32 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रकोथरुडमध्ये 'राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताह', आठवडाभर रंगणार गांधींजींच्या विचारांचा जागर!

कोथरुडमध्ये ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताह’, आठवडाभर रंगणार गांधींजींच्या विचारांचा जागर!

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. महात्मा गांधींचे विचार जनमानसात रुजवण्यासाठी गावखेड्यांपासून आंतरराष्ट्रीय स्तरांपर्यंत प्रयत्न केले जातात. अश्यातच यंदा पुण्यात ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताह’ आयोजित करण्यात आला आहे. हा बहुरंगी कार्यक्रम रविवार, 1 ऑक्टोबर ते रविवार, 8 ऑक्टोबर दरम्यान आयोजित केले असून महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष आणि युवक क्रांती दलाचे संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी या सर्व कार्यक्रमांचे अध्यक्षपद भूषविणार आहेत. यंदा या कार्यक्रमाचे 12 वे वर्ष असून काल, रविवारी (1 ऑक्टोबर) उद्घाटन समारंभ पार पडला.

पुण्यातील कोथरूड येथील गांधी भवन येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताहाच्या सर्व कार्यक्रमांचे आयोजन होणार असून काल रविवारी, डॉ. कुमार सप्तर्षी लिखित ‘धर्माबद्दल’ या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन पार पडले. यावेळी अनेक मान्यवर आणि विविध धर्मांचे धर्मगुरू उपस्थित होते.


आज सोमवारी, (2 ऑक्टोबर) 154 व्या गांधी जयंतीच्या निमित्ताने देखील विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असून सकाळी प्रार्थना आणि भजनांचे आयोजन करण्यात आले होते तर संध्याकाळी, शांती मार्चचे आयोजन केले आहे.

याशिवाय, पूर्ण आठवडाभर विविध कार्यक्रम रंगणार असून विविध क्षेत्रातील मातब्बर मंडळी कार्यक्रमस्थळी भेटी देणार आहेत.

हे ही वाचा 

म्हणून २ ऑक्टोबर पासून भारतात स्वच्छ भारत मिशन सुरु झाला…

‘कुठेतरी आपलं चुकतंय…’ विसर्जन मिरवणुकीबद्दल राज ठाकरेंचे परखड मत!

लोकसभेत आंबेडकरांची वेगळी चूल, ४८ जागांवर निवडणूक लढवणार

‘राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताह’ कार्यक्रमाची रुपरेखा 

रविवार, 1 ऑक्टोबर
सायं. 5.00 वाजता- उद्घाटन समारंभ, डॉ. कुमार सप्तर्षी लिखित ‘धर्माबद्दल’ पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन

सोमवार, 2 ऑक्टोबर
सकाळी 8.30 वाजता- प्रार्थना व भजन
सकाळी 10.00 ते दुपारी 3.00- प्रसादभोजन
दुपारी 4.00 वाजता- गांधी पुतळा (गांधी भवन, कोथरूड, पुणे) ते गोखले पुतळा (गुडलक चौकाजवळ फर्ग्युसन कॉलेज रोड, पुणे) दरम्यान शांतीमार्च

मंगळवार, 3 ऑक्टोबर
सायं. 6.00 वाजता- प्रा. डॉ. मर्णीद्रनाथ ठाकुर (जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, दिल्ली) यांचे व्याख्यान. विषय- आज यदि गांधी होते तो…

बुधवार, 4 ऑक्टोबर
सायं. 6.00 वाजता- परिसंवाद विषय: लोकसभा निवडणूक २०२४ आव्हाने व पर्याय
वक्ते- विजय चोरमारे (पत्रकार आणि अभ्यासक), किरण माने (प्रसिद्ध अभिनेते आणि कलाकार)

गुरुवार, 5 ऑक्टोबर
सायं. 6.00 वाजता- पत्रकार आणि अभ्यासक पी. साईनाथ यांचे व्याख्यान
विषय: आजचे वर्तमान आणि आव्हाने

शुक्रवार, 6 ऑक्टोबर
सायं. 6.00 वाजता- विचारवंत आणि अभ्यासक सुधींद्र कुलकर्णी यांचे व्याख्यान
विषय : गांधी समजून घेताना

शनिवार, 7 ऑक्टोबर
सायं. 6.00 वाजता- अविष्कार निर्मित ‘उमगलेले गांधी अभिवाचनाचा प्रयोग सहभाग : अभिनेते दिलीप प्रभावळकर, सुहिता थत्ते, धनश्री करमरकर आणि दीपक राजाध्यक्ष

रवीवार, 8 ऑक्टोबर
सकाळी 10.00 ते सायं. 6.00 पर्यंत-
पहिले सत्र मा. सत्यरंजन धर्माधिकारी (माजी न्यायमूर्ती) विषय: गांधी विचार आणि न्यायव्यवस्था
दुसरे सत्र : मा. डॉ. कुमार सप्तर्षी विषय: सत्याग्रह शास्त्र
तिसरे सत्र प्रा. डॉ. शैलजा बरूरे (प्रमुख, गांधी अभ्यास केंद्र, स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालय) विषय: गांधी आंबेडकर विचार आणि वारसा

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी