31 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeमनोरंजन'द व्हॅक्सीन वॉर'कडे प्रेक्षकांची पाठ

‘द व्हॅक्सीन वॉर’कडे प्रेक्षकांची पाठ

‘काश्मीर फाईल्स’ फॅम दिग्दर्शक अतुल अग्नीहोत्री यांच्या ‘द व्हॅक्सीन वॉर’कडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे. सिनेमा २८ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला. दोन दिवसांत केवळ १ कोटी ५० लाख रुपयांची कमाई झाल्यानं चित्रपट लवकरच सिनेमागृहातून गाशा गुंडाळण्याची शक्यता आहे. या सिनेमाची हवा जास्त नसल्यानं ओटीटी प्लेटफॉर्मवरही सिनेमा चालणार की नाही याबद्दल संभ्रमता आहे. सिनेमानं प्रदर्शनाच्या दिवशी ८५ लाख रुपये कमावले. दुसऱ्या दिवशीही केवळ ८५ रुपये बिझनेस झाल्यानं दोन दिवसांत केवळ १कोटी ५० लाखांचा बिझनेस झाला. सिनेमात तगडी स्टारकास्ट असूनही प्रत्यक्षात प्रेक्षक सिनेमागृहात खेचण्यात निर्माती पल्लवी जोशी सपशेल अपयशी ठरली. सिनेमात नाना पाटेकर, अनुपम खेर, पल्लवी जोशी तसेच ‘जवान’ फेम गिरीजा ओक-गोडबोले यांनी महत्वाची भूमिका साकारली आहे.

भारतात प्रदर्शनाअगोदर युएसमध्ये सिनेमाचं विशेष स्क्रिनिंग झालं होतं. प्रदर्शनापूर्वी सिनेमातील कलाकारांकडून निर्मात्यानी प्रमोशन करून घेतलं नाही. सिनेमातील कलाकारही कुठेही सिनेमाविषयी मुलाखती देत नव्हते. चित्रपट प्रमोशन फंडा थेट ट्रेलर पाहून सिनेमागृहात पिक्चर पाहा असा मांडण्यात आला.

प्रेक्षक सिनेमागृहात येत नसल्यानं अखेरीस पल्लवी जोशीनंच याबाबतीत स्पष्टीकरण  दिलं. पल्लवी जोशी म्हणाल्या की , ‘सिनेमाच्या कथानकाबाबत बरेचजण गोंधळलेले आहेत…पण हा चित्रपट कोविडवर आधारित नाही. आम्ही फक्त कोरोना प्रतिबंधात्मक लस कशी बनवली, त्यातील अडचणी आणि आव्हानांबद्दल बोलत आहोत. हा अतिशय सकारात्मक चित्रपट आहे. सिनेमा पहिल्यानंतर प्रेक्षक थिएटरमधून बाहेर पडतील तेव्हा त्यांना अभिमानाने भरून येईल.’ पल्लवी जोशी या विवेक अग्निहोत्री यांच्या पत्नीदेखील आहेत.

हे सुद्धा वाचा 

कंगना रनौतची अबू सालेम सोबत मैत्री?
जॅकलीन चालली हॉलिवूडला! सोशल मीडिया पोस्ट चर्चेत…
अन ऐश्वर्याचा पापाराझीशी मराठीत संवाद! हसत पोझंही दिली

चित्रपटातील कथानक विज्ञानाला दुजोरा देतं. कोरोनातील ‘त्या’ नकोशा आठवणींवर सिनेनात फोकस झालेला नाही. संपूर्ण जग कोरोना प्रतिबंधात्मक लस बनवत असताना भारतातील शास्त्रज्ञानी अतिशय आव्हानात्मक परिस्थितीत दिवसरात्र एक करून या लशीची निर्मिती केली. या लशीकरिता आयसीएमआर या केंद्रीय संस्थेतील शास्त्रज्ञाचा लढा चित्रपटाच्या माध्यमातून आम्ही दाखवला आहे, असंही त्या म्हणाल्या.

सिनेमा हे मनोरंजनाचं साधन आहे, त्यातून वैचारिक बोध घेणेही जरुरीचे असते, ही आमची भूमिका आहे. भविष्यातही सत्य घटनांवर आधारित चित्रपट बनवण्याकडे आमचा प्रामाणिक प्रयत्न राहील, अशी भूमिका निर्मात्यांनी  मांडली. विवेक अग्निहोत्री हे खऱ्या अर्थाने काश्मीर फाइलमुळे प्रसिद्धी झोतात आले. दिग्दर्शक, पटकथा  लेखक असणारे  अग्निहोत्री हे   2019 पासून केंद्रीय फिल्म प्रमाणन बोर्ड (Central Board of Film Certification) चे सदस्य आहेत. 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी