28 C
Mumbai
Sunday, September 3, 2023
घरमहाराष्ट्रमराठा आंदोलकांवर लाठीचार्ज कऱणाऱ्या दोषी पोलिसांवर कारवाईचे निर्देश : अजित पवार

मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज कऱणाऱ्या दोषी पोलिसांवर कारवाईचे निर्देश : अजित पवार

जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील अंतरवली येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्यांवर पोलिसांकडून झालेला लाठीमार, हवेतील गोळीबार, बळाच्या गैरवापरासंबंधी उच्चस्तरीय चौकशीचे आणि दोषी पोलिसांवर कठोर कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी (दि.2) रोजी दिली.

अजित पवार यांनी म्हटले आहे की, सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. मराठा समाजाच्या नेत्यांसोबत चर्चा करुन या प्रश्नावर तोडगा काढण्याची राज्य सरकारची तयारी आहे. राज्याच्या काही भागात बसगाड्यांवर दगडफेक, जाळपोळ, हिंसाचाराच्या घटना होत असून त्या तातडीने थांबवण्याची गरज आहे. दगडफेक, जाळपोळ, हिंसाचारात आपल्या राज्याच्याच संपत्तीचे नुकसान होत असल्याचे देखील अजित पवार म्हणाले.

अजित पवार म्हणाले, या आंदोलनामुळे नागरिकांना इजा होण्याची भीती आहे. त्यामुळे दगडफेक, जाळपोळ हिंसाचार टाळला पाहिजे. आजपर्यंत शांततेच्या, लोकशाहीच्या मार्गाने सुरु असलेले आंदोलन यापुढेही त्याच मार्गाने पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. राज्याच्या काही भागात सुरु असलेला हिंसाचार थांबवण्यासाठी आपण पुढे यावे असे आवाहन त्यांनी मराठा समाजातील नेत्यांना कार्यकर्त्यांना केले.

हे सुद्धा वाचा 

एक फुल, दोन हाफ…. कुणाला म्हणाले उद्धव ठाकरे!
Happy Birthday इशांत शर्मा | क्रिकेटशिवाय इशांतला आवडतात ह्या गोष्टी..
संरपंचाने पेटवली स्वत:ची कार; मराठा आंदोलकांवरील लाठीचार्जचा नोंदवला निषेध

मराठा आरक्षणाच्या मुद्यावर तसेच अंबड तालुक्यातील लाठीमार घटनेसंदर्भात चर्चा करुन मार्ग काढण्यासाठी राज्य शासनाची तयारी आहे. मराठा बांधवांच्या, महाराष्ट्राच्या हितासाठी राज्यात सुरु असलेला हिंसाचार तात्काळ थांबवला पाहिजे. राज्यात शांतता, कायदा-सुव्यवस्था कायम राहिल, यासाठी आपण सर्वांनी सहकार्य, प्रयत्न करुया, राज्यातील नागरिकांनीही शांतता पाळून कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी शासनाला सहकार्य करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी केले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी