महाराष्ट्र

मिशी कधी काढणार? आमदार संतोष बांगर यांना जयंत पाटलांची विचारणा

आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत राहणारे एकनाथ शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर पुन्हा एकदा त्यांच्याच वक्तव्याने अडचणीत आले आहे. अतिआत्मविश्वास दाखवून केलेले विधान त्यांच्या अंगलट आले असून आता तर त्यांना आपली मिशी गमाविण्याची पाळी आली आहे.

नुकत्याच पार पडलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत शिंदे गटाच्या उमेदवारांना १७ पैकी फक्त ५ जागा जिंकता आल्या आहेत. निवडणुकीपूर्वी संतोष बांगर यांनी कळमनुरीतील सर्वच्या सर्व १७ जागा जिकूंन दाखवल्या नाही तर मिशा ठेवणार नाही, असे विधान बांगर यांनी केले होते.

त्यामुळे विरोधकांकडून त्यांना कधी काढणार मिशा ?अशी विचारणा केली जात असून त्यांना प्रचंड टीकेला सामोरे जावे लागत आहे.
कळमनुरीत राष्ट्रवादी, उरलेली शिवसेना, काँग्रेस, वंचित हे सगळे एक झाले आहेत. पण आजही सांगतो, नागनाथाचे मंदिर समोर आहे. १७ पैकी १७ जागा जर निवडून आल्या नाही तर हा संतोष बांगर मिशा ठेवणार नाही, असे खुले आव्हान बांगर यांनी विरोधकांना दिले होते.

मात्र, त्यांच्या गटाला फक्त ५ जागा जिकंता आल्याने आमदार बांगर यांनी दिलेले आव्हान फसले असून त्यांच्यावर चक्क मिशा काढण्याची पाळी आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी निवडणुकीपूर्वी बांगर यांनी दिलेल्या आव्हानाचा व्हायरल व्हिडीओ पाहून बांगर यांच्यावर खोचक टीका केली आहे.

संतोष बांगर यांच्या वक्तव्याबद्दल प्रसारमाध्यमांशी बोलताना जयंत पाटील म्हणाले, एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले लोक शब्दांचे पक्के असतात. संतोष बांगर कालच गेले, ते नक्कीच मिशी काढतील. त्यांनी आपली मिशी काढली तर आम्ही त्यांचा सत्कार करणार आहोत .

शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी अयोध्या पौळ यांनी देखील संतोष बांगर यांना चिमटा काढत “मिशा कधी काढणार ? ” असा बोचरा सवाल केला आहे. अयोध्या पौळ यांनी बांगर यांचा उल्लेख गद्दार असा केल्यानंतर बांगर यांनी त्यावर प्रतिक्रिया देताना आम्ही शिवसैनिक आहोत.

आम्हाला कोणी आरे म्हटले तर आम्ही त्याला कारे म्हणणार नाही पण त्याच्या कानाखाली आवाज काढल्याशिवाय राहणार नाही, असे म्हटले होते. त्याचा संदर्भ देऊन अयोध्या पौळ म्हणाल्या ” माझ्या दादुड्याला चॅलेंज द्यायची फार हौस आहे.

हे सुध्दा वाचा :

मनुकुमार श्रीवास्तव कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकता, स्थितप्रज्ञता, सहनशीलता,अन् संयमाची शांत मूर्ती..!

पुण्यातील “महाराष्ट्र पोलीस मेगासिटी” गृहप्रकल्पात ५२५ कोटींचा घोटाळा, ७ हजार पोलिसांची फसवणूक..! 

पुण्यातील “महाराष्ट्र पोलीस मेगासिटी” गृहप्रकल्पात ५२५ कोटींचा घोटाळा, ७ हजार पोलिसांची फसवणूक..! 

कधी म्हणतो कानाखाली जाळ काढतो, तो काढलाच नाही. कधी म्हणतो, माझ्या गाडीला टच करून दाखवा त्यावरही काही करत नाही. आता बाजार समिती निवडणुकीत १७ जागा निवडून आल्या नाही तर मिशी काढतो, म्हणाला होता. संतोष दादूड्या, कधी काढतोयस मिशी? नक्की काढ, अशा शब्दात अयोध्या पौळ यांनी बांगर यांच्यावर प्रहार केला.

Team Lay Bhari

Recent Posts

महात्मा गांधी येथे आगीत दोन दुकाने जळून खाक

आज सायंकाळी सहाच्या वाजेच्या सुमारास टाऊन हॉल समोर असलेल्या खलील भाई बॅटरीवाला यांच्या दुकानाला आग…

12 hours ago

नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर धावत्या कारने घेतला पेट

सध्या जिल्ह्यासह राज्यभरात उन्हाचा कडाका चांगलाच वाढला आहे. या वाढत्या उन्हामुळे अनेकदा धावत्या वाहनांना आग…

12 hours ago

उद्धव ठाकरे तर मानसिक आजारी आहेत : चंद्रशेखर बावनकुळे

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पराभव दिसू लागल्याने त्यांचे मानसिक संतुलन ढासळले आहे. ते चिडलेले…

12 hours ago

मालेगाव येथे शाळेच्या आवारातून १ लाखाची एमडी पावडर जप्त; तिघांना अटक

शहरातील जुन्या मुंबई-आग्रा महामार्गावरील म्युन्सिपल हायस्कूल, कन्या शाळेच्या आवारात शहर पोलिसांनी छापा टाकून सुमारे एक…

13 hours ago

नरेंद्र मोदींचा रोड शो जनतेच्या पैशातून, महापालिकेने केला साडेतीन कोटीचा खर्च; संजय राऊत यांचा आरोप

घाटकोपरमध्ये बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा रोडशो झाला या रोडशोसाठी संपूर्ण मुंबईला वेठीस…

15 hours ago

पपई खाण्याचे आरोग्यदायी फायदे

पपई (papaya) ही आरोग्यासाठी (Health) खूप फायदेशीर ( benefits) मानली जाते. यामध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-बी, व्हिटॅमिन-सी,…

15 hours ago