33 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रराजाभाऊ वाजे यांचे शिवसैनिकांतर्फे जल्लोषात स्वागत ढोल ताशांचा गजर,फटाक्यांच्या आतषबाजीने नाशिक दणाणले

राजाभाऊ वाजे यांचे शिवसैनिकांतर्फे जल्लोषात स्वागत ढोल ताशांचा गजर,फटाक्यांच्या आतषबाजीने नाशिक दणाणले

नाशिक लोकसभा मतदारसंघातून सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे < Rajabhau Waze > यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे उमेदवारी जाहीर झाल्याचे वृत्त कळल्यानंतर शिवसैनिकांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे.शालिमार येथील मध्यवर्ती कार्यालयात आगमन झाल्यानंतर वाजे यांचे ढोल ताशांच्या गजरात तसेच फटाक्यांच्या आतषबाजीत जोरदार स्वागत करण्यात आले. अनेक महिला कार्यकर्त्यांनी त्यांचे औक्षण केले.राजाभाऊ वाजे आगे बढो हम तुम्हारे साथ है, शिवसेना जिंदाबादच्या घोषणांनी आसमंत परिसर दणाणला होता. या वेळी उपस्थित मान्यवराच्या हास्ते वाजे यांचा शाल,पुष्प गुच्छ देवून सत्कार करण्यात आला. उद्धव ठाकरे यांनी माझी उमेदवारी घोषित करून माझ्यावर जो विश्वास टाकला त्याबद्दल मी त्यांचा सदैव ऋणी राहीन.(Shiv Sainiks welcome Rajabhau Waze with drums, fireworks )

नाशिक लोकसभा मतदारसंघ हा उद्धव ठाकरे यांना मानणारा तसेच शिवसेना आणि महाविकास आघाडीचा बालेकिल्ला असून नाशिकची जनता माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील आणि गद्दारांना चांगला धडा शिकवेल,असे राजाभाऊ वाजे यांनी सत्कारास उत्तर देताना सांगितले.शिवसैनिकांची फौज हीच खरी पुंजी असून त्या बळावर तसेच महाविकास आघाडीच्या सहकार्याने आपण निश्चितच विजयश्री खेचणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

राजाभाऊ वाजे हे सच्चे शिवसैनिक आहेत.सिन्नरचे आमदार असताना त्यांनी केलेली कामे सर्वांच्या स्मरणात आहेत.दांडगा जनसंपर्क आणि कुशलतेने कामे मार्गी लावण्याची त्यांची हातोटी हीच त्यांच्या कार्याची खरी पावती असून त्या जोरावरच उद्धवसाहेबांनी त्यांच्यावर विश्वास टाकून त्यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर केली आहे.त्यांना निवडून आणण्यासाठी सर्व शिवसैनिकांनी सज्ज राहावे,असे आवाहन जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी केले. राजाभाऊ वाजे यांना सर्वाधिक मताधिक्य मिळवून देऊ, हेमंत गोडसे यांनी केलेली गद्दारी मुळे शिवसैनिकाना नामी संधी लोकसभा निवडणुकीमुळे चालून आली असून राजाभाऊ वाजे यांना प्रचंड मताधिक्याने लोकसभेत पाठविण्याचा निर्धार,शिवसेना सहसंर्पकप्रमुख दत्ता गायकवाड यांनी व्याक्त केला.नाशिक महानगर तसेच नासिक,सिन्नर,इगतपुरी, त्र्यंबकेश्वर तालुक्यांमध्ये शिवसेना तसेच महाविकास आघाडीचे वर्चस्व आहे. त्याचबरोबर राजाभाऊ वाजे यांचा चाहतावर्गही मोठ्या प्रमाणात असल्याने त्यांच्या विजय ही काळ्या दगडावरची रेष असल्याचे आसा विश्वास माजी आमदार वसंत गिते,माजी महापौर विनायक पांडे, मा.नगरसेवक डी.जी.सूर्यवंशी,मुशीर सैय्यद यांनी व्यक्त केला.उमेदवारी अर्ज भरतांना शिवसेना तसेच महाविकास आघाडीची ताकद दाखवून देण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.या वेळी व्यासपिठावर सहसंपर्क प्रमुख दत्ता गायकवाड,जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर, माजी आमदार वसंत गिते,माजी माहापौर विनायक पांडे,डी.जी सूर्यवंशी,उपजिल्हाप्रमुख जगनराव आगळे, देवानंद बिरारी,सचिन मराठे,महेश बडवे,माजी महापौर यतिन वाघ,युवासेना पदाधिकारी दिपक दातीर,राहूल ताजनपुरे बालम शिरसाठ,भा.वि.से.जिल्हा संघटक वैभव ठाकरे,विधानसभा प्रमुख बाळासाहेब कोकणे,सुभाष गायधनी,शैलेश सूर्यवंशी,शिवसेना पदाधिकारी राहूल दराडे,देवा जाधव,भारत कोकाटे, बाळासाहेब वाघ,ज्ञानेश्वर गाडे,गौरव घराटे,भैया मणियार,आदि मान्यवर सह नाशिक लोकसभा क्षेत्रातील सर्व पदाधिकारी,लोकप्रतिनीधी,अंगीकृत संघटना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी