उत्तर महाराष्ट्र

नाशिक पाण्याच्या टाकीत गुदमरून एकाचा मृत्यू

पाण्याची टाकी स्वच्छ करण्यासाठी आत उतरलेल्या खाजगी कामगाराचा पाण्याच्या टाकीत गुदमरून मृत्यू झाल्याची घटना सातपूर औद्योगिक वसाहतीत घडली आहे. सुरेश बाबुराव साबळे (वय ४६, राहणारे सातपूर) असे मयत कामगाराचे नाव आहे. याबाबत सातपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सातपूर औद्योगिक वसाहतीत मधुर स्वीट दुकान आहे. दुकानाचे गोडाऊनमध्ये असलेली पाण्याची टाकी स्वच्छ करण्यासाठी शुक्रवारी (दि.१) सुरेश बाबुराव साबळे यांना कंत्राटवर काम दिले होते. टाकी स्वच्छ करण्यासाठी साबळे हे टाकीत उतरले होते. पाण्याच्या टाकीचे झाकण उघडे करून ते पाण्याची टाकी साफ करत असतांना त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला.सोबतच्या कामगारांनी त्यांना त्वरित बाहेर काढून खाजगी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याआधीही सातपूर औद्योगिक वसाहतीमध्ये ड्रेनेज पाईपलाईन दुरुस्त करताना मनपाच्या तीन कामगारांचा मृत्यू झाला होता. टाकी स्वच्छ करताना सुरक्षा साधनांचा योग्य वापर न केल्यामुळे कामगाराचा मृत्यू झाला असल्याची चर्चा परिसरात रंगली होती. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणी सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी अपघात ग्रस्त कामगार संघटनेचे अध्यक्ष कैलास मोरे यांनी केली आहे.

टीम लय भारी

Recent Posts

12वीचा निकालाची तारीख ठरली, मंगळवारी 21 मे रोजी निकाल होणार जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक…

2 hours ago

व्ही मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘मल्हार’ येतोय ३१ मे रोजी भेटीला

व्ही मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘मल्हार’ (Malhar) या नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून या चित्रपटाचे…

2 hours ago

त्र्यंबकेश्वराचे दर्शन सुलभ करण्यासाठी उभारणार 8 कोटींचा स्कायवॉक

त्र्यंबकेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे.यामुळे देशभरातून रोज हजारो भाविक त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी येत असतात. भाविकांची…

3 hours ago

मुंबई भांडूपमध्ये ठाकरे गटाचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात, संजय राऊत भडकले

लोकसभा निवडणुकीसाठी पाचव्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. देशभरात 49 जागांवर मतदान होणार आहे.…

3 hours ago

कुटुंबीयांसमवेत मंत्री छगन भुजबळ यांनी बजावला मतदानाचा हक्क

राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal) यांनी आज…

3 hours ago

महात्मा गांधी येथे आगीत दोन दुकाने जळून खाक

आज सायंकाळी सहाच्या वाजेच्या सुमारास टाऊन हॉल समोर असलेल्या खलील भाई बॅटरीवाला यांच्या दुकानाला आग…

16 hours ago