35 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
Homeआरोग्यआत्महत्या करणाऱ्यांचा मृत्यू कोविड मुळेच, केंद्राचे सुप्रीम कोर्टात वक्तव्य

आत्महत्या करणाऱ्यांचा मृत्यू कोविड मुळेच, केंद्राचे सुप्रीम कोर्टात वक्तव्य

टीम लय भारी

दिल्ली : कोरोना झालेल्या कोणत्याही रुग्णाने आत्महत्या केल्यास त्याच्या मृत्यूचे कारण कोविडमुळेच झालेला मृत्यू असे घोषित केले जाईल (corona patient commits suicide, the cause of death will be declared as death due to covid.)

केंद्र सरकारने अशा आशयाचे प्रतिज्ञापत्रक सुप्रीम कोर्टात सादर केले आहे. अशा परिस्थितीत त्यांच्या कुटुंबियांना भरपाईही देण्यात येईल.

इम्पिरिकल डेटा देण्यास केंद्र सरकारची असमर्थता

दोन डोस घेतलेल्या पत्रकारांना सभेत प्रवेश द्या, भाजप नगरसेवकांची महापौर दालनासमोर जोरदार निदर्शने

कोरोना झाल्याचे जाहीर झाल्यानंतर ३० दिवसांच्या आत जर संबंधित रुग्णाने आत्महत्या केली तर त्या रुग्णाच्या मृत्यूची नोंद आत्महत्या अशी न करता कोविड-१९  ची लहान झाल्याने झालेला मृत्यू अशी होईल. अशी माहिती केंद्र सरकारने दिली.

गेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टानं केंद्र सरकारला कोरोना मृत्यू प्रमाणपत्रातून आत्महत्या वगळण्याच्या आपल्या मार्गदर्शक तत्त्वांवर पुनर्विचार करण्यास सांगितलं होतं. अनुपालन अहवालावर समाधान व्यक्त करताना कोर्टानं काही प्रश्नही उपस्थित केले होते. कोरोनामुळे मृत्यू झाल्यावर नातेवाईकांना भरपाईची रक्कम मिळवण्यासाठी कोविड -19 मृत्यू प्रमाणपत्र आवश्यक आहे.

न्यायमूर्ती एमआर शाह आणि न्यायमूर्ती ए एस बोपण्णा यांच्या खंडपीठाने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना सांगितलं होतं, जर एखाद्या कोरोना पीडित रुग्णाने आत्महत्या केली असेल तर त्याला अशा प्रमाणपत्राचा हक्क मिळणार नाही. या निर्णयाचा पुनर्विचार होणं आवश्यक आहे. यावर मेहता म्हणाले होते की, कोर्टानं उपस्थित केलेल्या प्रश्नांवर विचार केला जाईल.

जादूटोण्याच्या घटना बंद, कृती आराखडा तयार : विजय वडेट्टीवार

Corona
आत्महत्या करणाऱ्यांचा मृत्यू कोविड मुळेच, केंद्राचे सुप्रीम कोर्टात वक्तव्य

Coronavirus September 22nd Highlights: Covid pandemic has been an unprecedented disruption and it is not yet over, PM Modi says at Global COVID-19 summit

वकील गौरव कुमार बन्सल आणि रिपक कन्सल यांच्या याचिकांवर 30 जून रोजी दिलेल्या आदेशानंतर केंद्र सरकारनं नुकतीच एक मार्गदर्शक सूचना जारी केली होती. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या संयुक्त मार्गदर्शक तत्त्वांमध्ये असे म्हटलं आहे की कोविड संक्रमित असल्यास आत्महत्या, हत्या किंवा अपघातामुळे झालेल्या जीवितहानीला कोरोनामुळे मृत्यू मानलं जाणार नाही.

यापूर्वी जर पीडितेचा कोरोनामुळे मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला 50 हजार रुपये भरपाई मिळेल. केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून ही माहिती दिली होती. केंद्र सरकारनं म्हटलं आहे की, ही भरपाईची रक्कम कोविड -19 साथीच्या भविष्यात किंवा पुढील अधिसूचनेपर्यंत चालू राहील. जे मृत कोविड मदत कार्यात सहभागी होते अशा मृतांच्या कुटुंबीयांना देखील भरपाई दिली जाईल. यासाठी आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार मृत्यूचे कारण कोविड -19 म्हणून प्रमाणित करणं आवश्यक आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी