महाराष्ट्र

महाराष्ट्रातील पहिला आदिवासी औद्योगिक समूह दिंडोरीत, अर्थमंत्री अजित पवार यांची अर्थसंकल्पात घोषणा

टीम लय भारी

मुंबई : नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुका इतर आदिवासी तालुक्यांचा मध्यवर्ती ठिकाणी आहे. येथील रस्ते आणि पाणी यांची उपलब्धता यांचा विचार करुन दिंडोरी तालुक्यात राज्यातील पहिला आदिवासी औद्योगिक समूह प्रस्तावित करण्यात आला आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात यासंदर्भातील घोषणा केली आहे. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी या आदिवासी औद्योगिक समूहाची संकल्पना मांडली.प्रस्तावित आदिवासी औद्योगिक समूह ही नाविन्यपूर्ण संकल्पना असून,आदिवासी उद्योजकांना एका छताखाली सुविधा उपलब्ध करून आदिवासी समाजात उद्योजकता विकास घडवून आणणे हा या मागील मुख्य उद्देश आहे. Trible Industrical cluster (TIC) मध्ये आदिवासी उद्योजकांना उद्योगांकरिता शेड, वीज, पाणी, रस्ते यांची उपलब्धता करण्यासोबत मोठे, मध्यम आणि लहान उद्योग एकाच ठिकाणी विकसित करण्यात येतील.(Maharashtra’s first tribal industrial conglomerate in Dindori, Finance Minister Ajit Pawar)

आदिवासी युवकांना रोजगार उपलब्धीतून कौशल्य विकास साध्य करणे या उद्देशाने TIC ची निर्मिती करण्यात येईल.दिंडोरी तालुक्यातील टोमॅटो, द्राक्ष, कांदा व भाजीपाला पिकांसोबत, तांदूळ, नागली, खुरासणी, वरई ही महत्वाची पिके असून यावरील विविध प्रक्रिया उद्योगांची उभारणी करणे शक्य होईल. दिंडोरी तालुक्यात परनॉड रिकॉर्ड, गोदरेज, UB बेव्हरेज, वरून ॲग्रो, सह्याद्री ॲग्रो, सूला, सिग्राम, एव्हरेस्ट हे उद्योग असून उद्योगांकरिता पोषक वातावरण असल्याने नाशिक जिल्हा मुख्यालयापासून 23 किमी पेठ, गुजरात राज्य मार्गावरील जांबूटके शिवारात हा प्रकल्प प्रस्तावित आहे.(Maharashtra’s first tribal industrial conglomerate)

आदिवासी विकास विभागाच्या सहकार्याने उद्योजकांसाठी तयार शेड वितरीत करणे, कृषि प्रक्रिया, इंजिनिअरींग, आदिवासी हस्तकला, लॉजीस्टीक आणि कौशल्य विकास तसेच गाळे या स्वरुपात शेडचे बांधकाम करण्यात येईल. सोबत तांत्रिक पायाभूत सुविधा विकास करण्यासाठी शेतकरी प्रशिक्षण, शेती प्रक्रिया उद्योग उभारणी, शेतमालाची स्वच्छता, वर्गीकरण आणि पॅकींग सुविधा, तसेच निर्यातीस चालना देण्याकरिता सहाय्य, प्रशिक्षण आणि वर्कशॉप यूनिट यांची उभारणी करण्यात येईल. आदिवासी‍ औद्योगिक समुहामुळे तसेच सोबतच्या नवीन औद्योगिक क्षेत्रामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात औद्योगिक विकास व रोजगार निर्मिती होवून या परिसराचा विकास होण्यास चालना मिळणार आहे.(Maharashtra’s first tribal industrial conglomerate)


हे सुद्धा वाचा –

Ajit Pawar : अजित पवारांची मोठी घोषणा ! पिंपरी-चिंचवड महापालिकेत नवीन गावांचा समावेश करणार

Maharashtra Budget 2022: State to be 1st to have $1 trillion economy, says Pawar

Ajit Pawar : कोरोनामुक्त अजित पवार मंत्रालयात अ‍ॅक्शन मोडमध्ये

Maharashtra: ED to take over sugar mill linked to Ajit Pawar

नाणार प्रकल्प येणार कि जाणार ?

Pratiksha Pawar

Recent Posts

पाच वर्षांत सर्व भ्रष्टाचाऱ्यांवर कडक कारवाई होणार! झारखंडमधील सभेत पंतप्रधान मोदी यांची ग्वाही

जिथे सरकारे भ्रष्ट असतात तिथे निधीची कितीही तरतूद केली तरी विकास शक्य नाही, म्हणूनच आम्ही…

9 hours ago

जेडीएस नेते एचडी रेवन्ना यांना पोलिसांनी घेतले ताब्यात, प्रज्वल रेवन्ना फरार

अपहरणाचा आरोप झाल्यानंतर जेडीएस नेते एचडी रेवन्ना ( HD Revanna ) यांना पोलिसांनी ताब्यात (…

10 hours ago

देशात इंडिया आघाडीचे सरकार सत्तेवर येणे काळाची गरज- माजी आमदार वसंत गिते

गेली दहा वर्षे जनतेला भूलथापा देणाऱ्या केंद्रातील मोदी सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी इंडिया आघाडीला(India aghadi)…

10 hours ago

लोकसभा निवडणुकीत गद्दारांना चांगला धडा शिकवा- सुधाकर बडगुजर

गद्दारांना धडा शिकविण्याची (Teach traitors a good lesson) आयतीच संधी लोकसभा निवडणुकांमुळे चालून आली आहे.ही…

11 hours ago

भुजबळ साहेबांच्या सुचनेने महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणणार –अंबादास खैरे

नाशिक लोकसभा मतदार संघातून शिवसेना पक्षाला उमेदवारी सोडल्यानंतर महायुतीच्या (Mahayuti) उमेदवाराला मंत्री छगन भुजबळांच्या सुचनेने…

11 hours ago

नाचणी खायचे फायदे

चांगल्या आरोग्यासाठी भाजी आणि फळांचे सेवन ज्याप्रमाणे गरजेचे आहे(Benefits of eating ragi). त्याचप्रमाणे आपल्या पोटामध्ये…

13 hours ago