अहमदनगरमध्ये अल्पवयीन मुलीची आत्महत्या, धक्क्यातून अल्पवयीन प्रियकराचाही शेतात गळफास

टीम लय भारी

अहमदनगर : अल्पवयीन प्रेयसीच्या आत्महत्येनंतर तिच्या प्रियकरानेही आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अल्पवयीन मुलीने राहत्या घरी गळफास लावून घेतल्याचं समजल्यानंतर अल्पवयीन मुलानेही शेतात गळफास घेत आपलं आयुष्य संपवलं. अहमदनगरमध्ये एकाच दिवशी घडलेल्या आत्महत्यांच्या दोन घटनांमुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत(Minor girl commits suicide in Ahmednagar).

काय आहे प्रकरण?

अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील आपटी येथे ही घटना घडली. अल्पवयीन मुलीच्या आत्महत्येनंतर काही तासातच प्रियकराने देखील गळफास घेऊन आत्महत्या केली. एकाच दिवशी अल्पवयीन मुलगी आणि मुलाने आत्महत्या केल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. मात्र दोघांनी आत्महत्या का केली, याबाबत अद्याप माहिती समजू शकलेली नाही.

भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचा गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न

धक्कादायक…. ! अहमदनगरच्या एसटी चालकाने संपवले आपले आयुष्य,एसटीलाच घेतला गळफास

नेमकं काय घडलं?

आत्महत्या करणाऱ्या मुलाचं वय 17 वर्ष, तर मुलीचं वय 16 वर्ष आहे. दोघांचे एकमेकाशी प्रेमसंबंध असल्याची प्राथमिक माहिती आहे. अल्पवयीन मुलीने आधी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. ही माहिती गावात वाऱ्यासारखी पसरली. गावातच राहणाऱ्या तिच्या प्रियकरालाही ही दुःखद बातमी समजली, त्यानंतर आपल्या प्रेयसीने नक्की आत्महत्या केली आहे का? याची खात्री करण्यासाठी तो प्रियकर मुलीच्या घरी गेला.

आत्महत्या करणाऱ्यांचा मृत्यू कोविड मुळेच, केंद्राचे सुप्रीम कोर्टात वक्तव्य

Tamil Nadu: Teacher ends life over student’s suicide

प्रियकराचा शेतातील झाडाला गळफास

त्यावेळी आपल्या प्रेयसीने आत्महत्या केली असल्याचे त्याले समजले. प्रेयसीच्या मृत्यूची वार्ता ऐकून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. प्रेयसीच्या आत्महत्येच्या धक्क्यातून सावरण्याआधीच त्याने मोठा निर्णय घेतला. अल्पवयीन मुलाने देखील शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस अधिक तपास करत असून दोघांनीही नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Team Lay Bhari

Recent Posts

आईचा मृत्यू झाला तरुणीने संपवले जीवन

आईचे छत्र हरपल्याने काकूकडे राहणाऱ्या अठरा वर्षीय तरुणीने विष पिऊन आत्महत्या (girl killed) केल्याची घटना…

2 hours ago

ओएलएक्सवर ग्राहकांची खरेदीदारांकडून फसवणूक

ओएलक्सवर ( OLX) साहित्य विक्री करणाऱ्या ग्राहकांची खरेदीदार संशयितांनी बोगस क्यूआर कोडचा झोल करुन सायबर…

2 hours ago

भाजपाचे अब की बार ४०० पार सोडा, देशभरातून ४० जागाही येणार नाही: मल्लिकार्जून खर्गे

काँग्रेस (congress) पक्ष देशासाठी लढला, अनेकजण फासावर गेले, पण महात्मा गांधी यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून…

3 hours ago

मानवतेच्या मसीहाला निरंकारी भक्तांचे नमन

हृदय सम्राट बाबा हरदेवसिंहजी यांच्या पावन स्मृति प्रित्यर्थ समर्पण दिवसाचे आयोजन करण्यात आले आहे .संत…

4 hours ago

धनगर समाजाचे नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी घेतली छगन भुजबळ यांची भेट

धनगर समाजाचे नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर(Dhangar community leader Gopichand Padalkar ) यांनी रविवारी मंत्री…

4 hours ago

देशभरातील हवा बदलली, ४ जूनला भाजपाचे सरकार जाऊन इंडिया आघाडीचे सरकार येणार: शशी थरुर

लोकसभेची ही निवडणूक (Lok sabha election) साधारण निवडणूक नसून भारताचा आत्मा सुरक्षित ठेवण्यासाठीचा हा संघर्ष…

4 hours ago