उत्तर महाराष्ट्र

‘मदत फाऊंडेशन’चा कौतुकास्पद उपक्रम, पक्ष्यांकरिता शेकडो पाणवठ्यांची व्यवस्था

‘मदत फाऊंडेशन’ (Help Foundation) च्यावतीने अभिनव उपक्रम राबविण्यात आला आहे. पाण्याअभावी पक्ष्यांचा मृत्यू होऊ नये, या उद्देशाने ‘मदत फाऊंडेशन’ चे संस्थापक अध्यक्ष अंबादास खैरे यांनी परिसरातील जेष्ठ नागरिक व शालेय मुलांना पक्ष्यांकरिता शेकडो पाणवठ्यांचे (water bodies for birds) वाटप केले. या पाणवठ्यांमुळे विविध ठिकाणच्या पक्षांना आधार मिळणार आहे. या उपक्रमाचं सध्या सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. नाशिकच्या तापनाचा पारा ४० अंशावर गेल्यानंतर सर्वाधिक त्रास प्राणी-पक्ष्यांना बसत आहे. बऱ्याचशा प्राण्यांना मानवाप्रमाणे ‘डी हायड्रेशन’चा त्रास सहन करावा लागत आहे.(‘Help Foundation’s commendable initiative, provision of hundreds of water bodies for birds)

उन्हाच्या तडाख्याने ठिकठिकाणी पक्षीही मुर्छीत होऊन पडत आहेत. उन्हाच्या तडाख्याने नाशिककर हवालदिल झाले आहे. म्हणूनच दुपारच्या वेळी बाहेर पडणे जाणीवपुर्वक टाळले जात आहे. जलाशयातील नैसर्गिक जलसाठा भर उन्हाळ्यात कमी झाला आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी पक्ष्यांना भटकंती करावी लागत आहे. उन्हाळ्यात पक्षी झाडवरून किंवा सावलीच्या ठिकाणावरून दूरवर जात नाही. त्यामुळे त्यांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असते. प्राण्याना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी याकरिता मदत फाऊंडेशनच्या (Help Foundation) वतीने पाणवठे तयार करण्यात आले होते. त्याचबरोबर आता पक्ष्यांना विविध ठिकाणी पाणी उपलब्ध व्हावं व पाण्याअभावी पक्ष्याचे मृत्यू होऊ नये या हेतूने ‘मदत फाऊंडेशन’ (Help Foundation) चे संस्थापक अध्यक्ष अंबादास खैरे यांनी पक्ष्यांकरिता शेकडो पाणवठ्यांचे (water bodies for birds) जेष्ठ नागरिक व शालेय मुलांमध्ये वाटप केले. या पाणवठ्यामुळे (water bodies for birds) पक्ष्यांना मोठा आधार मिळत आहे. शिवाय या उपक्रमाची सध्या सर्वत्र कौतुक केला जात आहे.

टीम लय भारी

Recent Posts

पपई खाण्याचे आरोग्यदायी फायदे

पपई (papaya) ही आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. यामध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-बी, व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन-ई, कॅल्शियम,फायबर, मॅग्नेशियम,…

26 mins ago

हा आत्मा नरेंद्र मोदींना सत्तेतून घालवल्याशिवाय शांत बसणार नाही: शरद पवार

मुंबईत 20 मे रोजी मतदान होणार आहे. यानिमित्त बीकेसी मैदानावर इंडिया आघाडीची सभा आयोजित करण्यात…

2 hours ago

आरटीई प्रवेशाला पालकांचा उत्स्पूर्त प्रतिसाद

शिक्षण हक्क कायद्यातंर्गत (आरटीई) ( RTE admissions) मुलांना चांगल्या शाळेत प्रवेश मिळवून देण्याचा प्रयत्न करणाऱ्या…

3 hours ago

‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ बाळूमामांच्या आठवणीतील न पाहिलेली कथा उलगडणार

पाहा, ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ (Balimamachya navan changbhal) गेल्या पाच वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांचे मनोरंजन करत…

4 hours ago

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले यांना प्रभारी रमेश चेन्नीथला यांची भावपूर्ण श्रद्धांजली

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष, माजी मंत्री प्रतापराव भोसले यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाने एक…

5 hours ago

भाजप मुंबईत अडचणीत, ज्येष्ठ संपादिका राही भिडे यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा टप्पा सोमवारी आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा हा अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात…

19 hours ago