महाराष्ट्र भूषण पुरस्कार दुर्घटना : जितेंद्र आव्हाड यांचा खडा सवाल, आता जबाबदारी कोणाची ?

राज्य सरकारचा मानाचा समजला जाणारा ‘महाराष्ट्र भूषण’ पूरस्कार ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना प्रदान करण्यात आला. नवी मुंबईतील मोकळ्या मैदानावर भव्य असा सोहळ्याचे आजोजन या निमित्ताने करण्यात आले होते. मात्र उष्माघाताने 13 जणांचे बळी गेल्याने या सोहळ्याला मोठे गालबोट लागले. प्रशासन आणि राजकीय बेफिकीरीमुळे हे बळी गेल्याची टीका आता होऊ लागली आहे. राष्ट्रवादीचे नेते डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी समाज माध्यमांवर एक मोठी पोस्ट लिहीत सर्वसामान्य निष्पाप जीवांचा बळी घेऊन राजकारणातील मतं वाढविण्याचा हा कार्यक्रम अत्यंत धोक्याचा आहे, हे या प्रकरणातून सिद्ध झालं. आता जबाबदारी कोणाची ? असा खडा सवाल केला आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी यासंदर्भात सविस्तर ट्विट केले आहे. त्यात त्यांनी अनेक सवाल उपस्थित केले आहेत. धर्माधिकारी यांना पुरस्कार जाहीर केल्यानंतर त्यांच्या भाविकांना आनंद झाला होता. याचा फायदा सरकारने उलचायचे ठरवले. भारतरत्न सारखा पुरस्कार एका हॉलमध्ये प्रदान केला जातो पण राजकीय लाभ उठविण्यासाठी तुमच्या संतांना पुरस्कार दोत आहोत, असे दाखविण्याचे अत्यंत चुकीचे धोरण यामध्ये दिसत होते, अशी घणाघाती टीका आव्हाड यांनी केली आहे.

सरकारने लाखो लोकांना उन्हामध्ये तडफडत बसायला लावले होते. स्वत: सगळे नेते मात्र व्यासपीठावर एसीच्या बाजूला, स्वत:च्या डोक्यावर छत घालून बसले होते ? हा कार्यक्रम संध्याकाळी देखील घेता आला असता. भरदुपारी कार्यक्रम घेण्याची काय गरज होती ? असे सवाल आव्हाड यांनी उपस्थित केले आहेत. सर्वसामान्य निष्पाप जीवांचा बळी घेऊन राजकारणातील मतं वाढविण्याचा हा कार्यक्रम अत्यंत धोक्याचा आहे हे या प्रकरणातून सिद्ध झालं. आता जबाबदारी कोणाची ? असा खडा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.

जितेंद्र आव्हाड यांची समाजमाध्यमांवरील पोस्ट 

काल डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला. या महान संतांना महाराष्ट्र भूषण दिल्याबद्दल त्यांच्या भाविकांना प्रचंड आनंद झाला होता. त्या आनंदाचा राजकीय फायदा उठवण्याचे सरकारने ठरवले. खरतरं ‘भारतरत्न’ सारखा पुरस्कार हा राष्ट्रपतींच्या हस्ते एका हॉलमध्ये प्रदान केला जातो. पण, संपूर्ण जगभर त्याचे प्रक्षेपण केले जाते. हा कार्यक्रम देखिल त्यापद्धतीने करता आला असता. ह्या कार्यक्रमाची वेळ बघितली तर कुठेही बुद्धी वापरुन काम केलेले दिसत नाही. फक्त राजकीय लाभ उठविण्यासाठी म्हणून गर्दी जमा करायची आणि आम्ही तुमच्या संतांना पुरस्कार देत आहोत असं दाखवायचं हे अत्यंत चुकीचे धोरण यामध्ये दिसत होतं.

स्वत: सरकारतर्फे आव्हान केले जाते की, काम नसेल तर उन्हामध्ये जाऊ नका आणि इथे मात्र सरकारनेच लाखो लोकांना उन्हामध्ये या कार्यक्रमासाठी तडफडत बसायला लावलं होतं. पाण्याची व्यवस्था नाही. डोक्यावर कुठलेही छत नाही. प्रचंड ऊन. त्यामुळे मुंबईच्या वातावरणात आद्रर्ता असल्यामुळे डिहायड्रेशनचे प्रकार दिसत होते. पण, स्वत: सगळे नेते हे व्यासपीठावर एसीच्या बाजूला, स्वत:च्या डोक्यावर छत घालून बसले होते.

त्यामुळे आता भाविकांच्या मनात प्रचंड राग आहे. मतांच्या राजकारणासाठी एका संताचा वापर होऊन त्या संतांच्या भाविकांचा मृत्यू होणे हे त्या संतांना मानणा-या कुटुंबापैकी कोणालाच आवडणारे नाही. किंबहुना माझे तर असे मत आहे की, हे संतांनाही आवडलं नसेल. त्या वादात मला पडायचं नाही. पण, ह्या मृत्यूची जबाबदारी कोणालातरी घ्यावीच लागेल. जनसामान्यांचा प्राण हा प्राण नसतो का ? भर उन्हामध्ये एवढा बडेजाव करण्याचे कारण काय होते ? हा कार्यक्रम संध्याकाळी देखिल घेता आला असता. भरदुपारी सुर्य माथ्यावर असतांना कार्यक्रम करण्याची गरजच काय होती ?

संतांचा आणि धर्माचा वापर राजकारणात करावा आणि त्यासाठी बळी द्यावेत. आणि नंतर मतं आपल्याकडेच वळावीत हा प्रयत्न अंगाशी आला आहे…. यापुढे देखिल येईल. सर्वसामान्य निष्पाप जीवांचा बळी घेऊन राजकारणातील मतं वाढविण्याचा हा कार्यक्रम अत्यंत धोक्याचा आहे हे या प्रकरणातून सिद्ध झालं. आता जबाबदारी कोणाची ?

हे सुद्धा वाचा

समलिंगी विवाह म्हणजे शहरी उच्चभ्रू वर्गाचे विचार; समलिंगी विवाहला सर्वोच्च न्यायालयाचा विरोध! 

रियल हीरोज: सागरदूत हर्षद करतोय ‘फॉर फ्यूचर इंडिया’ मार्फत पर्यावरणाचं रक्षण !

कामाची बातमी: उष्माघात टाळण्यासाठी तुम्ही काय काळजी घ्याल?

प्रदीप माळी

Recent Posts

NEET बद्दल बोलताच राहुल गांधींचा माईक बंद करण्यात आला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल…

5 hours ago

आणीबाणीमुळे देशाचा फायदा झाला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये आणीबाणी ह्या विषयावर सखोल…

6 hours ago

मोदी सरकारची थापेबाजी, GST ची केली भजी !

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे(PM Narendra Modi and GST).सदर व्हिडीओमध्ये…

6 hours ago

देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या आमदाराची दादागिरी !

लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…

6 days ago

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…

1 week ago

तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात

सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…

1 week ago