क्रीडा

ODI ENGW vs INDW : भारतीय महिला संघाने इंग्रजांचा बदला घेतलाच! घरच्या मैदानावर दिलाय व्हाईट वॉश

भारतीय महिला संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील नियोजित तिन्ही एकदिवसीय सामन्यांची मालिका पुर्ण झाली आहे. या मालिकेत भारतीय संघाने एकहाती वर्चस्व गाजवत 3-0 असा विजय मिळवला. भारताची वेगवान गोलंदाज झूलन गोस्वामी हिचा हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतील शेवटचा सामना होता. तिने काही दिवसांपूर्वीच आपल्या निवृत्तीबाबत घोषणा केली होती. विशेष म्हणजे इंग्लंडला त्यांच्याच धर्तीवर क्लीन स्विप देत भारतीय महिला संघाने झूलन गोस्वामीला क्रिकेटमधून अलविदा केले. क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवर मालिकेतील शेवटचा सामना खेळला गेला. या सामन्यात भारतीय महिला संघाने 16 धावांनी रोमहर्षक विजय मिळवला.

लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवर झालेल्या शेवटच्या वनडेत इंग्लिश महिला संघाने नाणेफेक जिंकून भारतीय महिला संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. निमंत्रण स्वीकारून भारतीय संघाने 45.4 षटकांत सर्व गडी गमावून 169 धावा केल्या. संघासाठी मधल्या फळीत दीप्ती शर्माने 106 चेंडूत सर्वाधिक 68* धावांचे योगदान दिले. लक्ष्याचा पाठलाग करताना यजमानांचा संघ 43.3 षटकांत 153 धावांत गारद झाला. अशाप्रकारे भारतीय महिला संघाने कमी धावसंख्येच्या सामन्यात 16 धावांनी रोमहर्षक विजय मिळवला.

हे सुद्धा वाचा…

MS Dhoni Live : धोनीच्या मनात नेमकं काय सुरूये! आज दुपारी ‘या’वेळी साधणार चाहत्यांशी संवाद

Maharashtra Politics : संदिपान भुमरेंनी उद्धव ठाकरेंची केली ‘नवरी’शी तुलना

Maharashtra Politics : केंद्रीय मंत्री निर्मला सितारामन यांचा गंभीर आरोप

भारताची वेगवान गोलंदाजास झूलन गोस्वामीचा हा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना होता. या सामन्यात तिने विशेष गोलंदाजीचे प्रदर्शन करत 10 पैकी 3 षटके निर्धाव टाकली. शिवाय आपल्या 10 षटकांत केवळ 30 धावा देत 2 बळी टिपले. मात्र, भारतासाठी मालिकेत शेवटचा सामना गोलंदाजांनी अविस्मनरनीय बनवला. वेगवान गोलंदाजी रेणूका सिंग हिने 10 षटकांत केवळ 29 धावा देत 4 बळी घेतले. शिवाय राजश्वरी गायकवाड हिने 2 तर दिप्ती शर्माने 1 बळी घेतला. मात्र, साीमन्यात सर्वात गाडलेला क्षण ठरला तो म्हणजे इंग्लंड संघाचा शेवटचा बळी.

सामन्यादरम्यान इंग्लिश संघाची शेवटची विकेट दीप्ती शर्माने हुशारीने मिळवली. किंबहुना आपल्या संघाला विजयाच्या दिशेने नेणाऱ्या शर्माला शर्माने चेंडू टाकण्यापूर्वीच मॅनकिडिंगमार्फत धावबाद करून पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. यावेळी मैदानात उपस्थित सर्व खेळाडू क्षणभर स्तब्ध झाले. मात्र, नुकतेच नियम बदलत आयसीसीने अशाप्रकारे खेळाडूला बाद करण्याचे मान्य केले आहे.

दरम्यान, इंग्लंडसाठी तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात चार्ली डीनने आपल्या संघासाठी सर्वाधिक धावा केल्या होत्या. तिने 80 चेंडूंचा सामना करत 58.75 च्या स्ट्राइक रेटने 47 धावांची सर्वोच्च खेळी खेळली. मात्र, तिचे पहिले वनडे अर्धशतक अवघ्या तीन धावांनी हुकले. आणि इंग्लंड संघाला लाजीरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले.

टीम लय भारी

Recent Posts

दिव्यांग सशक्तीकरणासाठी मोदींच्या हमीवर विश्वास; विकास शर्मा

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सरकारच्या निर्णयांमुळे दिव्यांगांच्या सशक्तीकरणासाठी (Divyangs empowerment) मोठी मदत…

27 mins ago

संविधाना संदर्भात वारंवार कॉग्रेस कडून जनतेची दिशाभुल – माजी मंत्री दिलीप कांबळे

गेल्या 10 वर्षे या देशाचा सर्व क्षेत्रात झपाटयाने विकास होत आहे. 2014 ते 2024 या…

56 mins ago

मतदान हे देशासाठी आणि देशाच्या विकासासाठी करा – मंत्री छगन भुजबळ

मतदान हे देशासाठी देशाच्या विकासासाठी करा असे सांगत केंद्रात नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी…

1 hour ago

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला हात लावाल तर भाजपाचे नामोनिशान राहणार नाही: मल्लिकार्जून खर्गे

पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यंत्रणांच्या माध्यमातून विरोधकांना जेलमध्ये टाकण्याचे काम केले.…

2 hours ago

पाच लाखांच्या बदल्यात १८ लाखांची वसुली; चार खासगी सावकारांवर गुन्हा दाखल

शहरात सावकारीचा फाश सुरुच असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. म्हसरुळ भागात अवैध सावकारी करणाऱ्या दाम्पत्याने…

17 hours ago

जुन्या नाशकात घर आणि गाड्या जाळल्या; समाजकंटकांवर गुन्हा

जुने नाशिक  येथील जहांगिर कब्रस्तान व इतर ठिकाणांवर दुचाकीस्वार तिघांनी चारचाकी, दुचाकी वाहनांसह घरांवर जळत्या…

17 hours ago