महाराष्ट्र

पँथरच्या पुनरुज्जीवनासाठी मराठवाड्याचा पुन्हा पुढाकार

 

टीम लय भारी

१९७७ सालात सामाजिक कार्यकर्ते राजा ढाले यांचा बरखास्तीचा निर्णय धुडकावून लावत दोनच महिन्यांत दलित पँथरला जीवनदान दिलेल्या मराठवाड्याने यंदाच्या वर्षी साजऱ्या होणाऱ्या पँथरच्या सुवर्ण महोत्सवात भारतीय दलित पँथरच्या पुनरुज्जीवनासाठी पुन्हा एकदा पुढाकार घेतल्याचे दिसून येत आहे.
पँथरचे मराठवाड्यातील अग्रणी ऍड रमेशभाई खंडागळे यांच्या अध्यक्षतेखाली काल १० मार्च रोजी, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त नवी मुंबईत पँथर्सची एक बैठक झाली. खारघर येथील सत्याग्रह कॉलेजच्या सभागृहात झालेल्या या बैठकीत मराठवाड्यासह अनेक जिल्ह्यांतील पॅंथर्सनं सहभाग घेतला होता.

या बैठकीत भारतीय दलित पँथरचे पुनरुज्जीवन करण्यासाठी एक संपर्क समिती स्थापन करण्यात आली. ही समिती पुढील दोन महिन्यांत मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या प्रदेशांचा दौरा करणार आहे. त्यातून राज्यभरातील पँथर्ससहित छोट्या मोठ्या सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते आणि विद्यार्थी- तरुण पिढी यांच्याशी एकूणच मागास समूहांच्या ज्वलंत प्रश्नांवर संवाद साधण्यात येणार आहे.

या समितीमध्ये सहभागी असलेली मंडळी: ऍड रमेशभाई खंडागळे, मुंबई: प्रा डॉ जी के डोंगरगावकर, आनंद कांबळे, ठाणे: प्राचार्य रमेश जाधव, प्रा एकनाथ जाधव, नवी मुंबई: प्रा महेंद्र सूर्यवंशी, औरंगाबाद: सुभाष ठोकळ, ऍड विजय जाधव, नांदेड: दशरथ लोहबंदे ( जिल्हा परिषद सदस्य), जालना: शिवाजी आदमाने, लातूर : संजय कांबळे, बुलडाणा: संतोष तायडे, निलेश वानखेडे, परभणी : राहुल मोगले, बीड: किसन तांगडे, उस्मानाबाद: विश्वनाथ तोडकर, नंदुरबार: रवी गोसावी यांचा समावेश आहे.
राज्यव्यापी दौऱ्यानंतर सर्व प्रदेश आणि जिल्ह्यातील पँथरच्या पुनरुज्जीवनासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांचा संपर्क समितीमध्ये समावेश करण्यात येईल, असे रमेशभाई खंडागळे यांनी कालच्या बैठकीत जाहीर केले.

ऍड रमेशभाई खंडागळे कालच्या बैठकीत म्हणाले, १९७० च्या दशकात देशभरात दलितांवर वाढलेल्या हिंसक अत्याचारांविरोधात तरुणांच्या संतापाच्या उद्रेकातून दलित पँथरचा जन्म झाला. आजची परिस्थिती त्याहून काही वेगळी नाही, आजही दलितांना अशाच भयावह परिस्तिथीला सामोरं जावं लागत आहे. आणि दलित नुसते असुरक्षित नाहीत, तर त्यांना सुरक्षिततेची हमी देणारे संविधान आणि लोकशाहीसुद्धा संकटात सापडली आहे.

Jyoti Khot

Recent Posts

भाजप मुंबईत अडचणीत, ज्येष्ठ संपादिका राही भिडे यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा टप्पा सोमवारी आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा हा अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात…

6 hours ago

मोदी सरकारच्या काळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी केवळ देशच सोडला नाही तर देशाचे नागरिकत्वही सोडले – प्रकाश आंबेडकर

मोदी सरकारच्या (Modi govt) कार्यकाळात १७ लाख हिंदू कुटुंबियांनी देश सोडला आहे. ५० कोटिहून अधिक…

8 hours ago

नाशिकजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्ब्याखालून धूर, जीवाच्या आकांताने प्रवाशांच्या उड्या

आज नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगावजवळ गोदान एक्स्प्रेसच्या ( Godan Express) डब्याखालून अचानक धूर निघाल्याने…

9 hours ago

द ग्रेट इंडियन कपिल शोच्या मीड सीझनचा प्रोमो रिलीज

'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा (The Great Indian Kapil Show's) नवा मीड सीझनचा प्रोमो रिलीज…

10 hours ago

ऐनवेळची धावपळ टाळण्यासाठी मतदान केंद्राची माहिती आधीच घ्या- जिल्हाधिकारी जलज शर्मा

लोकसभा निवडणूक 2024 साठी नाशिक जिल्ह्यातील 20 दिंडोरी व 21 नाशिक लोकसभा मतदार संघांसाठी सोमवार,…

10 hours ago

त्र्यंबकेश्वर येथे युवकास जीवे मारण्याचा प्रयत्न; रोकडही लांबवली

पार्किंगच्या जागेच्या कथित वादावरुन १२ जणांनी एकास जीवे (kill) मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी १२ जणांवर त्र्यंबकेश्वर…

11 hours ago