मनेका गांधी जितेंद्र आव्हाडांच्या भेटीला

टीम लय भारी

मुंबई: माजी केंद्रीय मंत्री व भाजपाच्या नेत्या मनेका गांधी यांनी आज मुंबईत येऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांची भेट घेतली. त्यामुळे चर्चांना उधाण आलंय.( Maneka Gandhi met NCP leader Jitendra Awhad)

भाजप खासदार मनेका गांधी यांनी महाविकास आघाडी सरकारमधील गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांची भेट घेतली आहे. मनेका गांधी आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात सुमारे 30 मिनीटे चर्चा झाली. प्राण्यांचे संरक्षण आणि पशुवैद्यकीय दवाखाना, प्राण्यांच्या दफनासाठी जागा या विषयांवर या भेटीत चर्चा झाल्याची माहिती मेनका गांधी यांनीच प्रसारमाध्यमांना दिली.  शुवैद्यकीय दवाखाना व प्राण्यांच्या दफनासाठी मुंबई पूर्व पश्चिम उपनगरे येथे जागा निश्चित करण्यासंदर्भात आज भाजपच्या उत्तर प्रदेश सुलतानपूर च्या खासदार मनेका गांधी यांनी गृहनिर्माण मंत्री यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. त्यांच्यासोबत माजी खासदार प्रितेश नंदीही होते.

देवेंद्र फडणवीसांना फोन टॅपिंग अहवाल गहाळ प्रकरणी समन्स

आज अटलबिहारी वाजपेयींची 97 वी जयंती, मान्यवरांकडून अभिवादन

मुक्या प्राण्यांना त्यांच्या निधनानंतर दफनभूमीसाठी जागा उपलब्ध करून देण्यासंदर्भामध्ये तसेच जनावरांच्या हॉस्पिटल संदर्भामध्ये त्यांनी ही भेट घेतली. याप्रसंगी बोलताना गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले की, मुंबई उपनगरांमध्ये १२०० स्क्वेअर मीटर इतकी जागा ह्या हॉस्पिटलसाठी देण्यात येणार आहे. या जागेवर ५१ हजार स्क्वेअर फूट इतकं बांधकाम केलं जाईल. सहाजिकच मुंबई उपनगरात मुक्या प्राण्यांसाठी हॉस्पिटलची गरज असल्याचंही त्यांनी सांगितलं. हा काही कुठला सरकारी प्रोजेक्ट नाही आहे, तरीही आपण प्राणी मित्र असल्याने या प्रकरणांमध्ये जातीने लक्ष घालून हा प्रोजेक्ट पूर्ण करणार असेही त्यांनी सांगितले.

मनेका गांधी या भाजप खासदार आहेत. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारीणीच्या सदस्या म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. दरम्यान, मध्यंतरी झालेलया भाजपच्या नव्या कार्यकारीणीत मनेका गांधी यांना स्थान मिळू शकले नाही. त्या सुलतानपूर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे लोकसभेवर प्रतिनिधीत्व करतात. त्यांचे पूत्र वरुन गांधी हे पिलभीत येथून खासदार आहेत. दरम्यान, पाठीमागील काही दिवसांपासून वरुन गांधी हे भाजपवर जोरदार निशाणा साधताना दिसत आहेत. वरुन गांधी यांनी अनेकदा भाजप नेतृत्वावर टीका करुनही मनेका गांधी यांनी एकदाही त्यावर जाहीर प्रतिक्रिया दिली नाही. वरुन गांधी यांनी योगी सरकार आणि केंद्रातील मोदी सरकार यांच्यावर वेळोवेळी टीका केली आहे. त्यामुळे आगामी काळात पक्ष त्यांच्यावर कारवाई करणार का? याबाबत उत्सुकता आहे

BJP : भाजपाचा राज्य सरकारवर ‘निशाणा’, ‘गोरगरीब जनता इथे उपाशी, बिल्डरांना मात्र मणीहार…’

‘Ailing’ TMC leader Mukul Roy says BJP will win in upcoming Bengal civic polls

Team Lay Bhari

Recent Posts

कॉंग्रेसच्या विकासनितीमुळेच आमची प्रगती, तरीही आमच्या मुलाच्या डोक्यात मोदीप्रेम !

लय भारीचा शिर्डी मतदार संघात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौरा सुरू आहे. यादरम्यान मतदार संघातील मतदारांना भेटून…

17 mins ago

म्हशीच्या बाजारात निलेश लंकेंचा चाहता भेटला, विखे पितापुत्रांवर जाम संतापला !

लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा आता होवू घातला आहे या पार्श्वभूमीवर तळागाळातील सामान्य जनतेच्या भावना जाणून…

1 hour ago

कट्टर हिंदू, मोदींचा २०१४ मधील भक्त, आता मोदींवर तोफा डागतोय

लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा आता होवू घातला आहे या पार्श्वभूमीवर तळागाळातील सामान्य जनतेच्या भावना जाणून…

3 hours ago

भुजबळांकडून ‘तुतारी’चा प्रचार, मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा; आमदार कांदेंची मागणी

सध्या लोकसभा निवडणुकांची  धामधूम सुरु असल्याने सत्ताधाऱ्यांसह विरोधकांकडून जोरदार प्रचार चालू आहे. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी…

16 hours ago

अक्षय तृतीयेच्या निमीत्ताने बाजारपेठेत कोट्यवधीची उलाढाल

साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या अक्षय्य तृतीयेचा (Akshaya Tritiya ) सण शुक्रवारी (दि. १०) उत्सहात…

16 hours ago

तरुणाचा भररस्त्यात कोयत्याने वार करत निर्घृण खून

इगतपुरी तालुक्यातील सांजेगाव येथील तरुणाचा भर रस्त्यात तरुणाचा कोयत्याने वार करत आणि बंदुकीतून गोळ्या झाडत…

17 hours ago