महाराष्ट्र

हसन मुश्रीफ, तानाजी सावंत यांचा राजीनामा घेण्याची कॉँग्रेस शिष्टमंडळाची राज्यपालांना विनंती

मागील 3 दिवसांत राज्यातील नांदेड, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथील शासकीय रुग्णालयांमध्ये असुविधांमुळे झालेल्या रुग्णाच्या मृत्यूमूळे राज्य शासनावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. आधी नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे ४८ तासांत तब्बल ३१ जणांचा मृत्यू झाला आहे. ज्या मध्ये १६ नवजात शिशुंचाही समावेश आहे. छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकिय महाविद्यालय २४ तासात १४ जणांचा मृत्यू झालेला आहे. तर, नागपूर येथील शासकीय रुग्णालयात २४ तासांत २३ जणांचा मृत्यू झालेला आहे. यावरुन, राज्यातील कॉँग्रेसच्या शिष्टमंडळाने आज गुरुवारी, (5 ऑक्टोबर) राज्यपाल रमेश बैंस यांना भेट देऊन विविध मागण्यांचे निवेदन दिले.

राज्यातील आरोग्य व्यवस्थेवर टीका करत राज्यपालांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, ‘राज्य शासनाच्या अनास्थेमुळे राज्यातील आरोग्य व्यवस्थेवर ही परिस्थिती उद्भवल्याचे दिसून येते. तरी राज्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये झालेल्या मृत्यूंसंदर्भात निवृत्त न्यायाधिशांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समितीची नेमणूक करावी. तसेच प्रत्येक मृत व्यक्तिंच्या कुटुंबियांना प्रत्येकी दहा लाख रुपयांची ची आर्थिक मदत करावी.’

याशिवाय, राज्यातील वाढत्या बेरोजगारीबाबत निवेदनात म्हंटले आहे की, ‘राज्यामध्ये तरुण बेरोजगारांची संख्या वाढत असताना शासनाने शासकीय सेवेतील विविध पदे ही नऊ कंपन्यांमार्फत ”कंत्राटी स्वरुपात” भरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे, राज्यातील विविध स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची फसवणूक होत आहे. तसेच याद्वारे,अप्रत्यक्षपणे विविध संवर्गातील जसे अनुसुचित जाती अनुसुचित जमाती, ओबीसी व भटक्या विमुक्त जमातीचे आरक्षण रद्द करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी शासनसेवेतील पदे कंत्राटी स्वरुपात भरण्याचा हा शासननिर्णय तात्काळ रद्द करावा.’ अशी मागणी नेवेदानंत करण्यात आली.

जालना जिल्हयातील अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्ज प्रकरणी चौकशी करण्याचे आवाहन निवेदनात केले आहे. ‘अंतरवाली सराटी या गावात मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी अमानुषपणे लाठीमार केला. एकंदरीतच मराठा,ओबीसी व धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसंदर्भातील आंदोलन हाताळण्यात सरकारला अपयश आलेले आहे. त्यामुळे राज्यातील विविध जाती-जमातीतील सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचे काम शासनाने केलेले आहे. तरी जालना जिल्ह्यातील या लाठीचार्जची निवृत्त न्यायाधिशांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समितीची नेमणूक करुन चौकशी करावी.’

याशिवाय, राज्यात दुष्काळ घोषित करून उपाययोजना करण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे. ‘राज्यात दुष्काळी परिस्थिती असुनसुध्दा सरकारने दुष्काळ घोषित न केल्याने शेतकरी व जनावरांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. अवकाळी पावसामूळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई अद्याप शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली नाही. शासनाच्या शेतकऱ्यांविषयीच्या असंवेदनशील धोरणामुळे विदर्भ व मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढलेल्या आहेत. शासनाप्रती शेतकऱ्यांमध्ये नाराजीची भावना निर्माण झालेली आहे. तरी या संदर्भात शासनाने तात्काळ दुष्काळ घोषित करुन, दुष्काळाच्या उपाययोजना करण्याबाबत आपण शासनास निर्देशित करावे.’ असे निवेदनात म्हंटले आहे.

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचा राजीनामा घेण्याची विनंती यावेळी निवेदनात करण्यात आली आहे. ‘वैद्यकीय मंत्री व आरोग्य मंत्री यांचा राजीनामा घेण्यात यावा ही विनंती करण्यात आली असून या संदर्भात मा. राज्यपाल महोदयांनी स्वत: बैठक घेऊन लक्ष घालावे व या विषयासंदर्भात चर्चा करण्यासाठी आपण विधीमंडळाचे दोन दिवसाचे विशेष अधिवेशन बोलवावे, ही मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

हे ही वाचा 

दीपक केसरकर यांनी थाटले मुंबई महापालिकेत कार्यालय !

अजित पवार भाजपसोबत का गेले? शरद पवारांनी केला गौप्यस्फोट

राजकीय आंदोलनापूर्वी अधिकाऱ्यांची जात तपासायची का?- भाजपा प्रवक्ता अजित चव्हाणांचा सवाल

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले, “महाराष्ट्रातील शासकीय रुग्णालयात मृत्यूंचे तांडव झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील कळवा येथील रुग्णालयातून याची सुरुवात झाली. औषधे नाहित, डॉक्टर नाहित, वैद्यकीय कर्मचारी नाहीत अशा असुविधांमुळे हे मृत्यू झाले आहेत. नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील आयसीयु विभागात ७२ नवजात बालके होती व त्यासाठी केवळ तीन नर्स होत्या, ही अवस्था आहे राज्याच्या आरोग्य विभागाची. सरकार आरोग्य विभागातील रिक्त जागा भरत नाही, औषध खरेदी करत नाही. अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारने १३ हजार कोटी रुपयांची तुट दाखवली होती तर पावसाळी अधिवेशनात ४० हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर करुन घेतल्या. सरकार जनतेला आरोग्य सेवा देऊ शकत नाही, शिक्षण देऊ शकत नाही तर मग हा पैसा जातो कुठे?”

कॉँग्रेसच्या शिष्टमंडळात यावेळी, विधानसभा विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले नाना पटोले, आमदार वर्षा गायकवाड, माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, आमदार अस्लम शेख, माजी खासदार हुसेन दलवाई, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, आमदार भाई जगताप, मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्ष झिशान सिद्दीकी, प्रवक्ते सचिन सावंत यांसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

टीम लय भारी

Recent Posts

बांगलादेशसोबतच्या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी कोहली-गंभीरचा व्हिडिओ आला समोर

चेन्नईत बांगलादेशसोबतच्या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक गौतम…

7 hours ago

प्लॅस्टिक की लाकडी, केसांच्या आरोग्यासाठी कोणता कंगवा चांगला?

आपण नेहमी आपल्या केसांची खूप काळजी घेतो. त्यासाठी आपण महागडे तेल आणि  शॅम्पूचा वापर करतो.…

9 hours ago

3 वर्षांपासून पाहत आहे चांगल्या कामाची वाट… आहाना कुमराने केला बॉलीवूडबाबत मोठा खुलासा

अभिनेत्री आहाना कुमराने टीव्ही आणि ओटीटीवर काम केल्यानंतर चित्रपटसृष्टीत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. पण…

9 hours ago

अब्दू रोजिकचे लग्न झाले रद्द, या कारणामुळे तुटलं नातं

बिग बॉस 16 फेम अब्दु रोजिकने त्याचे लग्न रद्द केले आहे. अब्दूने या वर्षी जाहीर…

10 hours ago

पाठीचा कणा मजबूत आणि लवचिक करण्यासाठी रोज करा ‘हे’ व्यायाम

आजच्या व्यस्त जीवनामुळे आणि झपाट्याने बदलत चाललेल्या जीवनशैलीमुळे मणक्याशी संबंधित समस्या अगदी सामान्य झाल्या आहेत.…

12 hours ago

फ्लटर किक्स व्यायामामुळे पायाचे स्नायू होतात मजबूत, जाणून घ्या

आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी आपण आपल्या दैनंदिन जीवनशैलीमध्ये योग आणि व्यायामाचा समावेश केला पाहिजे. बहुतेक…

12 hours ago