उत्तर महाराष्ट्र

नाशिक मनपा आयुक्त जाहिरात ठेका करणार

मनपा जागेतील होर्डिंग निविदेत कोट्यावधींचा घोटाळ्याची गंभीर दखल आयुक्तांनी घेतली असून येत्या २८ मार्चला हा ठेका रद्द केला जाणार आहे. पुण्याच्या मार्क्विस ॲडव्हर्टायझिंग अँड मार्केटिंग या जाहिरात कंपनीला ३० सप्टेंबर २०३२ पर्यंत हा ठेका देण्यात आला होता. ठेका रद्द केल्यानंतर नव्याने जाहिरात फलकांसाठी नव्याने निविदा प्रक्रिया राबवली जाणार आहे. महानगरपालिकेच्या जाहिरात व परवाने विभागातून मनपा हद्दीतील जागांसाठी जानेवारी २०२२ ला निविदा काढण्यात आली. पुण्याच्या मार्क्विस ॲडव्हर्टायझिंग अँड मार्केटिंग या जाहिरात कंपनीला हे टेंडर मिळाले. मात्र यातील निविदा, कार्यादेश व करारनामा यात मोठ्या प्रमाणात तफावत करण्यात आली.

यातून कोट्यवधीचा घोटाळा झाल्याचा आरोप खासगी जागेतील जाहिरात फलक धारकांची संघटना असलेल्या नाशिक आउटडोअर ॲडव्हर्टायझिंग वेल्फेअर असोसिएशनचे पत्रकार परिषदेत केला होता. मक्तेदाराला मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा व्हावा या दृष्टीने हव्या तशा अटी, शर्ती घुसविण्यात आल्या. तर नको असलेल्या अटी, शर्ती काढून टाकण्यात आल्या. तर काहींमध्ये सोयीस्कररित्या बदल करण्यात आला. नाशिक शहरात कुठेही, कसेही, कोणत्याही ठिकाणी जाहिरात फलक लावण्याचे अधिकारी मक्तेदारास देण्यात आले. यात मनपा मालकीच्या वापरात असलेल्या, वापरात नसलेल्या खुल्या जागा, पदपथ, इमारती, उद्याने, वाहतूक बेटे, रस्त्यामधील दुभाजक यात मोठ मोठ्या होर्डिंग उभे करण्याची मुभा देण्यात आली. सदरची निविदा ही फक्त २८ होर्डिंगसाठी देण्यात आली होती. तसेच आदेश देखील २८ होर्डिंगचाच देण्यात आला. मात्र आज सुमारे ६३ हून अधिक होर्डिंग उभे आहेत. यापैकी फक्त २८ होर्डिंगचेच भाडे महानगरपालिकेस मिळत आहे आणि बाकीच्या होर्डिंगची कुठलीही आर्थिक नोंद अथवा भाडे महापालिकेमध्ये भरत नसल्याचे आढळून येत नसल्याचा गंभीर आरोप संघटनेने केला होता. त्यानंतर आयुक्तांनी या घोटाळ्याप्रकरणी अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित केली. या समितीने आयुक्त‍ांना अहवाल सादर केला आहे. हा अहवालाचा निष्कर्ष समोर येयचा असला तरी त्या पुर्वीच आयुक्त अॅक्शन मोडमध्ये आहेत. येत्या २८ मार्चला पुण्याच्या मार्क्विस ॲडव्हर्टायझिंग अँड मार्केटिंग या जाहिरात कंपनीला दहा वर्षासाठी दिलेला ठेका रद्द केला जाणार असून नव्याने निविदा प्रक्रिया राबवली जाईल.

जाहिरात स्पाॅटसाठी जागा शोधणार
मुंबई, ठाणे या महापालिकांना जाहिरात फलकातून कोट्यवधीचा महसूल मिळतो. नाशिक शहरही वेगाने विस्तारत असून नवीन निविदेत अशा जाहिरात स्पाॅटसाठी नवनव्या जागांचा शोध घेतला जाणार आहे. त्यामुळे मनपाच्या उत्पन्नात जाहिरात फलकातून भरघोस वाढ होईल.

मनपा प्रशासन येत्या२८ मार्चला जाहिरातीचा दिलेला ठेका रद्द करणार आहे. त्यासाठी नव्याने निविदा प्रक्रिया राबवली जाईल.
– डाॅ.अशोक करंजकर, आयुक्त मनपा

टीम लय भारी

Recent Posts

छगन भुजबळ काँग्रेसमध्ये असते तर खरंच मुख्यमंत्री झाले असते?; नाना पटोले

मंत्री छगन भुजबळ यांनी केलेल्या गौप्यस्फोटावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana Patole )…

5 mins ago

शांतीगिरी महाराज EVM मशीनला हार घातला, शांतीगिरी महाराजांवर दाखल होऊ शकतो गुन्हा

शांतिगिरी महाराजांनी (Shantigiri Maharaj) आज मतदानाच्या दिवशी मतदान करताना ईव्हीएम कक्षालाच हार घातल्याने खळबळ उडाली…

23 mins ago

12वीचा निकालाची तारीख ठरली, मंगळवारी 21 मे रोजी निकाल होणार जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक…

3 hours ago

व्ही मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘मल्हार’ येतोय ३१ मे रोजी भेटीला

व्ही मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘मल्हार’ (Malhar) या नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून या चित्रपटाचे…

3 hours ago

त्र्यंबकेश्वराचे दर्शन सुलभ करण्यासाठी उभारणार 8 कोटींचा स्कायवॉक

त्र्यंबकेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे.यामुळे देशभरातून रोज हजारो भाविक त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी येत असतात. भाविकांची…

3 hours ago

मुंबई भांडूपमध्ये ठाकरे गटाचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात, संजय राऊत भडकले

लोकसभा निवडणुकीसाठी पाचव्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. देशभरात 49 जागांवर मतदान होणार आहे.…

4 hours ago