंबियांनी भाविकांची काळजी घेतल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

प्रदीप माळी

Recent Posts

नाशिकरोडमधून 2 गावठी कट्ट्यांसह दोघांना अटक!

उपनगर पोलिसांच्या गुन्हेशोध पथकाला दोघे संशयित दसक गावानजिकच्या महालक्ष्मीनगरमध्ये गावठी कट्टे विक्रीसाठी येणार असल्याची खबर…

7 hours ago

गंगापूर धरणाची दोन कोटी लिटरने वाढली पाणी क्षमता

गंगापूर धरणालगत गंगावऱ्हे गांव येथे गेल्या १४ दिवसांपासून सुरू असलेल्या गाळ उपसा मोहिमेमुळे गंगापूर धरणाची…

8 hours ago

विरोधकांचा मोदी सरकारविरोधात ‘व्होट जिहाद’!

दोन टप्प्यातील निवडणुकांमध्ये अहंकारी आघाडीचा संसार बुडाल्याचे स्पष्ट झाल्याने निराश झालेले इंडी आघाडीचे नेते आता…

8 hours ago

राहुल गांधीची चायनीज तर मोदीजींची भारतीय गॅरंटी अमित शहा

या निवडणुकीत एक गट राम मंदिराला विरोध करणाऱ्यांचा आहे, तर दुसरा गट राम मंदिर बनविणारा…

8 hours ago

कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी ‘या’ तीन मराठी चित्रपटांची निवड

फ्रान्समध्ये येत्या 14 मे ते 22 मे 2024 दरम्यान कान्स फिल्म फेस्टिव्हल संपन्न होणार आहे.…

8 hours ago

नाशिक मनपाच्या बांधकाम विभागाचा कानाडोळा,एम एन जि एल गॅस मुळे नागरिकांना होतोय त्रास

गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील अनेक भागात एम एन जि एल तर्फे गॅस (MNGL Gas) वाहिनी…

12 hours ago