28 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रनाशिक मनपाची सिटिंलिंक तोट्यात : आता इलेक्ट्रिक बसचा आर्थिक बोजा...

नाशिक मनपाची सिटिंलिंक तोट्यात : आता इलेक्ट्रिक बसचा आर्थिक बोजा वाढणार

महापालिकेच्या सिटीलिंक < citinlink > बससेवेत सध्या २०० सीएनजी आणि ५० डिझेल बसेस आहेत. गेल्या दोन वर्षांपासून ही बससेवा तोट्यात सुरू आहे. असे असताना आता केंद्र शासनाच्या पीएम ई-बस सेवा योजनेच्या माध्यमातून नाशिक महापालिकेला ५० इलेक्ट्रिक बसेस मिळणार आहेत. मात्र, या बससेवेसाठी संबंधित ठेकेदाराला प्रतिकिमी ७० रुपये मोजावे लागणार असल्याने या बससेवेचा भारही महापालिकेच्या माथ्यावर पडणार आहे. परिणामी तोट्यात भरच पडणार असल्याने मनपाच्या तिजोरीवर ताण निर्माण होणार आहे.
(Nashik Municipal Corporation’s citinlink at a loss: Now the financial burden of electric buses will increase)

महापालिकेने केंद्र शासनाच्या एन कॅपअंतर्गत मिळालेल्या निधीमधून प्रतिबस ५५ लाख रुपये याप्रमाणे अनुदानातून इलेक्ट्रिक बस संचलनाचा निर्णय घेतला होता. मात्र, केंद्र शासनाने पीएम ई-बस सेवा ही नवीन योजना आणल्याने नाशिक महापालिकेला मिळालेले अनुदान आता पीएम ई-बसकडे वर्ग करण्यात येणार आहे. मात्रल केंद्र शासन स्तरावर नाशिक महापालिकेसाठी निश्चित झालेल्या ठेकेदाराने ७० रुपये प्रतिकिमी या दराने बस चालविण्याचा आपला दर निश्चित केला आहे.

पीएम ई-बससेवा ही वातानुकूलित सेवा असल्यामुळे संभाव्य तोटा कमी करण्याच्या दृष्टीने भाडेही अधिक ठेवावे लागणार आहे. त्यामुळे महापालिका व प्रवासी या दोघांच्या खिशाला भुर्दंड बसणार आहे. सीएनजी व डिझेलच्या तुलनेत इलेक्ट्रिक बस स्वस्त असेल, असा दावा करण्यात आला होता. मात्र, डिझेल बसपेक्षा पीएम ई-बसेसकरिता पाच रुपये प्रति किमी जादा देण्याची वेळ मनपावर येणार आहे. महापालिकेने केंद्र शासनाच्या एन कॅपअंतर्गत मिळालेल्या निधीमधून प्रतिबस ५५ लाख रुपये याप्रमाणे अनुदानातून इलेक्ट्रिक बस संचलनाचा निर्णय घेतला होता. मात्र, केंद्र शासनाने पीएम ई-बस सेवा ही नवीन योजना आणल्याने नाशिक महापालिकेला मिळालेले अनुदान आता पीएम ई-बसकडे वर्ग करण्यात येणार आहे. मात्रल केंद्र शासन स्तरावर नाशिक महापालिकेसाठी निश्चित झालेल्या ठेकेदाराने ७० रुपये प्रतिकिमी या दराने बस चालविण्याचा आपला दर निश्चित केला आहे. त्यामुळे या दराने मनपाला बससेवा पदरात पाडून घ्यावी लागणार आहे. खरे तर मनपाला केंद्र शासनाकडून २४ रुपये प्रतिकिमी अनुदान मिळणार असले तरी ही बससेवा केंद्र्र शासन व महापालिकेला महागडीच ठरणार आहे.

पीएम ई-बससेवेअंतर्गत देशातील ३९, तर महाराष्ट्रातील १४ शहरांमध्ये इलेक्ट्रिक बसेस धावणार आहेत. नाशिकबरोबरच नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कल्याण- डोंबिवली, ठाणे, वसई विरार, अमरावती, भिवंडी, कोल्हापूर, मीरा-भाईंदर, सोलापूर, उल्हासनगर,अहमदनगर, लातूर या शहरांचा यात समावेश आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी