नांदेडच्या सरकारी रुग्णालयात 24 तासांत 24 जणांचा मृत्यु; उद्या चौकशी समिती जाणार

कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील 22 रुग्ण दगावल्याची घटना घडली होती. असे असताना, नांदेड येथील शासकीय रुग्णालयात 24 तासांमध्ये 24 रुग्णाचा मृत्यू झाला. या घटनेने खळबळ माजली असतानाच, मृत्यूची चौकशी करण्यासाठी आरोग्य संचालकांची समिती मंगळवारी नांदेडला जाणार आहे. त्याचसोबत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ हे देखील नांदेडमधील रुग्णालयाला भेट देणार आहेत. नांदेडच्या शासकीय रुग्णालयात गेल्या 24 तासांमध्ये 24 रुग्णांना आपला जीव गमवावा लागल्याने एकच खळबळ उडाली आहे.

हाफकीनने औषधी खरेदी बंद केल्यामुळे राज्यभरातील शासकीय रुग्णालयात औधधांचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे, अत्यवस्थ रुग्णांना वेळेत औषधे पुरवठा होत नसल्याने जीव गमवावा लागत आहे. असाच धक्कादायक प्रकार नांदेड मधल्या शासकीय रुग्णालयात पुढे आला आहे. गेल्या 24 तासात 24 रुग्णांचा रुग्णालयात मृत्यू झाला असून त्यात गंभीर बाब म्हणजे बारा नवजात बालकांचाही मृतात समावेश आहे. या घटनेमुळे आरोग्य यंत्रणेची लक्तरे वेशीवर टांगल्या गेली आहेत. या प्रकरणी शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता यांनी मृतांध्ये बाहेरच्या रुग्णाचा जास्तीचा समावेश होता असा दावा करत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केलाय. या घटनेमुळे नांदेडमध्ये एकच खळबळ उडाली असून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी होत होती.

यावर प्रतिक्रिया देताना राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की, नांदेडमध्ये दररोज 1500 ते 1600 रुग्ण याठिकाणी येतात. आजूबाजूच्या जिल्ह्यातील मोठ्या संख्येने रुग्ण नांदेडमध्ये येतात. मृतांमध्ये 12 बालके आहेत, त्यापैकी 48 तासात दाखल झालेले 6 बालके होती तर 24 तासात दाखल झालेली सहा बाळं होती. त्यामध्ये साप चावल्याने दोघांचा मृत्यू झाला. गंभीर आजारामुळे सात जण दगावले तर प्रसूतीमुळे एक आणि हृदयविकाराच्या झटक्याने दोघांचा मृत्यू झाला आहे. म्हणजे 24 तासात 24 मृत्यू झाले आहेत हे खूप दुर्दैवी आहे. मंगळवारी मी स्वतः नांदेडला जाणार आहे. त्याआधी मी अधिकाऱ्यांना नांदेडला पाठवलं आहे, त्यांच्याकडून आढावा घेतला जाईल.

 हे सुद्धा वाचा 

‘द व्हॅक्सीन वॉर’कडे प्रेक्षकांची पाठ
वनविभाग आणि सहकार विभागाच्या परीक्षांचे निकाल लांबणीवर! विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला!
कोथरुडमध्ये ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताह’, आठवडाभर रंगणार गांधींजींच्या विचारांचा जागर!

नांदेडच्या शासकीय रुग्णालयात 24 तासात 24 मृत्यू झाल्याची घटना घडल्यानंतर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी तातडीने रुग्णालयास भेट देऊन चौकशी केली. 24 मृतांमध्ये 12 नवजात बालकांचा समावेश असल्याने या बातमीने खळबळ उडाली आहे. एवढे मृत्यू 24 तासात कसे झाले याबाबत चव्हाणांनी अधिष्ठातांकडून माहिती घेतली. धक्कादायक म्हणजे आणखी 70 रुग्ण हे अत्यवस्थ आहेत. सध्या या रुग्णांना वाचवण्यासाठी प्राधान्य देण्याची गरज चव्हाणांनी व्यक्त केली. रुग्णालयातील नर्सेसच्या बदल्या झाल्या आहेत. डॉक्टरांची कमतरता आहे. तेव्हा तातडीने सरकारने याची दखल घ्यावी. ज्या कमतरता या रुग्णालयात आहेत त्याची तातडीने पूर्तता करावी, घटनेची चौकशी करावी अशी मागणी चव्हाणांनी केली.

टीम लय भारी

Recent Posts

NEET बद्दल बोलताच राहुल गांधींचा माईक बंद करण्यात आला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल…

2 days ago

आणीबाणीमुळे देशाचा फायदा झाला

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे.सदर व्हिडीओमध्ये आणीबाणी ह्या विषयावर सखोल…

2 days ago

मोदी सरकारची थापेबाजी, GST ची केली भजी !

विश्वास उटगी यांनी 'लय भारी'सोबत विविध विषयांवर संवाद साधलेला आहे(PM Narendra Modi and GST).सदर व्हिडीओमध्ये…

2 days ago

देवेंद्र फडणविसांच्या लाडक्या आमदाराची दादागिरी !

लय भारी चे संपादक तुषार खरात यांनी सातारा जिल्ह्यातील दहीवडी या गावाला भेट दिली(Devendra fadnavis…

1 week ago

कपिल पाटलांचा अभ्यंकर, नलावडे यांच्यावर निशाणा

'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी काही दिवसांपूर्वीच कपिल पाटील यांची मुलाखत घेतली. कपील पाटील…

1 week ago

तहसिलदारांचा राजेशाही थाट, लोकांची कामे सोडून बोंबलत फिरतात

सदर व्हिडीओ सातारा जिल्हा,तालुका मान येथाील दहीवडी या गावातील आहे.'लय भारी' चे संपादक तुषार खरात…

1 week ago