क्राईम

नाशकात भररस्त्यात एमडी ड्रग विक्री एकास अटक

शहर गुन्हेशाखेच्या युनिट दोनच्या पथकाने सामनगाव रोडवर वजनकाटा घेऊन एमडी ड्रग्ज विक्री करणार्या संशयिताला अटक केली असून, त्याच्याकडून सुमारे ५८ हजारांची १९.३९ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त केली आहे. अशारितीने शहरात आणखी कुठे-कुठे एमडीची विक्री होते आहे, असा प्रश्न नाशिककरांना पडला आहे. (Nashik Drugs crime Sale of MD on street ) किरण चंदू चव्हाण (२३, रा. अश्विनी कॉलनी, सामनगाव रोड, नाशिकरोड) असे एमडी ड्रग्ज विक्री करीत असताना अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. संशयित चव्हाण हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरोधात मारहाणीचे गुन्हे दाखल आहेत.

नाशिकरोड येथील सामनगाव रोडवर भरदिवसा रस्त्यालगत वजनकाटा घेऊन भाजीपाला-फळं विक्री होत असते, अगदी त्याप्रमाणेच एमडी (मॅफेड्रॉन) या अंमली पदार्थाचीही विक्री होत असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.यामुळे पोलिसांनी यापूर्वी एमडी ड्रग्जचे अड्डे उदध्वस्त करूनही शहरात या अंमली पदार्थांची पोलिसांच्या नाकावर टिच्चून विक्री सुरू असण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. (Nashik MD Drugs)

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी अंमली पदार्थांची विक्री, साठा व वापर करणाऱ्यांविरुद्ध कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार शहर गुन्हे शाखेची पथकांमार्फत शहरात गस्त वाढविण्यात आली आहे. शहर गुन्हेशाखेच्या युनिट दोनचे पोलीस अंमलदार विशाल कुंवर, समाधान वाजे यांना सामनगाव रोड परिसरात एकजण एमडी विक्री करण्यासाठी ग्राहक शोधत असल्याची खबर सोमवारी (ता. १८) मिळाली होती.

त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांनी सापळा रचण्यास सांगितले असता, सहायक निरीक्षक सचिन जाधव, सहायक उपनिरीक्षक विवेक पाठक, अंमलदार मनोहर शिंदे, स्वप्नील जुंद्रे, महेश खांडबहाले, तेजस मते, संजय सानप, प्रकाश महाजन, चंद्रकांत गवळी यांच्या पथकाने सामनगाव रोडवरील सामनगाव पॉलिटेक्निक कॉलेजजवळ असलेल्या शिवशक्ती टायर वर्कससमोर सापळा रचला होता.दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास संशयित किरण चव्हाण हा सामनगाव रोडवर आला असता, दबा धरून असलेल्या पथकाने त्यास हेरले आणि ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून ५८ हजार १७० रुपयांची १९.३९ ग्रॅम एमडी ड्रग्ज्‌ जप्त करण्यात आली.त्याच्याकडून डीजीटल वजनकाटा, दोन मोबाईल, रिकामे प्लॅस्टिकचे पाऊच असा ६८ हजार १७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक पोलीस निरीक्षक काळे हे तपास करीत आहेत.

टीम लय भारी

Recent Posts

अदानी-अंबानीने काँग्रेसला पैसे दिल्याचे मोदींचे विधान बेजबाबदारपणाचे; अदानी अंबानीची चौकशी करा सत्य बाहेर येईल: डॉ. भालचंद्र मुणगेकर

अदानी-अंबानी कडून काँग्रेस पक्षाला टेम्पो भरून पैसे मिळाल्यानेच राहुल गांधी आता त्यांना शिव्या देत नाहीत…

3 hours ago

बडगुजर यांच्यावरील कारवाईविरोधात महाविकास आघाडीचे नेते आक्रमक

लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सुरू असताना शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर (Badgujar )यांना बजाविण्यात आलेली…

4 hours ago

श्रीरामाचं मदीर, ३७० हे ठीक, पण शेतकरी मातीत जातोय त्याचं काय ?

लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा लवकरच होवू घातला ( Elections 2024:In Ahmednagar, Farmers Unhappy With BJP…

5 hours ago

अक्षय तृतीयेनिमित्त बाजारात होणार कोट्यवधीची उलाढाल

साडेतीन मुहूर्तपैकी एक असणाऱ्या अक्षयतृतीयेनिमित्त (Akshaya Tritiya) नाशिक शहर आणि जिल्हयात कोट्यवधींची आर्थिक उलाढाल (Crores…

7 hours ago

सीताफळ खा स्वस्थ रहा! सीताफळ खाण्याचे फायदे

अँटी-ऑक्सिडेंट गुणधर्मांनी समृद्ध असणाऱ्या सीताफळाची (custard apple) चव फार कमी लोकांना आवडते, पण या फळात…

7 hours ago

सेवा निवृत्त पोलिस अधिकाऱ्याला सुने कडुन दहा कोटी रुपयांची खंडणी मागणी

नातू सम्राटला भेटायचे असेल किंवा सम्राटला ताब्यात ठेवायचे असेल तर नवी मुंबई मध्ये जॅग्वार गाडी,…

8 hours ago