उत्तर महाराष्ट्र

राजाभाऊ वाजे यांचे शिवसैनिकांतर्फे जल्लोषात स्वागत ढोल ताशांचा गजर,फटाक्यांच्या आतषबाजीने नाशिक दणाणले

नाशिक लोकसभा मतदारसंघातून सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे उमेदवारी जाहीर झाल्याचे वृत्त कळल्यानंतर शिवसैनिकांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे.शालिमार येथील मध्यवर्ती कार्यालयात आगमन झाल्यानंतर वाजे यांचे ढोल ताशांच्या गजरात तसेच फटाक्यांच्या आतषबाजीत जोरदार स्वागत करण्यात आले. अनेक महिला कार्यकर्त्यांनी त्यांचे औक्षण केले.राजाभाऊ वाजे आगे बढो हम तुम्हारे साथ है, शिवसेना जिंदाबादच्या घोषणांनी आसमंत परिसर दणाणला होता. या वेळी उपस्थित मान्यवराच्या हास्ते वाजे यांचा शाल,पुष्प गुच्छ देवून सत्कार करण्यात आला. उद्धव ठाकरे यांनी माझी उमेदवारी घोषित करून माझ्यावर जो विश्वास टाकला त्याबद्दल मी त्यांचा सदैव ऋणी राहीन.(Shiv Sainiks welcome Rajabhau Waze with drums, fireworks )

नाशिक लोकसभा मतदारसंघ हा उद्धव ठाकरे यांना मानणारा तसेच शिवसेना आणि महाविकास आघाडीचा बालेकिल्ला असून नाशिकची जनता माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील आणि गद्दारांना चांगला धडा शिकवेल,असे राजाभाऊ वाजे यांनी सत्कारास उत्तर देताना सांगितले.शिवसैनिकांची फौज हीच खरी पुंजी असून त्या बळावर तसेच महाविकास आघाडीच्या सहकार्याने आपण निश्चितच विजयश्री खेचणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

राजाभाऊ वाजे हे सच्चे शिवसैनिक आहेत.सिन्नरचे आमदार असताना त्यांनी केलेली कामे सर्वांच्या स्मरणात आहेत.दांडगा जनसंपर्क आणि कुशलतेने कामे मार्गी लावण्याची त्यांची हातोटी हीच त्यांच्या कार्याची खरी पावती असून त्या जोरावरच उद्धवसाहेबांनी त्यांच्यावर विश्वास टाकून त्यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर केली आहे.त्यांना निवडून आणण्यासाठी सर्व शिवसैनिकांनी सज्ज राहावे,असे आवाहन जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी केले. राजाभाऊ वाजे यांना सर्वाधिक मताधिक्य मिळवून देऊ, हेमंत गोडसे यांनी केलेली गद्दारी मुळे शिवसैनिकाना नामी संधी लोकसभा निवडणुकीमुळे चालून आली असून राजाभाऊ वाजे यांना प्रचंड मताधिक्याने लोकसभेत पाठविण्याचा निर्धार,शिवसेना सहसंर्पकप्रमुख दत्ता गायकवाड यांनी व्याक्त केला.नाशिक महानगर तसेच नासिक,सिन्नर,इगतपुरी, त्र्यंबकेश्वर तालुक्यांमध्ये शिवसेना तसेच महाविकास आघाडीचे वर्चस्व आहे. त्याचबरोबर राजाभाऊ वाजे यांचा चाहतावर्गही मोठ्या प्रमाणात असल्याने त्यांच्या विजय ही काळ्या दगडावरची रेष असल्याचे आसा विश्वास माजी आमदार वसंत गिते,माजी महापौर विनायक पांडे, मा.नगरसेवक डी.जी.सूर्यवंशी,मुशीर सैय्यद यांनी व्यक्त केला.उमेदवारी अर्ज भरतांना शिवसेना तसेच महाविकास आघाडीची ताकद दाखवून देण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.या वेळी व्यासपिठावर सहसंपर्क प्रमुख दत्ता गायकवाड,जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर, माजी आमदार वसंत गिते,माजी माहापौर विनायक पांडे,डी.जी सूर्यवंशी,उपजिल्हाप्रमुख जगनराव आगळे, देवानंद बिरारी,सचिन मराठे,महेश बडवे,माजी महापौर यतिन वाघ,युवासेना पदाधिकारी दिपक दातीर,राहूल ताजनपुरे बालम शिरसाठ,भा.वि.से.जिल्हा संघटक वैभव ठाकरे,विधानसभा प्रमुख बाळासाहेब कोकणे,सुभाष गायधनी,शैलेश सूर्यवंशी,शिवसेना पदाधिकारी राहूल दराडे,देवा जाधव,भारत कोकाटे, बाळासाहेब वाघ,ज्ञानेश्वर गाडे,गौरव घराटे,भैया मणियार,आदि मान्यवर सह नाशिक लोकसभा क्षेत्रातील सर्व पदाधिकारी,लोकप्रतिनीधी,अंगीकृत संघटना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

टीम लय भारी

Recent Posts

मुंबईत पावसामुळे दोन मोठ्या दुर्घटना; पेट्रोल पंपावर कोसळले भले मोठे होर्डींग

मुंबई शहरासह उपनगरात अवकाळी पावसाने अक्षरशाः थैमान घातले आहे. वादळी वारा आणि गारांसह पावसामुळे दोन…

8 hours ago

पाच काेटींच्या साेने चाेरीचा पर्दाफाश

जुन्या गंगापूर नाक्यावरील एका होम फायनान्सच्या तिजोरीतील पाच कोटी रुपयांचे दागिने चोरुन (gold theft) नेल्याच्या…

8 hours ago

पहिलवानाच्या खून प्रकरणातील संशयित अटकेत

दोन दिवसांपूर्वी वाडीवऱ्हे येथील सांजेगावातील उत्तर महाराष्ट्र केसरी पहिलवान भूषण लहामगे खून (murder) प्रकरणतील संशयित…

9 hours ago

शिक्षक मतदारसंघ निवडणुक आचारसंहितेचा फटका; मनपाच्या विकासकामांना पुन्हा ब्रेक

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता येत्या चार जूनला संपुष्टात आल्यानंतर मनपाच्या विकासकामांना मुहूर्त लागेल अशी अपेक्षा होती.…

9 hours ago

मोदी सरकारच्या काळात मुंबई पूर्णपणे दहशतवादमुक्त; परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने (Modi government) दहशवाद्यांविरोधात दिलेल्या कडव्या लढ्यामुळे देशाची आर्थिक राजधानी मुंबई पूर्णपणे…

10 hours ago

पाकव्याप्त काश्मीर भारताचा अविभाज्य भाग, तो आम्ही मिळवणारच! अमित शाह

पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा भाग होता, आहे, आणि यापुढेही राहील ही आमची भूमिका असून कोणतीही…

10 hours ago