28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeराजकीयराजकीय लढाई अंतर्वस्त्रांपर्यंत

राजकीय लढाई अंतर्वस्त्रांपर्यंत

राज्यात शिवसेनेचे दोन गट पडल्याने राज्यात राजकीय वातावरण चिघळले आहे. आगामी निवडणुका आणि एकमेकांविरोधात आरोपप्रत्यारोप करणे हे फार काही नवीन नाही. ठाण्यामधील मुंब्रा येथील उबाठा गटाची शाखा शिंदे गटाने तोडल्याचा दावा केला आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) त्यांच्याच लोकांनी त्यांना पोहचू दिले नाही. त्यांचा बार फुसका गेला असे वक्तव्य केले आहे. यावर आता उबाठा गटाचे नेते संजय राऊतांनी (sanjay raut) खरपूस समाचार घेत भाजपवर (BjP) संताप व्यक्त केला असून एकनाथ शिंदेंची कान उघडणी केली आहे. शिंदेंनी केलेल्या वक्तव्यावर तुमचा बार वरून उडेल की खालून उडेल हे बघा, असे वक्तव्य करत पलटवार केला आहे.

३१ डिसेंबरनंतर आपण मुख्यमंत्री नसाल. तेव्हा आपण कोणत्या बारमध्ये असाल हे सांगताही यायचे नाही. शिवसेनेचा बार  बाळासाहेब ठाकरेंच्या गेली ५० वर्षांपासून उडत आहे. भाजपने तुमचा बार कधीच उडवला आहे. असा पलटवार आता संजय राऊतांनी केला आहे. माध्यमांशी बोलत असताना राऊत म्हणाले की, दिल्लीतील भाजपाच्या चरणदासांनी महाराष्ट्रातील मराठी माणसांची बेअब्रु केली आहे. यामुळे आता शिवसेनेला ज्ञान देण्याची  गरज नाही.

हे ही वाचा

बीडमध्ये जाळपोळ करणारे १८१ जण अटकेत; मराठा आंदोलन प्रकरणी कारवाई

उत्साहाच्या भरात चाहत्यांनी फोडले थिएटरमध्ये फटाके

चक्क १०० गाड्या एकमेकांवर धडकल्या, २० किलोमीटपर्यंत वाहतूक कोंडी

शिवसेनेला फोडण्याचे भाजपचे स्वप्न

त्यानंतर भाजपने राज्यात अनेक सरकार फोडत आपली सत्ता स्थापन केली आहे. महाराष्ट्रातही तेच केले आहे. आपलीच लोकं आपल्या विरोधात ठेऊन भाजप काम करत आहे. शिवसेनेला फोडण्याचे अनेक वर्षांपासून भाजपचे स्वप्न आहे. मात्र मिंधे गट फोडला तरीही त्यांचे स्वप्न पूर्ण होत नाही. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री नसते आणि दिवाळी नसती तर शाखा ताब्यात घेतली असती, असे वक्तव्य संजय राऊतांनी केले आहे.

अंतर्वस्त्र कमळ

भाजप जाती-धर्मात तेढ निर्माण करत आहे. दोन्ही गटांमध्ये भांडणं लावण्याचे काम भाजप करत आहे. एकनाथ शिंदे, अजित पवार आणि आसामच्या मुख्यमंत्र्यांवर भाजप अनेक वर्षांपासून भ्रष्टाचाराचे आरोप लावत होते. आता हेच भाजपचे प्रचारक आहेत. सत्ता, पैसा आणि उद्योग हा भाजपाचा विचार आहे, रोहित पावारांनी काही नेते भाजपमध्ये जाणार असल्याचे वक्तव्य केले होते. त्यावर संजय राऊत म्हणाले की आता ते भाजपमध्येच आहेत, त्यांचे अंतर्वस्त्र कमळ असल्याचे वक्तव्य संजय राऊतांनी केले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी