33 C
Mumbai
Monday, April 22, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिक मनपा आयुक्त जाहिरात ठेका करणार

नाशिक मनपा आयुक्त जाहिरात ठेका करणार

मनपा जागेतील होर्डिंग निविदेत कोट्यावधींचा घोटाळ्याची गंभीर दखल आयुक्तांनी घेतली असून येत्या २८ मार्चला हा ठेका रद्द केला जाणार आहे. पुण्याच्या मार्क्विस ॲडव्हर्टायझिंग अँड मार्केटिंग या जाहिरात कंपनीला ३० सप्टेंबर २०३२ पर्यंत हा ठेका देण्यात आला होता. ठेका रद्द केल्यानंतर नव्याने जाहिरात फलकांसाठी नव्याने निविदा प्रक्रिया राबवली जाणार आहे. महानगरपालिकेच्या जाहिरात व परवाने विभागातून मनपा हद्दीतील जागांसाठी जानेवारी २०२२ ला निविदा काढण्यात आली. पुण्याच्या मार्क्विस ॲडव्हर्टायझिंग अँड मार्केटिंग या जाहिरात कंपनीला हे टेंडर मिळाले. मात्र यातील निविदा, कार्यादेश व करारनामा यात मोठ्या प्रमाणात तफावत करण्यात आली

मनपा जागेतील होर्डिंग निविदेत कोट्यावधींचा घोटाळ्याची गंभीर दखल आयुक्तांनी घेतली असून येत्या २८ मार्चला हा ठेका रद्द केला जाणार आहे. पुण्याच्या मार्क्विस ॲडव्हर्टायझिंग अँड मार्केटिंग या जाहिरात < advertisement contract >कंपनीला ३० सप्टेंबर २०३२ पर्यंत हा ठेका देण्यात आला होता. ठेका रद्द केल्यानंतर नव्याने जाहिरात फलकांसाठी नव्याने निविदा प्रक्रिया राबवली जाणार आहे. महानगरपालिकेच्या जाहिरात व परवाने विभागातून मनपा हद्दीतील जागांसाठी जानेवारी २०२२ ला निविदा काढण्यात आली. पुण्याच्या मार्क्विस ॲडव्हर्टायझिंग अँड मार्केटिंग या जाहिरात कंपनीला हे टेंडर मिळाले. मात्र यातील निविदा, कार्यादेश व करारनामा यात मोठ्या प्रमाणात तफावत करण्यात आली. < Commissioner to advertisement contract>

यातून कोट्यवधीचा घोटाळा झाल्याचा आरोप खासगी जागेतील जाहिरात फलक धारकांची संघटना असलेल्या नाशिक आउटडोअर ॲडव्हर्टायझिंग वेल्फेअर असोसिएशनचे पत्रकार परिषदेत केला होता. मक्तेदाराला मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा व्हावा या दृष्टीने हव्या तशा अटी, शर्ती घुसविण्यात आल्या. तर नको असलेल्या अटी, शर्ती काढून टाकण्यात आल्या. तर काहींमध्ये सोयीस्कररित्या बदल करण्यात आला. नाशिक शहरात कुठेही, कसेही, कोणत्याही ठिकाणी जाहिरात फलक लावण्याचे अधिकारी मक्तेदारास देण्यात आले. यात मनपा मालकीच्या वापरात असलेल्या, वापरात नसलेल्या खुल्या जागा, पदपथ, इमारती, उद्याने, वाहतूक बेटे, रस्त्यामधील दुभाजक यात मोठ मोठ्या होर्डिंग उभे करण्याची मुभा देण्यात आली. सदरची निविदा ही फक्त २८ होर्डिंगसाठी देण्यात आली होती. तसेच आदेश देखील २८ होर्डिंगचाच देण्यात आला. मात्र आज सुमारे ६३ हून अधिक होर्डिंग उभे आहेत. यापैकी फक्त २८ होर्डिंगचेच भाडे महानगरपालिकेस मिळत आहे आणि बाकीच्या होर्डिंगची कुठलीही आर्थिक नोंद अथवा भाडे महापालिकेमध्ये भरत नसल्याचे आढळून येत नसल्याचा गंभीर आरोप संघटनेने केला होता. त्यानंतर आयुक्तांनी या घोटाळ्याप्रकरणी अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित केली. या समितीने आयुक्त‍ांना अहवाल सादर केला आहे. हा अहवालाचा निष्कर्ष समोर येयचा असला तरी त्या पुर्वीच आयुक्त अॅक्शन मोडमध्ये आहेत. येत्या २८ मार्चला पुण्याच्या मार्क्विस ॲडव्हर्टायझिंग अँड मार्केटिंग या जाहिरात कंपनीला दहा वर्षासाठी दिलेला ठेका रद्द केला जाणार असून नव्याने निविदा प्रक्रिया राबवली जाईल.

जाहिरात स्पाॅटसाठी जागा शोधणार
मुंबई, ठाणे या महापालिकांना जाहिरात फलकातून कोट्यवधीचा महसूल मिळतो. नाशिक शहरही वेगाने विस्तारत असून नवीन निविदेत अशा जाहिरात स्पाॅटसाठी नवनव्या जागांचा शोध घेतला जाणार आहे. त्यामुळे मनपाच्या उत्पन्नात जाहिरात फलकातून भरघोस वाढ होईल.

मनपा प्रशासन येत्या२८ मार्चला जाहिरातीचा दिलेला ठेका रद्द करणार आहे. त्यासाठी नव्याने निविदा प्रक्रिया राबवली जाईल.
– डाॅ.अशोक करंजकर, आयुक्त मनपा

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी