मुंबई

खासदार चंद्रकांत हंडोरे यांच्याकडून महापुरूषांना अभिवादन.

राज्यसभेची निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर काँग्रेसचे कार्याध्यक्ष माजी मंत्री खासदार चंद्रकांत हंडोरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह मुंबईत चैत्यभूमी, पांजरपोळ व चेंबूर येथे महापुरुषांना अभिवादन केले.विधानपरिषद निवडणुकीत अल्पशा मतांनी पराभव झालेले चंद्रकांत हंडोरे यांना काँग्रेस पक्षाने राज्यसभेची उमेदवारी दिली होती. राज्यसभेच्या सहा जागांसाठी सहाच उमेदवार निवडणूक रिंगणात उरल्याने ही निवडणूक बिनविरोध ठरली व हंडोरे यांच्यासह भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले.
खासदार चंद्रकांत हंडोरे यांनी कार्यकर्त्यांसह दादर चैत्यभूमी येथे जावून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकराना अभिवादन केले. पांजरापोळ येथील छत्रपती शिवाजी महाराज,चेंबूर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर तसेच प्रियदर्शनी येथील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. यावेळी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस राजन भोसले, जिल्हाध्यक्ष हुकूम राज मेहता,माजी नगरसेवक राजेंद्र माहुलकर, दिपक शिसोदे, देविदास बोरसे, किसन मिस्त्री, संगीता हांडोरे, भीम शक्ती संघटनेचे संपर्क प्रमुख एन. के. कांबळे, भीमशक्ती मुंबईचे अध्यक्ष शशिकांत बनसोडे, जिल्हाध्यक्ष विजय मोरे, शंकर ढोबळे, काँग्रेस पक्षाचे जाफर सय्यद, रऊफ शेख, आंबेडकरी चळवळीचे नेते रवी गरुड यांच्यासह काँग्रेस आणि भीम शक्ती संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हंडोरे यांचे हितचिंतक,मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सामाजिक न्यायमंत्री म्हणून २००४ ते २००९ या आपल्या पाच वर्षाच्या कार्यकाळात उल्लेखनीय कामगिरी केलेले हंडोरे यांना काँग्रेसने संधी दिल्यानंतर राज्यातील मागासवर्गीयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. राज्यात ठिकठिकाणी त्यांचे स्वागत आणि सत्कार होत असून हंडोरे हे राज्यासह देशभरातील मागासवर्गीयांच्या प्रश्नांवर त्यांचा बुलंद आवाज म्हणून संसदेत कामगिरी करतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

सोनिया गांधी जी, राहुल गांधी जी,काँगेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे जी यांनी आपल्यावर टाकलेला विश्वास सार्थ करण्याचा आपण प्रयत्न करू, देशात अल्पसंख्यांक, मागासवर्गीय समाज केंद्र सरकारच्या नितिकडून हैराण झालेले आहेत, त्यांच्यात भीतीचे वातावरण आहे, धर्माच्या नावावर देशात अराजकतेचे वातावरण तयार करण्यात आले असून संविधानातील सर्वधर्म समभाव या मूल्यांना मोदी सरकारकडून हरताळ फासण्यात येत असून केंद्राच्या या नितिविरोधात काँग्रेस पक्ष खंबीरपणे जनतेच्या सोबत उभा राहील असा विश्वास हंडोरे यांनी व्यक्त केला.

टीम लय भारी

Recent Posts

अक्षय तृतीयेनिमित्त बाजारात होणार कोट्यवधीची उलाढाल

साडेतीन मुहूर्तपैकी एक असणाऱ्या अक्षयतृतीयेनिमित्त (Akshaya Tritiya) नाशिक शहर आणि जिल्हयात कोट्यवधींची आर्थिक उलाढाल (Crores…

1 hour ago

सीताफळ खा स्वस्थ रहा! सीताफळ खाण्याचे फायदे

अँटी-ऑक्सिडेंट गुणधर्मांनी समृद्ध असणाऱ्या सीताफळाची (custard apple) चव फार कमी लोकांना आवडते, पण या फळात…

1 hour ago

सेवा निवृत्त पोलिस अधिकाऱ्याला सुने कडुन दहा कोटी रुपयांची खंडणी मागणी

नातू सम्राटला भेटायचे असेल किंवा सम्राटला ताब्यात ठेवायचे असेल तर नवी मुंबई मध्ये जॅग्वार गाडी,…

2 hours ago

सराईत गुन्हेगारांच्या 6 मित्रांची ‘तडीपारी’! पोलीस उपायुक्त चव्हाण

गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगारांवर पोलीस आयुक्तालयाकडून तडीपारीची (deported) कारवाई केली जाते. मात्र…

2 hours ago

नाशिक शरणपूर येथे ज्येष्ठ नागरिकाला धमकावत सायबर चोरट्यांनी उकळले सात लाख

मोबाइल क्रमांकावरुन सुरु झालेल्या बँक खात्यावर सहा कोटी रुपयांचा गैरव्यवहार  झाल्याचे धमकावून व्यावसायिकाला सायबर चोरट्यांनी…

4 hours ago

पंकजा मुंडेंची लढाई जातीयवादाच्या पेचात

बीडची निवडणुक ही राष्ट्रीय मुद्द्यांवर कमी आणि जातियतेला धरून अधिक अशीच आता होताना दिसतेय. आरक्षण…

5 hours ago