व्हिडीओ

आदित्य ठाकरेंचे काम,श्रेय लाटताहेत राहुल शेवाळे !

लोकसभा निवडणुकीचे तीन टप्पे पार पडले. चौथ्या आणि पाचव्या टप्प्याच्या निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. ( south mumbai, loksabha Election … Here is the opinion of thackery group)  पाचव्या टप्प्यात मुंबईतील सर्व मतदारसंघातील निवडणुका होत आहेत. मुंबईतील मध्यवर्ती मतदारसंघ असलेल्या दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघात राहूल शेवाळे व अनिल देसाई यांच्यात लढत होत आहे. राहूल शेवाळे हे विद्यमान खासदार आहेत. परंतु उद्धव ठाकरे यांच्या विरोधात त्यांनी बंड केले. सध्या ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून अनिल देसाई शेवाळे यांच्यासमोर ठाकले आहेत. या पार्श्वभूमीवर ‘लय भारी’चे संपादक तुषार खरात यांनी माजी महापौर व माजी आमदार विशाखा राऊत यांची धावती मुलाखत घेतली. यावेळी विशाखा राऊत यांनी राहूल शेवाळे यांचा समाचार घेतला. दादर माहिम परिसरात आदित्य ठाकरे यांनी अनेक कामे केली आहेत. पण ही कामे आपणच केल्याचे राहूल शेवाळे यांनी त्यांच्या कार्यअहवालात नमूद केले आहे. राहूल शेवाळेंना पैसा खाण्याची चटक लागलेली आहे. त्यामुळेच ते एकनाथ शिंदे गटात गेले असल्याचाही आरोप विशाखा राऊत यांनी केला.

तुषार खरात

Recent Posts

पपई खाण्याचे आरोग्यदायी फायदे

पपई (papaya) ही आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. यामध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-बी, व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन-ई, कॅल्शियम,फायबर, मॅग्नेशियम,…

28 mins ago

हा आत्मा नरेंद्र मोदींना सत्तेतून घालवल्याशिवाय शांत बसणार नाही: शरद पवार

मुंबईत 20 मे रोजी मतदान होणार आहे. यानिमित्त बीकेसी मैदानावर इंडिया आघाडीची सभा आयोजित करण्यात…

2 hours ago

आरटीई प्रवेशाला पालकांचा उत्स्पूर्त प्रतिसाद

शिक्षण हक्क कायद्यातंर्गत (आरटीई) ( RTE admissions) मुलांना चांगल्या शाळेत प्रवेश मिळवून देण्याचा प्रयत्न करणाऱ्या…

3 hours ago

‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ बाळूमामांच्या आठवणीतील न पाहिलेली कथा उलगडणार

पाहा, ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ (Balimamachya navan changbhal) गेल्या पाच वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांचे मनोरंजन करत…

4 hours ago

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले यांना प्रभारी रमेश चेन्नीथला यांची भावपूर्ण श्रद्धांजली

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष, माजी मंत्री प्रतापराव भोसले यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाने एक…

5 hours ago

भाजप मुंबईत अडचणीत, ज्येष्ठ संपादिका राही भिडे यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पाचवा टप्पा सोमवारी आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा हा अंतिम टप्पा आहे. या टप्प्यात…

19 hours ago