पाकिस्तान संघ वर्ल्डकपमधून बाहेर जाताच भूकंप

देशात आयसीसी वर्ल्डकप सुरू असून हा वर्ल्डकप अंतिम टप्प्यात आला आहे. दोन सेमी फायनल बाकी आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वी पाकिस्तान आणि इंग्लंडमध्ये सामना झाला होता. मात्र पाकिस्तान संघाचा पराभव झाला आहे. पाकिस्तान संघाला हार पचवता आली नाही, अशा स्थितीत पाकिस्तान संघ आपल्या मायदेशी रवाना होतोय ना होतोय तोवर पाकिस्तान क्रिकेटमध्ये आणखी एक भूकंपाचा हादरा बसला आहे. बाबर आझम राजीनामा देतोय की काय असा सवाल उपस्थित होता. मात्र आता दुसरे तिसरे कोणी नसून पाकिस्तानच्या संघाचे गोलंदाज प्रशिक्षकांनी राजीनामा दिला आहे.

पाकिस्तान संघाला सुरू असलेल्या वर्ल्डकपमध्ये म्हणावे असे यश मिळाले नाही. रनरेट्स आणि इतर काही त्रुटींमुळे पाकिस्तान संघाला आपल्या मायदेशी जावे लागले आहे. यावर पाकिस्तानच्या काही माजी खेळाडूंनी बाबर आझमवर निशाणा साधला आहे. याचा विपरित परिणाम हा प्रशिक्षकांवर होऊ लागला आहे. पाकिस्तानचे गोलंदाज प्रशिक्षक मोर्ने मॅक्वेलने राजीनामा दिला आहे. यामागचे नेमके कारण कोणते आहे, याबाबत अजूनही कोणतीही माहिती पुढे आली नाही. हॅरिस रौफ आणि शाहिन आफ्रिदीची अधिक धुलाई झाली आहे. यामुळे या वर्ल्डकपमध्ये हॉरिस रौफ हा सर्वाधिक महागडा गोलंदाज ठरला आहे.

हे ही वाचा

किर्तिकर-कदम यांच्यात ‘गद्दार’वरून जुंपली

राजकीय लढाई अंतवस्रापर्यंत

बीडमध्ये जाळपोळ करणारे १८१ जण अटकेत; मराठा आंदोलन प्रकरणी कारवाई

तर दुसरीकडे पाकिस्तान संघाचे माजी खेळाडू वसीम अक्रमने पाकिस्तान संघावर नाराजी वक्त केली आणि कर्णधार बाबर आझमला जबाबदार धरूण चालणार नाही असे देखील वक्तव्य केले आहे. ‘ए स्पोर्ट्शी’ बोलत असताना अक्रमने बाबर आझमच्या काही चुका दाखवून दिल्या आहेत मात्र त्याचा सर्व दोष नसल्याचे अक्रम म्हणाले आहेत.

काय म्हणाले अक्रम?

बाबरमुळे काही चुका झाल्या आहेत. मात्र सर्व दोष त्याला देऊ नका. काही तांत्रिक बाबींची कमतरता असल्याने हे सर्व झाले आहे. यात त्याची कोणतीही चुक नाही. आपले प्रशिक्षक कोण? हेच माहित नाही. यामुळे बाबरला आता बळीचा बकरा बनवू नका. पाकिस्तान संघाच्या दुरावस्थेसाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डला जबाबदार धरले आहे.

 

टीम लय भारी

Recent Posts

पावसाळ्यात या 5 प्रकारच्या तेलांनी करा केसांना मसाज, केसगळतीपासून मिळेल आराम

पावसाळ्यात केस तुटण्याची आणि गळण्याची समस्या वाढते. वास्तविक या काळात पावसात भिजल्यामुळे केसांची मुळे कमकुवत…

17 mins ago

Dhangar Reservation | पंढरपूरमधील उपोषणकर्त्यांचा शिंदे सरकारला इशारा | फडणवीस यांच्यावर संताप

पंढरपूर मध्ये धनगरपंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Strikers in Pandharpur…

1 hour ago

रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी करा ‘हे’ एरोबिक्स व्यायाम

मधुमेह हा एक असा आजार आहे ज्यामध्ये व्यक्तीच्या शरीरातील रक्तातील साखरेची पातळी सामान्यपेक्षा जास्त होते.…

1 hour ago

महायुती सरकारच्या चुकांमुळे राज्यातील आणखी प्रकल्प गुजरातला गेला: विजय वडेट्टीवार यांचा हल्ला

गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रात एकही प्रकल्प आला नाही आहे. यातच आता महाराष्ट्रात येणारा आणखी एक…

2 hours ago

SanjayMama Shinde मतदारसंघात महिन्यातून एकदा येतात | दादागिरी, गुंडगिरीत एक नंबर आमदार

करमाळा विधानसभा मतदारसंघात संजय मामा शिंदे हे गेल्या पाच वर्षापासून आमदार आहेत ते म्हाडा तालुक्यातील…

4 hours ago

बांगलादेशसोबतच्या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी कोहली-गंभीरचा व्हिडिओ आला समोर

चेन्नईत बांगलादेशसोबतच्या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक गौतम…

16 hours ago