महाराष्ट्र

देशाचे लक्ष मराठा आंदोलनाकडे वळवणारे मनोज जरांगे पाटील कोण आहेत?

जालना येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनावर पोलिसांनी शुक्रवारी लाठीचार्ज केला. या आंदोलनाचे नेतृत्व केले होते मनोज जरांगे -पाटील यांनी. हे मनोज कोण आहेत याची उत्सुकता राज्यातील नेते, कार्यकर्ते यांच्यासह सामान्यांना आहे. त्यामुळेच गुगल सर्च वर अनेकांनी त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला. पण फारसा उपयोग झाला नाही. पण या मनोज जरांगे यांची माहिती आता हाती आली आहे

आठ वर्षांपूर्वी मराठा आरक्षणासाठी राज्यभर विविध जिल्ह्यात मूक मोर्चे सकल मराठा समाजाने काढले होते. त्यानंतर
हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले. तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने मोर्चेकऱ्यांना विविध आश्वासने दिली. पण त्यातील अनेक आश्वासने, निर्णय सर्वोच्च न्यायालयात टिकले नाहीत. त्यामुळे हे आंदोलन काही काल शांत झाले असे वाटत असताना गाव खेड्यात आरक्षणाबाबत मराठा तरुण आक्रमक होते. अशी आंदोलने तालुका, जिल्हा स्तरावर होत होती.
असेच एक आंदोलन जालनामध्ये मनोज जरांगे -पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू होते.पण शुक्रवारी सरकारने पोलिसी बळाचा वापर करून हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला. यात अनेक आंदोलक जखमी झाले आणि सरकार विरोधात रोष निर्माण झाला.

जालना जिल्ह्यातून सुरू झालेल्या या आंदोलनातील मुख्य नेते असणारे मनोज जरांगे हे मूळचे बीड जिल्ह्यातील. गेवराई तालुक्यातील माथोरी हे त्यांचे मूळ गाव. शहागड ही त्यांची सासुरवाडी. गेल्या १२ -१५ वर्षापासून ते शहागडमध्ये राहतात. माथोरी गावातील हा अल्पभूधारक शेतकरी. मराठा आंदोलने सुरू झाली तेव्हापासून छोट्या- मोठ्या आंदोलनात सहभागी होणारे, प्रसंगी पुढारपण करता आले तर एखादे भाषण करणाऱ्या मनोज जरांगे -पाटील कोण आंदोलनानंतर त्याचे पडसाद राज्यभर उमटतील, असे त्यांनाही कदाचित वाटले नव्हते.

हे ही वाचा 

मराठा आंदोलकांबाबत राज ठाकरे यांचे मोठे विधान…. काय म्हणाले राज ठाकरे?

मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज कऱणाऱ्या दोषी पोलिसांवर कारवाईचे निर्देश : अजित पवार

मराठा समाजाच्या आदोंलकांवरील पोलिसांच्या लाठीचार्जची उच्चस्तरीय चौकशी : एकनाथ शिंदे

२०१५ पासून गावागावात आंदोलन करण्यासाठी १२ पर्यंत शिकलेल्या जरांगे यांनी विविध आंदोलने केली. अगदी गेल्या काही महिन्यात अनेक गावात उपोषण केले. त्या- त्या गावातील लोक त्यांच्या आंदोलनात सहभागी होते. असे असताना अंतरवाली सराटी येथे त्यांनी केलेल्या आंदोलानंतर पोलिसांनी लाठीचार्ज करून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला. आणि मनोज जरांगे हे नाव सध्या भलतेच लोकप्रिय झाले आहे.

विवेक कांबळे

Recent Posts

मनुका खाण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या

निरोगी राहण्यासाठी आरोग्य तज्ज्ञ सुका मेवा खाण्याचा सल्ला देतात. मनुका हे देखील एक ड्राय फ्रूट…

19 mins ago

Dhangar Resevation | नरहरी झिरवाळ यांना धनगर उपोषणकर्त्यांनी ठणकावले

पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Dhangar Reservation | Narahari Jirwal…

3 hours ago

उभे राहून पाणी पिल्याने होणार ‘हे’ नुकसान, जाणून घ्या

आपल्या शरीरासाठी पाणी फार महत्वाचे आहे. निरोगी राहण्यासाठी शरीरात पाणी असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे…

3 hours ago

PCOD असलेल्या महिलांनी नक्की करा स्ट्रेंथ ट्रेनिंग एक्सरसाइज

PCOD ही हार्मोनल असंतुलनाशी संबंधित समस्या आहे. यामध्ये स्त्रीच्या अंडाशयात सिस्ट तयार होतात. यामुळे मासिक…

4 hours ago

Devendra Fadanvis | देवेंद्र फडणविसांनी धनगरांना फसविले, आम्ही भाजपला विधानसभा निवडणुकीत शाप देवू |

पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Devendra Fadnavis cheated Dhangars) आरक्षण…

4 hours ago

पावसाळ्यात या 5 प्रकारच्या तेलांनी करा केसांना मसाज, केसगळतीपासून मिळेल आराम

पावसाळ्यात केस तुटण्याची आणि गळण्याची समस्या वाढते. वास्तविक या काळात पावसात भिजल्यामुळे केसांची मुळे कमकुवत…

7 hours ago