मतदारांचा कौल कोणाला काँग्रेसच्या वर्षा गायकवाड की भाजपचे अॅड. उज्ज्वल निकम

अॅड. उज्ज्वल निकम म्हणजे बऱ्याचदा कुठल्या ना कुठल्या केसच्या निमित्ताने नेहमीच बातमीपत्रात दिसणारा चेहरा. त्यांनी गेली ३ दशके विविध महत्वाच्या खटल्यांमध्ये विशेष सरकारी अधिकारी म्हणून काम पाहिले आहे (Varsha Gaikwad of Congress vs Ujjwal Nikam of BJP)आणि या खटल्यांमुळेच त्यांची विशेष सरकारी वकील अशी ओळखही निर्माण झाली आहे. जळगाव येथील एका उच्चशिक्षित कुटुंबातून आलेल्या निकम यांनी अंबरनाथ येथील १९९१ सालच्या बॉम्बस्फोट खटल्यात सरकारी वकील म्हणून काम पाहिले होते. तो त्यांच्या कारकिर्दीतील पहिला महत्वाचा खटला होता. त्यानंतर मुंबईतील १९९३ साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोटशी संबंधित खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून त्यांची नियुक्ती केली गेली. आणि त्यांच्या कारकिर्दीला कलाटनी मिळाली. त्यानंतर, अनेक महत्वाच्या खटल्यात त्यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली गेली. गुलशन कुमार हत्या प्रकरण, खैरलांजी हत्याकांड, अंजनाबाई गावित बाल हत्याकांड, पोलीस कर्मचारी सुनील मोरे बलात्कार प्रकरण, प्रमोद महाजन हत्या प्रकरण, २००८ सालचा मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याशी संंबंधित खटला.त्याचबरोबर शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरण, कोपर्डी बलात्कार आणि हत्या या प्रकरणांचा देखील समावेश आहे. निकम यांना २०१६ साली पदमश्री पुरस्काराने गौरविण्यात देखील आले आहे.
भाजपच्या उमेदवारीमुळे अॅड. उज्ज्वल निकम हे आता पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरलेले आहेत. काँग्रेसच्या वर्षा गायकवाड विरुद्ध भाजपचे अॅड. उज्ज्वल निकम या लढतीत मतदार कोणाच्या बाजूने कौल देणार हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.

टीम लय भारी

Recent Posts

भारताच्या अर्थव्यवस्थेची उत्तुंग झेप तिसऱ्या क्रमांकावर पोहोचणार; ना. भागवत कराड

भारताच्या अर्थव्यवस्थेने (India's economy ) उत्तुंग झेप घेतली असून दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आणि आता…

1 hour ago

घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण; भावेश भिंडेला 26 मे पर्यंत पोलीस कोठडी

मुंबईतील घाटकोपर परिसरात होर्डिंग (Ghatkopar hoarding accident) कोसळून झालेल्या दुर्घटनेत निष्पाप नागरिकांना आपले प्राण गमवावे…

2 hours ago

अपघातानंतर नाशिक महापालिकेला जाग; शहरातील 856 होर्डिंग्जचे होणार स्ट्रक्चरल ऑडिट

मुंबई शहरात दोन दिवसांपूर्वी जाहिरात होर्डिंग (hoardings) कोसळून झालेल्या अपघातात १४ लोकांचा मृत्यू झाल्यामुळे जाग…

2 hours ago

उज्वल निकम विरूद्ध वर्षा गायकवाड; गायकवाड यांचा जाहीरनामा, निकम यांच्या नैतिकवर प्रश्नचिन्ह !

उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसतर्फे वर्षा गायकवाड, तर भाजपकडून उज्वल निकम हे निवडणुकीच्या रिंगणात…

2 hours ago

महाराष्ट्रात वादळी पावसाचा इशारा; हवामान विभागाचा अंदाज

राज्याच्या अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे. राज्यभरात वळवाचा पाऊस (Rain) हजेरी  लावत आहे. राज्यात…

2 hours ago

मुंबईतील शिवतीर्थ पार्कवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे यांची जाहीर सभा एकाच मंचावर;राजू पाटील

अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यावेळी होणाऱ्या सभांची आठवण करून देणारे आहे.…

3 hours ago