35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeमुंबईकामाची बातमी: उष्माघात टाळण्यासाठी तुम्ही काय काळजी घ्याल?

कामाची बातमी: उष्माघात टाळण्यासाठी तुम्ही काय काळजी घ्याल?

महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा राज्यातील अत्यंत महत्त्वाचा पुरस्कार. मात्र या कार्यक्रमात हलगर्जीपणा झाल्यावर काय घडू शकतं हे महाराष्ट्राला पाहायला मिळालं. या कार्यक्रमात उष्माघाताने 13 जणांचा बळी गेला आणि एका महत्त्वाच्या कार्यक्रमाला गालबोट लागलं; काळा डाग बसला आहे. यापूर्वीही महाराष्ट्रात उष्माघाताने अनेकांचा बळी गेला आहे.

डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी भरउन्हात लाखोंचा जनसागर लोटत होता. रविवारी रणरणत्या उन्हात सलग 4 ते 5 तास बसल्याने सोहळ्यात उपस्थित 600 जणांना उष्माघाताचा त्रास झाला तर, 13 निरपराध जीवांना आपला जीव गमवावा लागला. सुमारे 40 अंश सेल्सिअस तापमानात व रखरखत्या उन्हात बसल्यामुळे श्री सदस्यांना उन्हाचा त्रास जाणवू लागला. दरम्यान अनेकजण उष्माघाताने बेशुद्ध पडत होते. या घटनेनंतर उष्माघात म्हणजे काय आणि त्याची लक्षणे काय असतात? याबाबत घेतलेला सविस्तर आढावा

उष्माघात म्हणजे काय?
उष्माघात आणि उष्मापात असे दोन प्रकार आहेत. सतत कडाक्याच्या उन्हात काम केल्यानंतर उष्मापात होतो आणि त्यातून होणारी तीव्र समस्या म्हणजेच उष्माघात. शरीराने मर्यादेपेक्षा जास्त निर्माण केली किंवा उष्णता शोषून घेतली तर हायपरथर्मिया म्हणजेच अतिउच्च तापमानाचा आजार होतो. उष्माघात हा त्याचाच एक प्रकार आहे. उष्माघात म्हणजे हीट स्ट्रोक किंवा त्याला सनस्ट्रोक असंही म्हणून शकता. रखरखत्या उन्हात बाहेर पडल्यामुळं किंवा जास्तवेळ उन्हात थांबल्यामुळं शारिरातील उष्णता संतूलन संस्था नाकामी होते.

उष्माघातामुळं मृत्यू कसा होतो?
अतिउष्णतेमुळं शरिरातील प्रथिनांवर दुष्परिणाम होतो व शरिरातील जीवनप्रक्रिया थांबते. शरीरातल्या सर्व अवयवातील पेशींमध्ये हा परिणाम होतो. यात मृत्यूचे कारण बहुधा ‘मेंदूसूज’ म्हणजेच एनसेफलोपथी हे असते. यामध्ये शरीराचे तापमान अकस्मात उच्च पातळीवर जाते. योग्य ते उपचार वेळेवर न मिळाल्यास संबंधित व्यक्तीच्या मेंदूच्या उतींना नुकसान पोहोचून व्यक्ती कोमात जाण्याची व दगावण्याची शक्यता असते. जास्त तापमानामुळे शरीरातील महत्त्वाचे अवयव निकामी होतात.

उष्माघात कोणाला होऊ शकतो?
उष्माघात हा प्रामुख्याने अर्भकं, लहान मुलं, वयोवृद्ध, पाणी कमी पिणारे लोक, दीर्घ आजारी किंवा मद्यप्राशन करणाऱ्यांमध्ये आढळतो. तसेच हृदयरोग, फुप्फुसांचे आजार, मूत्रपिंडाचे आजार, लठ्ठपणा उच्च रक्तदाब, मधुमेह, मानसिक व्याधीसारख्या आजारांनी त्रस्त व्यक्तींनाही सहज उष्माघात होऊ शकतो.

काय काळजी घ्याल
सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत उन्हाची तीव्रता जास्त असते तेव्हा शक्यतोवर उन्हात फिरणे, काम करणे किंवा खेळणे टाळा. उन्हात बाहेर पडायचे झाल्यास शक्यतो स्कार्फ किंवा छत्री जवळ ठेवावी. सौम्यरंगांचे आणि ढिले कपडे वापरावे. टाइट जीन्स आणि भडक कपडे वापरणे टाळावे. जवळ पाण्याची बाटली ठेवावी.तापमानवाढीबरोबरच पाणी पिण्याचे प्रमाण वाढवावे. तहान लागण्याची वाट न पाहता दररोज 8 ते 10 ग्लासपेक्षा जास्त पाणी प्यावे. आहारमध्ये काकडी, संत्री, कलिंगड आणि लिंबू, कांदा यांचा भरपूर वापर करावा.

हे सुद्धा वाचा: 

महाराष्ट्र भूषण : शिंदे सरकारच्या 42°© रणरणत्या उन्हातील इव्हेंटने घेतले 11 बळी

आप्पासाहेबांना महाराष्ट्र भूषण श्री सदस्यांना मृत्यू भीषण..नेटकरी बरसले !

महाराष्ट्र भूषण सोहळ्यात उष्माघातासोबत चेंगराचेंगरीही; हा आयोजकांचा हलगर्जीपणा; अजितदादांनी सांगितली नेमकी चूक

उष्माघात झाल्यास प्रथमोपचार काय कराल?

  1. व्यक्तिला सुर्यापासून दुर करुन, थंडाव्याच्या किंवा सावलीच्या ठिकाणी आणावे.
  2. व्यक्तिला खाली झोपवावे आणि त्याचे पाय व हात सरळ करावे.
  3. कपडे सैल करावे किंवा काढून टाकावे.
  4. व्यक्तिला थंड पाणी पाजावे किंवा काही कॅफेन वा मद्य विरहीत पेय प्यावयास द्यावे.
  5. व्यक्तिचे शरीर थंड पाण्याचे शिबके मारुन किंवा थंड पाण्याच्या बोळ्याने अंग पुसुन काढून किंवा पंख्याखाली ठेवुन थंड करावे.
  6. व्यक्तिवर बारकाईने लक्ष ठेवावे. गर्मी तंद्रा ऊष्माघातात परिवर्तीत होऊ शकते.

जर ताप 102 फेरेनाईट पेक्षा जास्त असेल, बेशुद्धी, भ्रम किंवा आक्रमकता यासारखी लक्षणे दिसुन आली तर, ताबडतोब मेडीकल सेवेचा लाभ घ्यावा, असे वैद्यांचे म्हणणे आहे.

Heat stroke, maharashtra Bhushan ceremany, precautions to prevent Heat wave, Maharashtra Bhushan sohala, shinde fadanavis govt, Ajit Pawar, eknath shinde, devendra fadanvis, bjp, shivsena, ncp

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी