महाराष्ट्र

Mumbai-Mandwa Water Taxi : मुंबई ते मांडवा वॉटर टॅक्सी 1 नोव्हेंबरपासून धावणार

मुंबईत गेल्या काही वर्षांपासून पाण्यातील टॅक्सी अर्थात वॉटर टॅक्सी धावणार असल्याची चर्चा सुरु होती. पण आता अखेरीस या चर्चेला पूर्णविराम लागला आहे. कारण लवकरच वॉटर टॅक्सी सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वॉटर टॅक्सी सुरु होण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रवाशांना आनंदाची बातमी मिळाली आहे. तर येत्या 1 नोव्हेंबरपासून मुंबई क्रूझ टर्मिनल (Mumbai) ते मांडवा (Mandwa) अशी वॉटर टॅक्सी प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे या मार्गावर वॉटर टॅक्सी सुरू झाल्यानंतर मुंबई ते मांडवा हा प्रवास अवघ्या 45 मिनिटांत पूर्ण करणे शक्य होणार आहे. जलमार्गाने प्रवाशांना वाहतुकीचा दुसरा पर्याय उपलब्ध व्हावा, यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेब्रुवारी 2022 मध्ये वॉटर टॅक्सी सेवा थाटात सुरु केली होती.

क्रूझ टर्मिनलच्या प्रवाशांसाठी उत्तम कनेक्टिव्हिटी सुविधा नसल्यामुळे वॉटर टॅक्सी कंपन्यांनी मुंबईतून सेवा सुरु करण्यास नकार दिला होता. सध्या बेलापूर ते जेएनपीटी, एलिफंटा दरम्यान वॉटर टॅक्सी सुरु आहे. मुंबई क्रूझ टर्मिनलवरून सेवा सुरु करण्यास परवानगी मिळाल्यानंतर जवळपास सहा महिन्यांनंतर नयनतारा शिपिंग कंपनीने मुंबई ते मांडवा दरम्यान वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे.

या प्रवासासाठी मोजावे लागणार 400 रुपये
मुंबई ते मांडवा दरम्यान जलमार्गाने प्रवास करण्यासाठी प्रवाशांना 400 रुपये मोजावे लागणार आहेत. नयनतारा शिपिंग कंपनीचे संचालक रोहित सिन्हा यांनी दिलेल्या माहितीनुसार, वॉटर टॅक्सीमधील प्रवाशांची सोय लक्षात घेऊन हे जहाज तयार करण्यात आले आहे. या जहाजातून जवळपास 200 प्रवासी एकाच वेळी प्रवास करू शकतील. जलवाहतुकीदरम्यान प्रवाशांना जहाजात एसीचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

Mumbai : कुत्र्यांना खाऊ घालण्यासंदर्भातील निर्णयाविरोधात मुंबईत प्राणीमित्र संघटनेचे आंदोलन

Mumbai-Pune Express Way Accident : मुंबई पुणे महामार्गावर भिषण अपघात! धावत्या ट्रकने घेतला पेट

MHT CET 2022 : महाराष्ट्र सीईटी राउंड 2 वेब पर्याय प्रवेश प्रक्रिया सुरू! असा करा अर्ज

गेटवे ऑफ इंडियापासून लवकरच सेवा सुरु होणार
नयनतारा शिपिंग कंपनीचे संचालक रोहित सिन्हा यांनी दिलेल्या माहितीनुसार, लवकरच गेटवे ऑफ इंडिया येथून देखील वॉटर टॅक्सी सेवा उपलब्ध होणार आहे. सध्या त्याला मांडवा दरम्यानच्या क्रुझ टर्मिनलवरून सुरु करण्याची परवानगी देण्यात आली होती. येत्या 10 ते 15 दिवसांत गेट वे ऑफ इंडिया येथून वॉटर टॅक्सी सेवा सुरु करण्यासाठी प्रशासनाकडून परवानगी मिळणार आहे. त्यानंतर बेलापूर ते एलिफंटा दरम्यान गेटवे ऑफ इंडिया येथून सुद्धा ही सेवा सुरु करण्यात येईल.

29 तारखेपासून करता येईल बुकिंग
1 नोव्हेंबर पासून सुरु होणाऱ्या या वॉटर टॅक्सीचे बुकिंग 29 ऑक्टोबरपासून सुरु होईल. रोहित सिन्हा यांनी दिलेल्या माहितीनुसार, या वॉटर टॅक्सी सेवेचा लाभ घेण्यासाठी प्रवासी 29 ऑक्टोबरपासून ऑनलाइन तिकीट काढू शकतात. सुरुवातीच्या दिवसांत मुंबई क्रूझ टर्मिनलवरून सकाळी 10.30 वाजल्यापासून टॅक्सी सेवा उपलब्ध असेल. प्रवाशांच्या प्रतिसादानुसार वेळेत बदल करण्यात येणार आहेत. तर गेटवे ऑफ इंडियाया ठिकाणाहून सेवा सुरु झाल्यावर सकाळी 8.30 ते संध्याकाळी 6.30 या वेळेत टॅक्सी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याचे देखील सांगण्यात आले आहे.

पूनम खडताळे

Recent Posts

अपघातानंतर चालक रुग्णालयात; चोरट्याने लांबविली दुचाकी

जेल रोड परिसरात एका अजबगजब घटना घडली. कोठारी कन्या शाळेच्या मागे नियंत्रण सुटल्याने दुचाकी घसरून…

6 hours ago

दुप्पट रकमेचे आमिष दाखवणाऱ्या संशयिताला डांगसौंदाण्यातून अटक

तेजस ऊर्फ बंटी सुरेश वाघ (२५, रा. समर्थ हार्डवेअरसमोर, डांगसौंदाणे, ता. बागलाण) सात लाख रुपयांचे…

6 hours ago

प्रचारात कांदा प्रश्नावर भूमिका मांडा; छगन भुजबळ यांची डॉ. भारती पवार यांना सूचना

डॉ. भारती पवार (Dr.Bharati Pawar) यांनी मंगळवारी भुजबळ फार्म येथे भुजबळ यांची भेट घेतली. या…

6 hours ago

उन्हाळ्यात खसखस ​​खाण्याचे अनेक फायदे

उन्हाळ्यात (summer) खसखस(poppy seeds) ​​खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. खसखस (poppy seeds) हे औषधी गुणधर्मांनी…

7 hours ago

नाशिक जिल्ह्यातील अनेक गावांवर पिण्याच्या पाण्याचे संकट

गेल्यावर्षी कमी झालेले पर्जन्यमान अन वाढत्या उष्णतेने पाण्याचे होणारे बाष्पीभवन यामुळे जिल्ह्यातील धरणांमधील पाण्याच्या पातळीत…

8 hours ago

कर्जाच्या हप्त्याचा तगादा, एकाची आत्महत्या : बजाज फायनान्सचा कर्मचारी अटकेत

कर्जाचा हप्ता भरण्यासाठी बजाज फायनान्सच्या कर्मचाऱ्याकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून कर्जदाराने आत्महत्या केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात…

9 hours ago