महाराष्ट्रातील ‘ते’ देखणं गाव पाहण्यासाठी हरियाणाच्या २५ अधिकाऱ्यांचा आज दौरा

टीम लय भारी

सातारा : निवृत्त आयएएस अधिकारी चंद्रकांत दळवी यांच्या कल्पक नेतृत्वाखाली ‘निढळ’ (ता. खटाव, जि. सातारा) या गावाने चौफेर विकास साधला आहे. गेल्याच आठवड्यात महाराष्ट्रातील काही नवनियुक्त अधिकाऱ्यांनी ‘निढळ’ला भेट दिली होती. त्यानंतर आता हरियाणा राज्यातील २५ अधिकारी ‘निढळ’चा विकास पाहण्यासाठी येत आहेत.

हरियाणा सरकारमधील सहसचिव, उपसचिव, तेथील जिल्हा परिषदांचे विशेष कार्यकारी अधिकारी, सहसंचालक व उपविभागीय अधिकारी अशा एकूण २५ जणांचा चमू शनिवारी ‘निढळ’ला भेट देणार आहे. पुण्यातील ‘यशदा’मध्ये या अधिकाऱ्यांचा सध्या अभ्यासवर्ग सुरू आहे. या अभ्यासवर्गा अंतर्गत ‘निढळ’च्या विकासाचे मॉडेल पाहण्यासाठी ते येणार असल्याचे चंद्रकांत दळवी यांनी ‘लय भारी’शी बोलताना सांगितले.

जाहिरात

निढळमधील जलसंधारणाची कामे, पीक पद्धत, प्राथमिक व माध्यमिक शाळेची उभारणी, गावातील स्वच्छता, बचत गट, ग्रामपंचायतीचा कारभार, पतसंस्था – सोसायटी व बँकेच्या माध्यमातून साधलेला अर्थविकास, दुग्धोत्पादन अशा प्रगतीच्या विविधांगांची ते तपशिलवार पाहणी करतील. त्यानंतर गावकऱ्यांशी संवाद सुद्धा साधतील.चंद्रकांत दळवी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या ४० वर्षांपासून गावकरी ‘निढळ’च्या विकासासाठी झटत आहे. ४० वर्षांच्या अथक परिश्रमातून ‘निढळ’ हे ग्रामविकासाचे आदर्श मॉडेल म्हणून नावारूपाला आले आहे. ‘निढळ’च्या विकासाची गाथा पाहण्यासाठी राज्यातून सतत लोक येत असतात. पण अन्य राज्यातील अधिकारीही आता ‘निढळ’चा अभ्यास करण्यासाठी येऊ लागले आहेत, हे विशेष.

हे सुद्धा वाचा

आयएएस अधिकाऱ्याने बनविलेल्या देखण्या गावाचे ९५ अधिकाऱ्यांनी घेतले दर्शन

उपजिल्हाधिकारी बनलेल्या धावपटू ललिता बाबरने शेतात घेतला ऊसाचा आस्वाद, शेतकऱ्यांशीही साधला संवाद

मराठी माध्यमाची प्राथमिक शाळा होणार हायटेक, आदर्श गाव ‘निढळ’चे आणखी एक पाऊल

आयएएस अधिकाऱ्याच्या पत्नीच्या एका फोनवर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी वाचविले तरूणाचे प्राण

वारसा हक्काने नोंद झालेली जमीन ब्राह्मण कुटुंबाने कसणाऱ्या धनगरांच्या नावे केली

आदित्य ठाकरेंच्या अभ्यासू मार्गदर्शनावर आयएएस अधिकारीही झाले चकीत

अजितदादांनी मनुकुमार श्रीवास्तव यांचे केले तोंड भरून कौतुक; जिल्हाधिकारी, प्रांताधिकाऱ्यांकडून केली ‘ही’ अपेक्षा व्यक्त

मुख्यमंत्र्यांनी तहसिलदारांना खूर्चीत बसविले, अन् त्यांच्यासोबत फोटो काढला; तहसिलदार म्हणाले, हा अविस्मरणीय क्षण

तुषार खरात

Recent Posts

पावसाळ्यानंतर त्वचासंबंधी या समस्या वाढू शकतात, जाणून घ्या

सप्टेंबर महिना संपत आला असून, आता पावसाळादेखील संपलाच आहे. पावसाळा संपल्यानांतर हवामानात बदल होते. या…

1 hour ago

‘विराट कोहलीने भेट दिलेल्या बॅटने मी कधीही खेळणार नाही’: आकाशदीप

भारत आणि बांगलादेश यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. यातील पहिला सामना भारतने जिंकला…

2 hours ago

कानपूरमध्ये इतिहास रचणार विराट कोहली! सचिन तेंडुलकरच्या क्लबमध्ये होणार सामील

भारत आणि बांगलादेशमध्ये दुसरा कसोटी सामना 27 सेप्टेंबरला खेळला जाणार आहे. हा सामना कानपूरच्या ग्रीन…

3 hours ago

‘पुष्पा 2’ ची नवीन रिलीज डेट जाहीर, या दिवशी होणार चित्रपट प्रदर्शित

साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुन आपल्या धमाकेदार चित्रपटासाठी ओळखला जातो. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना स्टारर…

4 hours ago

‘खतरों के खिलाडी 14’ ग्रँड फिनालेमध्ये होणार आलिया भट्टची एंट्री

कलर्स टीव्हीचा प्रसिद्ध शो 'खतरों के खिलाडी 14' त्याच्या फिनाले जवळ आला आहे. या शोचे होस्ट…

4 hours ago

मांड्यांची चरबी कमी करण्यासाठी दररोज करा ‘हे’ सोपे व्यायाम

आजकल सर्वनाचा सुंदर आणि फिट दिसायला आवडते. त्यासाठी लॉग योग, व्यायाम आणि जिम सुद्धा लावतात.…

5 hours ago