मुंबई : विधान सभेच्या सार्वत्रिक निवडणूकीपुर्वी देवेंद्र फडवणीसांना भविष्यात राष्ट्रवादी सोबत युती करणार का ? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांनी दिलेल्या उत्तरावर माजी आमदार अनिल गोटे (Anil gote) यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.रंग बदलण्यात फडणवीसांनी सरडयाचाही पराभव केला. भाजपचे सत्तेसाठी महेबुबा मुफ्ती बरोबर दिवस गेले. उद्या तालीबान्यांबरोबर युती केली तरी आश्चर्य वाटणार नाही.आकस्थाळेपणा केल्याने भक्त टाळया वाजवतील बाहेर मात्र शिव्या घालतात. प्रश्नाच्या उत्तरात आपण बोलतो ते खरे वाटावे यासाठी ‘राष्ट्रवादीशी युती नाही. शाश्वत धर्म म्हणून नाही’ असे फडवणीसांनी बेंबीच्या देठापासुन चिरक्या आवाजात ओरडून सांगितले.राजकारणात असंख्य ढोंग करणारी असंख्य विदुषके गेल्या ५५ वर्षात पाहिलीत. पण देवेंद्र फडवणीस (Devendra fadnavis) म्हणजे या सम हाच, असे राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष व भाजपाचे माजी आमदार अनिल गोटे यांनी भाजपाला खडे बोल सुनावले.(Anil gote criticizes fadnavis)
आपत धर्म म्हणून नाही ! भविष्यात नाही ! नाही !! नाही !!!” अर्थात देवेंद्र फडविसांना नखशिखांत ओळखणाऱ्या माझ्या सारख्या हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या लोकांना कल्पना होती की, वेळ पडली तर, सत्तेसाठी फडवणीस लाळ गळेस्तोवरत बुट चाटल्याचशिवाय राहणार नाही. नेमके घडले ही असेच ! सभागृहात ज्यांचा शकुनी म्हणून उल्लेख केला पण मुख्यमंत्र्याच्या खुर्चीसाठी याच शकुनीला रात्री उरावर घेतले. तेव्हा गोड वाटल ! मजा आली ? भल्या पहाटे कोश्यारी नावाच्या पुरोहिताकडून मोहतर लावून घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसने डाव टाकुन फडणवीसांची सत्तेची खाजला मिटवली. राज्यात असलेली राष्ट्रपती राजवट अलगद उठवून घेतली. संपुर्ण वस्त्रहीन झाल्यानंतरच फडवणीसांना “बडे बेआब्रु होकर तेरे कुचुसे निकले” असेच म्हणावे लागले. राष्ट्रवादीने धोबी पछाड मारली. फडणवीसांना लक्षात आले की “रिश्ते मे हम तुम्हारे बाप लगते है, नाम है बारामती के पवार” त्याचा संताप आणि आकस्थाळेपणा विधानसभेत केलेल्या थयथयाटातुन महाराष्ट्राला दिसला . राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष व भाजपाचे माजी आमदार अनिल गोटे (Anil gote) यांनी आज एका पत्रकाव्दारे देवेंद्र फडवणीसांना टोला लगावला आहे.
आपल्या पत्रकात ते पुढे म्हणतात की, ‘फडवणीसांच्या उत्तराच्या भाषणात ओढून ताणून काही तरी बोलायचे म्हणून बोलत होते. त्या बोलण्यात काही तथ्य नव्हते. राष्ट्रवादी व भाजपा अशी सत्ता समीकरणे त्यांना आवडली होती. पण राष्ट्रवादी आणि शिवसेना म्हणजे महापातक ! खरे तर, शरद पवार व उध्दव ठाकरेंनी अशी बेमालूम खेळी केली की, उताणे पडल्यावरच फडणवीसांना कळाले गिरे तो मी नाक उप्पर ! पीठ जमीन को लगी तो क्या हुआ ? नाक तो उपर है ना ! असे वाटल्यास नवल ते काय? १३० कोटी जनतेसमोर बोलता बोलता आपल्याला हातो- हात उलट केले. त्यांना झालेल्या जन्मभराच्या राजकीय जखमेवरील खपली निघाल्याने भळभळून वाहणारे रक्त म्हणजे विधान सभेत केलेले भाषण होते.
असो ! विदर्भात एक म्हण प्रचलीत आहे.“तेली ले धारोधार, खुदा ले एकही बार” !विरोधापक्ष नेते आपल्या भाषणात म्हणाले की, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही ! तुम्ही म्हणजे मुंबई नाही ! वगैरे वगैरे फडवणीसांचा हा दावा मला मंजूर आहे. पण तुम्ही म्हणजे हिंदु नाही ! मेहबुबा मुफ्तीच्या चरणी जावून सत्तेसाठी लाळ गाळणारे हिंदु कसे असू शकतात ? महाराष्ट्रात सत्तास्थापनेच्या दरम्यान फडवणीसांनी केवळ दोन आमदारांसाठी एम.आय.एम. शी मध्यरात्री गुफ्तगु करून युती केली. त्या पोटी काही बिदाजी ध्यायची ती दिली गेली होती. इमानदारीच्या रक्ताचा एक थेंब जर बाकी असेल तर त्यांनी खर सांगाव ! राजकारणात कुणी कायमचा शत्रू अथवा मित्र असत नाही ! तुम्ही केले तर अस म्हणायच ! पण एक मात्र निश्चित तुम्हीच इनकम टॅक्स ! तुम्हीच सी. बी. आय ! तुम्हीच इ.डी ! तुम्हीच घरगडी ! त्वमेव इडी ! त्वमेव घरगडी ! त्वमेव सर्वम् !, असे अनिल गोटे (Anil gote) म्हणाले.
महाराष्ट्र प्रेमाची तुमची नेमकी व्याख्या तरी काय ? याचा खुलासा कराच ! माझे जाहीर आवाहन आहे ! तुम्ही आव्हान समजत असाल तर आव्हान आहे. महाराष्ट्रातील असंख्य प्रकल्प गुजराथला नेले तुम्ही कधी तरी थोबाड उघडल का ? राज्यावर कोवीडच संकट आल ! भाजपाने महाराष्ट्रात एक रूपया न ठेवता. सर्व शहा- शहेनशहांच्या चरणी दिल्लीत अर्पण केले. पंतप्रधान निधी ! कुठेही कसलीही नोंद नाही ! हिशोब देण्याचे बंधन नाही ! जनतेचा पैसा म्हणजे आपल्या बापजाद्याची इस्टेट ! पुनश्च म. वि. आ. सरकारला प्रश्न विचारालया निर्लज्जपणे व कोडगेपणाने तयार ! सरकारने राज्यात काय केले? तुम्ही कोवीड काळात सरकार विरोधी आंदोलने केली! इकडे राज्यात लोक मरताहेत! तुम्ही मात्र बोंबा मारून होळी साजरी करताय ! हेच तुमचं महाराष्ट्र प्रेम काय ? नैसर्गिक संकटात महाराष्ट्राला केंद्र सरकारने एक पैसा दिला नाही. नैसर्गिक संकट येताच मोदी गुजराथमध्ये येवून खमण ढोकळे खावून गेले. दिल्लीला परत जातांना महाराष्ट्राच्या सीमेवरून गेले. पण राज्याकडे ढुंकून पाहिले नाही. तुमचे सुध्दा हाताची घडी अन तोंडावर बोट ! आपण राज्याचे नेते म्हणून एक शब्दाने तरी पंतप्रधानांना विचारले का, महाराष्ट्राला का बरे मदत करीत नाही ? तुम्ही विचारणार तरी काय ? सगळेच उंदीर मांजराच्या गळयात घंटा बांधणार तरी कोण ?, असा सवाल अनिल गोटे यांनी केला आहे. (Anil gote criticizes fadnavis)
‘तुमच्या पदराखाली आश्रयाला असलेले प्रसाद लाड, राम कदम, राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्ध न पाटील यांच्या, प्रामाणिकपणाच्या आणि चारित्र्याच्या महाराष्ट्रात लोक शपथा घेतात. चिक्की घोटाळा, दप्तर खरेदी घोटाळा, शिक्षक भरती घोटाळा, आरोग्य शिबीर घोटाळा, तुमचं जमीन घोटाळे मी काढायला सुरूवात केली तर तोंड लपवायला जागा सापडणार नाही. सिडको जमिन घोटाळा इ. घोटाळयामध्ये आपल्या ५ वर्षातील क्षण आणि क्षण गुंतला आहे.आज एवढेच लक्षात असु दया की, लोकांना काही कळत नाही. या गैरसमजात तुम्ही आहात असेच जर भाजपवाल्याना वाटत असेल तर मुर्खाच्या नंदनवनात सुरू असलेला त्यांचा नाच त्यांनाच लखलाभ असो,असे खणखाणीत उत्तर राष्ट्रवादीचे उपध्यक्ष अनिल गोटे यांनी दिले आहे.
BJP took donations from Mumbai blast accused Iqbal Memon’s firm: Anil Gote
अनिल गोटे यांचा भाजपला ‘वात्सल्य’युक्त टोला !
पडळकरांच्या आडून भाजपने धनगर विरूद्ध मराठा भांडण लावले : अनिल गोटे यांचा आरोप
शरद पवार म्हणाले, ‘गोपीचंद पडळकरांविषयी मला बोलायचे आहे, पण…’
पडळकरांच्या आडून भाजपने धनगर विरूद्ध मराठा भांडण लावले : अनिल गोटे यांचा आरोप
जिथे सरकारे भ्रष्ट असतात तिथे निधीची कितीही तरतूद केली तरी विकास शक्य नाही, म्हणूनच आम्ही…
अपहरणाचा आरोप झाल्यानंतर जेडीएस नेते एचडी रेवन्ना ( HD Revanna ) यांना पोलिसांनी ताब्यात (…
गेली दहा वर्षे जनतेला भूलथापा देणाऱ्या केंद्रातील मोदी सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी इंडिया आघाडीला(India aghadi)…
गद्दारांना धडा शिकविण्याची (Teach traitors a good lesson) आयतीच संधी लोकसभा निवडणुकांमुळे चालून आली आहे.ही…
नाशिक लोकसभा मतदार संघातून शिवसेना पक्षाला उमेदवारी सोडल्यानंतर महायुतीच्या (Mahayuti) उमेदवाराला मंत्री छगन भुजबळांच्या सुचनेने…
चांगल्या आरोग्यासाठी भाजी आणि फळांचे सेवन ज्याप्रमाणे गरजेचे आहे(Benefits of eating ragi). त्याचप्रमाणे आपल्या पोटामध्ये…