32 C
Mumbai
Thursday, May 9, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिक पाण्याच्या टाकीत गुदमरून एकाचा मृत्यू

नाशिक पाण्याच्या टाकीत गुदमरून एकाचा मृत्यू

पाण्याची टाकी स्वच्छ करण्यासाठी आत उतरलेल्या खाजगी कामगाराचा पाण्याच्या टाकीत गुदमरून मृत्यू झाल्याची घटना सातपूर औद्योगिक वसाहतीत घडली आहे. सुरेश बाबुराव साबळे (वय ४६, राहणारे सातपूर) असे मयत कामगाराचे नाव आहे. याबाबत सातपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सातपूर औद्योगिक वसाहतीत मधुर स्वीट दुकान आहे. दुकानाचे गोडाऊनमध्ये असलेली पाण्याची टाकी स्वच्छ करण्यासाठी शुक्रवारी (दि.१) सुरेश बाबुराव साबळे यांना कंत्राटवर काम दिले होते. टाकी स्वच्छ करण्यासाठी साबळे हे टाकीत उतरले होते. पाण्याच्या टाकीचे झाकण उघडे करून ते पाण्याची टाकी साफ करत असतांना त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला.

पाण्याची टाकी स्वच्छ करण्यासाठी आत उतरलेल्या खाजगी कामगाराचा पाण्याच्या टाकीत गुदमरून मृत्यू झाल्याची घटना सातपूर औद्योगिक वसाहतीत घडली आहे. सुरेश बाबुराव साबळे (वय ४६, राहणारे सातपूर) असे मयत कामगाराचे नाव आहे. याबाबत सातपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सातपूर औद्योगिक वसाहतीत मधुर स्वीट दुकान आहे. दुकानाचे गोडाऊनमध्ये असलेली पाण्याची टाकी स्वच्छ करण्यासाठी शुक्रवारी (दि.१) सुरेश बाबुराव साबळे यांना कंत्राटवर काम दिले होते. टाकी स्वच्छ करण्यासाठी साबळे हे टाकीत उतरले होते. पाण्याच्या टाकीचे झाकण उघडे करून ते पाण्याची टाकी साफ करत असतांना त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला.सोबतच्या कामगारांनी त्यांना त्वरित बाहेर काढून खाजगी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याआधीही सातपूर औद्योगिक वसाहतीमध्ये ड्रेनेज पाईपलाईन दुरुस्त करताना मनपाच्या तीन कामगारांचा मृत्यू झाला होता. टाकी स्वच्छ करताना सुरक्षा साधनांचा योग्य वापर न केल्यामुळे कामगाराचा मृत्यू झाला असल्याची चर्चा परिसरात रंगली होती. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणी सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी अपघात ग्रस्त कामगार संघटनेचे अध्यक्ष कैलास मोरे यांनी केली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी