महाराष्ट्र

PFI Scam : ‘पाकिस्तान जिंदाबाद’ घोषणा दिल्याच नाहीत, पुणे पोलिसांकडून स्पष्टीकरण

पुणे शहरात काल ‘पाॅप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या कार्यकर्त्यांनी “पाकिस्तान जिंदाबाद” अशा घोषणा दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला, ज्याचे पडसाद केवळ राज्यातच नव्हे तर अवघ्या देशात सुद्ध उमटले. कार्यकर्त्यांच्या पाकिस्तान जिंदाबादच्या गर्जनेने पुणे शहरात एकच खळबळ उडाल्याचे काल दिसून आले. या संपुर्ण घटनेचे व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाले परंतु पुणे पोलिसांकडून वेगळीच सारवासारव करण्यात येत असल्याचे पाहायला मिळत आहे. आंदोलकांनी पाकिस्तान जिंदाबाद अशा कोणत्याच घोषणा दिलेल्या नाहीत असे पुणे पोलिसांकडून आता सांगण्यात येत आहे, त्यामुळे कालच्या घटनेत नेमकं काय झालं हा बुचकळ्यात टाकणारा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, पाॅप्यूलर फ्रंट ऑफ इंडिया संघटनेच्या मागे एनआयएची पीडा लागली असून या संघटनेच्या देशभरातील विविध कार्यालयांमध्ये एनआयएकडून छापे टाकण्यात येत आहेत, त्यांच्या सोबत ईडी आणि जीएसटीचे अधिकारी सुद्धा कसून तपास करीत आहेत. सदर संघटनेकडून दहशतवादी कृत्यांसाठी पैसा पुरवला जात असल्याचा संशय बळावल्यामुळे संबंधित कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईदरम्यान आतापर्यंत अनेक जणांना अटक करण्यात आली असून संबंधित कार्यालयांच्या प्रमुखांना सुद्धा ताब्यात घेण्यात आलेले आहे.

हे सुद्धा वाचा…

ODI ENGW vs INDW : भारतीय महिला संघाने इंग्रजांचा बदला घेतलाच! घरच्या मैदानावर दिलाय व्हाईट वॉश

MS Dhoni Live : धोनीच्या मनात नेमकं काय सुरूये! आज दुपारी ‘या’वेळी साधणार चाहत्यांशी संवाद

Maharashtra Politics : संदिपान भुमरेंनी उद्धव ठाकरेंची केली ‘नवरी’शी तुलना

दरम्यान, याच पार्श्वभूमीवर पाॅप्यूलर फ्रंट ऑफ इंडिया संघटनेच्या समर्थकांकडून एनआयएने केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ पुण्यात शनिवारी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. मोठ्या संख्येने हे समर्थक जमा झाल्याचे दिसून आले त्याबाबचे अनेक व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर धिंगाणा घालू लागले. दरम्यान त्याच वेळी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा सुरू झाल्याने एकच गोंधळ उडाला. परंतु या वृत्ताचे खंडण करत पुण्यातील बंडगार्डन पोलिसांकडून स्पष्टीकरण समोर आले आहे, याप्रकरणी 41 आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलेले आहे.

यावेळी पुणे पोलिस म्हणाले, काल पुणे शहरात पाॅप्युलर फ्रंट ऑफ इंडिया संघटनेच्या समर्थकांना आंदोलन करण्याची परवानगी नाकारली होती, तरीही या संघटनेने जिल्हाधिकार कार्यालयासमोर बेकायदेशीरपणे जमाव जमवला होता. त्यावेळी पोलिसांनी तात्काळ 41 आंदोलकांना ताब्यात घेतले होते, त्यानंतर आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा अधिक तपास पोलिसांकडून सुरू असल्याचे बंडगार्डन पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रताप मानकर यांनी सांगितले आहे.

कालच्या बेकायदेशीर आंदोलन प्रकरणी अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून काहींना ताब्यात सुद्धा घेण्यात आले आहे परंतु ज्या घोषणाबाजीमुळे संपुर्ण प्रकरणावर गोंधळ सुरू झाला त्या पाकिस्तान जिंदाबाद अशा घोषणा नसून पाॅप्यूलर फ्रंट जिंदाबाद, पीएफआय जिंदाबाद असे पुणे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे, त्यामुळे संपुर्ण प्रकरणात नेमकं काय घडलं आहे हे पाहणेच आता महत्त्वाचे ठरणार आहे.

सुचित्रा पेडणेकर

Recent Posts

नाशिक जिल्ह्यातील सभांच्या केंद्रस्थानी राहिला कांदा

जिल्हयात बुधवारी (ता.१५) महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह भाजप नेत्यांनी सभा,…

21 hours ago

५० हजाराची लाच घेतांना शिक्षणाधिकाऱ्याला अटक

शाळा बंद असल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी तसेच अल्प संख्यांक विकास बहुउद्देशीय संस्थेच्या अंतर्गत येणाऱ्या गुजराथी माध्यमिक…

1 day ago

‘गाभ’ सिनेमा या दिवशी होणार प्रदर्शित

सध्या अनेक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. वेग-वेगळे विषय घेवून अनेक सिनेमा रिलीज झाले आहेत.…

1 day ago

केंद्रात नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होणार – मंत्री छगन भुजबळ

जगात भारताची प्रतिमा उंचावण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी महत्वाचे निर्णय घेतल्यामुळे आज आपला…

1 day ago

नाशिक – दिंडोरीमध्ये भाजप – शिंदे गट संकटात, पत्रकार विक्रांत मते यांचे विश्लेषण

लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा पार पडलेला आहे. याच पार्श्वभूमीवर लय भारीची टीम गेले काही दिवस…

2 days ago

पिंपळगावच्या मोदींच्या सभेआधी पाच शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेत ठेवले नजरकैदेत

आज मंगळवारी पिंपळगाव येथे होणाऱ्या जाहीर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत (Modi's rally) खोट्या आश्वासनाबद्दल जाब…

2 days ago